Solar Pump Scams: नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलार पंप साठी फक्त दोन योजना सरकारतर्फे राबवल्या जातात त्यामध्ये सर्वप्रथम म्हणजे कुसुम सोलार पंप योजना व दुसरी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या आपल्याला माहीत असायला हव्यात कारण सध्या सोलार पंप योजनेच्या नावाखाली आपल्या शेतकरी मित्रांना फसवण्याचा कार्यक्रम खूप जोरात सुरू आहे आणि आपले शेतकरी मित्र याला बळी पडत आहेत या लेखात आपण याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ जेणेकरून आपले शेतकरी मित्र या फसवणुकीला बळी पडणार नाहीत.
मित्रांनो मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत जवळपास एक लाख पंप बसवण्यात आले आहेत उर्वरित राहिलेले एक लाख पंप हे कोटेशन भरलेल्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहेत व कुसुम सोलार पंप योजनेच्या अंतर्गत जवळपास पाच लाख सोलार पंप देण्यात येणार आहेत त्यामधील पन्नास हजाराचा पहिला टप्पा संपला असून दुसऱ्या पन्नास हजाराचा टप्पा सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी नोंदणी करत आहेत.
बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेची नोंदणी करता येत नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असून त्यांचे कागदपत्र अपलोड करायचे राहिले आहेत ज्यांनी कागदपत्र अपलोड केली आहेत त्यांना पेमेंट चा पर्याय येत नाही अशी परिस्थिती असताना कुसुम सोलार योजनेची फी शंभर रुपये होती ती आता पंधरा रुपये केली गेली आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये सध्या आणखी दोन योजना खूप मोठ्या प्रमाणात सुरू आहेत पहिली म्हणजे पाच हजार सहाशे रुपये भरून आपल्याला सोलार पंप देण्यात येईल व दुसरी म्हणजे पाच हजार रुपये पाच हजार रुपये भरले तरच आपल्याला सोलार पंप दिला जाईल.
कशाप्रकारे होती आपली फसवणूक पहा