श्रावण महिना माहिती | Shravan Month Information In Marathi

Importance Of Shravan Month In Marathi

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच श्रावण महिन्याला हिंदू धर्मात किती पवित्र मानले जाते आणि शिवभक्त श्रावण महिन्याची किती आतुरतेने वाट पाहतात असतात हे आपल्याला माहीतच आहे असे म्हटले जाते की या महिन्यात देवाचे देव महादेव आपल्या प्रत्येक भक्ताच्या घरांमध्ये वास करत असतात आणि त्यांची प्रामाणिक भक्ती पाहून त्यांना सुख-समृद्धी आणि धनाचा लाभ करतात या महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ मानला जातो पण सोमवार हा खूपच शुभ मानला जातो.

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण  श्रावण महिन्या बद्दल माहिती घेणार आहोत श्रावण महिना कधी पासून सुरू होत आहे, श्रावण महिन्यात किती सोमवार येतात, श्रावण महिना कधी संपतो, श्रावण  महिन्याचे व्रत कसे करावे, श्रावण व्रत करताना काय खाल्ले पाहिजे, श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी करू नयेत बद्दल माहिती दिली आहे.

Shravan Month 2022

 

श्रावण महिना कधी सुरू होतो आणि समाप्ती? When does Shravan month start and end?

या वर्षी श्रावण महिन्याची सुरुवात 14 जुलै 2022 गुरुवार पासून सुरू होणार आहे आणि 12 ऑगस्ट 2022 शुक्रवार समाप्त होणार आहे.

मित्रांनो श्रावण महिन्यात चार सोमवार असतात ते कोणत्या तारखेला आहेत त्याबद्दल ची यादी खालील प्रमाणे दिली आहे

 • पहिला सोमवार 18 जुलै
 • दुसरा सोमवार 25 जुलै
 • तिसरा सोमवार 1 ऑगस्ट
 • चौथा सोमवार 8 ऑगस्ट

श्रावण महिन्यात कोणत्या चुका करू नयेत? What mistakes should not be made in the month of Shravan

श्रावण महिन्यात कोणत्या चुका करू नये किंवा कोणत्या चुका केल्याने पाप लागते याबद्दलची यादी खालील प्रमाणे दिली आहे

 • ज्या व्यक्तीने श्रावण सोमवार धरला असेल त्या व्यक्तीने कोणाकडूनही फळे उधार घेऊ नयेत तू शेजारी असेल किंवा नातेवाईक असेल किंवा इतर कोणी असेल जर कोणी स्वइच्छेने तुम्हाला फळ दिले तर ते तुम्ही खाऊ शकता.
 • ज्या व्यक्तीने श्रावण सोमवार धरला असेल त्या व्यक्तीने आपल्या मुखातून खोटे बोलू नये
 • या महिन्यात कोणत्याही व्यक्तीची चुगली करू नये
 • श्रावण महिन्यात कोणाकडून कर्ज घेऊ नये
 • श्रावण सोमवारी पेरू खाऊ नये
 • श्रावण सोमवारी उपवास सोडते वेळेस खूप जुन्या पिठाचे बनवलेले पदार्थ ग्रहण करू नये
 • श्रावण महिन्यामध्ये केस कट करू नये
 • श्रावण महिन्यात नखे काढू नयेत
 • श्रावण महिन्यात दारू पिऊ नये
 • श्रावण महिन्यात चिकन मटण खाऊ नये
 • शिवलिंगावर तुळशीची पाने वाहू नयेत
 • श्रावण महिन्यात वांग्याची भाजी खाऊ नये

श्रावण सोमवार चा व्रत कसा करावा, विधी? How to fast on Shravan Monday, ritual?

मित्रांनो श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून महादेवाचा पाण्याने अभिषेक करून घ्यावा यासोबतच देवी पार्वती आणि नंदी चा पाण्याने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यावा त्यानंतर शिवलिंगाचा पंचामृताने अभिषेक करून घ्यावा व शिवलिंगावर बेल पाने  वहावे सोबतच धोत्र्याचे फुल चंदन, तांदूळ अर्पण करावे व महादेवाला तुपा साखरेचा नैवेद्य दाखवावा. नंतर धूप लावून गणपतीची आरती करून घ्यावी त्यानंतर महादेवाची आरती करून घ्यावी व सर्वांना प्रसाद वाटावा.

श्रावण महिन्यात कोणत्या गोष्टी कराव्या? What to do in the month of Shravan

 • श्रावण महिन्यात गोरगरीब व्यक्तींना दान करावे
 • मुक्या प्राण्यांना अन्न खाण्यास द्यावे.

कोणत्या व्यक्तीने श्रावण महिन्यात व्रत करू नये? Which person should not fast in the month of Shravan

 • ज्या लोकांचे कोर्ट मॅरेज झाले असेल अशा व्यक्तींनी हा व्रत करू नये
 • ज्या व्यक्तींचा घटस्फोट झाला आहे अशा व्यक्तींनी हा व्रत करू नये
 • वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी हा व्रत करू नये
 • ज्या व्यक्तीच्या मनामध्ये स्त्रियांबद्दल चांगले विचार नसतील अशा व्यक्तीने व्रत करू नये
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण श्रावण महिन्या बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता व ही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाइकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा लाभ होईल

 

Leave a Comment