वैयक्तिक कर्ज माहिती | What is a Personal Loan, Benefits, Interest Rate

Complete Information About Personal Loan In Marathi

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेच आपल्या महाराष्ट्रामध्ये बहुतांश लोक सुशिक्षित नाहीत म्हणजेच त्यांचे शिक्षण हे कमी आहे किंवा बहुतांश लोक शेती करतात त्यामुळे खूप सार्‍या लोकांना कर्ज काय असते किंवा Personal Loan वैयक्तिक कर्ज काय असते याबद्दल मुळात माहितीच नाही कारण त्यांना सोसायटी कर्ज शेतीवरील कर्ज याबद्दलच थोडीफार माहिती असते त्यांना कर्जाचे प्रकार किती असतात आपण कोण कोणत्या गोष्टींसाठी कर्ज घेऊ शकतो किंवा वैयक्तिक कर्ज काय असते खूप सार्‍या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नसतात त्यामुळे ऑल-इन-वन मराठीच्या आजच्या या पोस्ट द्वारे आपण वैयक्तिक कर्ज काय असते या बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

what is personal loan

वैयक्तिक कर्ज काय असते? What Is a Personal Loan?

मित्रांना खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की Personal Loan नेमके काय असते मित्रांनो आपल्या आर्थिक गरजेच्या वेळी बँकेकडून घेतलेल्या कर्जाला वैयक्तिक कर्ज म्हणतात वैयक्तिक कर्ज हे आणीबाणीच्या काळात तुमच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी घेऊ शकता जसे की लग्नासाठी किंवा शिक्षणासाठी दवाखान्याच्या खर्चासाठी घर बांधण्यासाठी किंवा फिरण्यासाठी आपण घेतो त्यालाच वैयक्तिक कर्ज असे म्हणतात व बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम EMI स्वरुपात आपण नंतर बँकेला जमा करू शकतो.

व्याज दर काय असतो? What is The Interest Rate?

आपण बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेवरती लागणारी टक्केवारी ला व्याजदर असे म्हणतात प्रत्येक बँकेचे व्याजदर हे वेगवेगळे असतात बँकेकडून तुम्हाला एका विशिष्ट कालावधीसाठी कर्ज दिले जाते जर तुम्ही ते नियमितपणे भरले नाहीत तर तुम्हाला व्याजदर जास्त भरावा लागतो.

वैयक्तिक कर्जाचे फायदे? Benefits of Personal Loan

मित्रांनो Personal Loan घेतल्यावर प्रत्येक बँकेकडून खूप सारे फायदे आपल्याला मिळत असतात त्यामध्ये काही सारख्या गोष्टी आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊ.

 • वैयक्तिक कर्ज घेताना आपल्याला कोणतीही वस्तू बँकेकडे गहाण ठेवण्याची आवश्यकता नसते
 • वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी खूप कमी कागदपत्रे लागतात
 • वैयक्तिक कर्ज बँकेकडून खूप कमी वेळामध्ये मंजूर केले जाते
 • वैयक्तिक कर्जावरील व्याजदर पण खूप कमी असतात
 • 18 ते 60 वर्षे वयापर्यंतच्या लोकांना वैयक्तिक कर्ज दिले जाते
 • या डिजिटल जगात वैयक्तिक कर्ज मिळणे खूप सोपे झाले आहे तुम्ही घर बसल्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.

वैयक्तिक कर्जासाठी पात्रता काय आहे? What is the eligibility for a personal loan?

मित्रांनो कोणतेही बँकेकडून आपल्याला वैयक्तिक कर्ज पाहिजे असेल तर आपल्या सिबिल स्कोर च्या आधारावर ती आपल्याला वैयक्तिक कर्ज दिले जाते आपला सिबिल स्कोर कमीतकमी 750 ते 900 इतका असणे गरजेचे असते तरच तुम्हाला लवकरात लवकर बँकेकडून कर्ज मंजूर होते तुमचा सिबिल स्कोर जितका चांगला असेल तितका व्याजदर पण तुम्हाला कमी लागतो.

कोणत्या बँका वैयक्तिक कर्ज देतात? Which banks offer personal loans?

 • स्टेट बँक ऑफ इंडिया
 • आयडीबीआय बँक
 • आय सी आय सी आय बँक
 • ॲक्सिस बँक
 • बँक ऑफ महाराष्ट्र
 • एचडीएफसी बँक
 • पंजाब नॅशनल बँक
 • बँक ऑफ बडोदा

सर्वोत्तम वैयक्तिक कर्ज देणारे एप्लीकेशन कोणते? Which is the best personal loan application?

मित्रांनो जर तुम्हाला तात्काळ कर्ज हवे असेल तर त्यासाठी खूप सारे कर्ज देणारे एप्लिकेशन्स आहेत ज्याद्वारे तुम्ही तात्काळ कर्ज मिळवू शकता त्या एप्लिकेशन्स ची यादी खालील प्रमाणे दिली आहे.

 • धनी ॲप
 • क्रेडिट बी ॲप
 • बजाज फिन्सर्व
 • एम पॉकेट ॲप
 • पे मी इंडिया ॲप
 • मनीटॅप ॲप
 • मनी व्ह्यू ॲप
 • लोन टॅप ॲप

वैयक्तिक कर्जाचे प्रकार? Types of Personal Loans

मित्रांनो जर तुम्ही Personal Loan घेण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला वैयक्तिक कर्जाच्या प्रकाराबद्दल माहिती असणे गरजेचे असते वैयक्तिक कर्ज हे चार प्रकारचे असतात ज्यामध्ये लग्नासाठी कर्ज शिक्षणासाठी कर्ज पेन्शन कर्ज घराचे नूतनीकरण करण्यासाठी बँकेकडून वैयक्तिक कर्ज दिले जाते.

मित्रांनो मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण वैयक्तिक कर्जाबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता व ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा होईल.

Leave a Comment