मित्रांनो आपण शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी जातो किंवा पूजेसाठी जातो पण आपल्यापैकी बहुतांश लोकांना या गोष्टी बद्दल माहिती नसते की शिव मंदिरात किंवा घरी Shiva Puja केल्यानंतर आपल्याला कोण कोणते फायदे होतात शिवपूजा करण्याचा विधी काय असतो ऑल इन वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तरी ही माहिती व्यवस्थित वाचून घ्या
Shiv म्हणजे काय? What Is Shiv
मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ शंकर म्हणजे काय भगवान शिव हे नाव देवाधिदेव महादेवाला म्हटले जाते तसे महादेवाचे अनेक नावे आहेत भगवान शंकर या जगाचे आदियोगी, आदिगुरू, प्रथम गुरु या जगाचा कल्याण करता असे मानले जाते भारतीय संस्कृतीनुसार भगवान शंकराला सर्व देवतांचा गुरु किंवा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ भगवान शंकराला मानले जाते
शिव पूजा केल्याने कोणते फायदे होतात? Shiva Puja Benefits
पुराणात असे वर्णन आहे की भगवान शिवाने रावणाला सोन्याने बनवलेला महाल देखील दिला होता. म्हणजेच भगवान शिव आपल्या खऱ्या भक्ताच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात.
प्रत्येक कणात देव वास करतो असे म्हणतात. देवाची पूजा कोणत्याही ठिकाणी करता येते. पण मंदिरात देवतेची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत. आज आम्ही तुम्हाला शिव मंदिरात शंकराची पूजा केल्याने कोणते फायदे होतात ते सांगणार आहोत. यासोबतच शिवमंदिरातील भगवान शंकराची पूजा करण्याच्या विविध पद्धतीही सांगितल्या जाणार आहेत. शिवमंदिरात पूजा केल्याने कौटुंबिक कलह संपतो असे म्हणतात. मात्र, यासाठी संपूर्ण शिवपरिवार असलेल्या अशा शिवमंदिरात जावे, असे सांगण्यात आले आहे.
असे म्हणतात की भगवान शंकर हे जगातील सर्व काही दाता आहेत. शिवमंदिरात केलेल्या अनेक पूजा धनप्राप्तीसाठी उपयोगी पडतात. यासाठी शिवमंदिरात अनवाणी जावे असे मानले जाते. यानंतर शिवलिंगावर सुगंधी धारा किंवा उसाच्या रसाचा अभिषेक करावा. शिवलिंगावर अत्तर किंवा उसाच्या रसाने अभिषेक करताना तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता. शिवमंदिरात मोहरीच्या तेलाचे 6 दिवे लावल्याने घरातील गरिबी दूर होते आणि कुटुंबात सुख-शांती नांदते असे म्हणतात.
शिवाने रावणाला सोन्याचा महालही दिला होता असे पुराणात वर्णन आहे. म्हणजेच भगवान शिव आपल्या खऱ्या भक्ताच्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतात. संपत्तीच्या प्राप्तीसाठी फुलांनी बनवलेल्या शिवलिंगाचीही पूजा केली जाते अशी माहिती आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत वाढतात आणि कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढतो असे म्हणतात. असे मानले जाते की अमावास्येला स्मशानभूमीजवळ असलेल्या शिव मंदिरात जावे. यानंतर त्या मंदिरातील शिवलिंगाला दूध आणि मधाने अभिषेक करावा. यामुळे व्यवसायातील अडथळे दूर होतात असे मानले जाते.
शिव पूजा कशी करावी? Shiva Puja At Home
मित्रांनो आपल्याला माहित आहेच आपल्या देशात हिंदू धर्मात शिव शंकराची पूजा ही भक्तिभावाने केली जाते हिंदू धर्मात शिव शंकराची पूजा शिवलिंग आणि मूर्ती या दोन स्वरूपात केली जाते शिव शंकराची पूजा केल्याने आपल्या आयुष्यातील दारिद्र्य नाहीसे होऊन आपले आरोग्य व्यवस्थित राहते व आपल्याला यशप्राप्ती होते असे पुराणांमध्ये सांगितले आहे शिव शंकराची पूजा कशी करावी याबद्दल खालील प्रमाणे दिले आहे भगवान शिवशंकराची पूजा तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा तुमच्या घरी करू शकता दोन्हीसाठी पद्धत सारखीच आहे
- सर्वप्रथम भगवान शिव शंकराच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पाण्याने स्वच्छ धुऊन घ्यावे
- भगवान शंकराचा दह्या-दुधाने अभिषेक करून घ्यावा
- व त्यानंतर एक तांब्या पाणी शंकराला अर्पण करावे
- त्यानंतर स्वच्छ कपड्याने शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग पुसून घ्यावे
- शिवशंकराच्या मूर्तीस किंवा शिवलिंगास विभूती लावून घ्यावी
- विभूती लावून झाल्यानंतर शिवशंकराच्या मुर्तीस किंवा शिवलिंगास लाल चंदन पिवळी चंदन सर्वत्र लावून घ्यावे
- शिवशंकराच्या मूर्तीवर किंवा शिवलिंगावर पांढरी फुले अर्पण करावी भगवान शंकराला पांढरी फुले खूप आवडतात
- व त्यानंतर शंकराच्या मुर्तीस किंवा शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करावे
- बेलाचे पान अर्पण केल्यानंतर शिवलिंगावर किंवा शिवशंकराच्या मूर्तीवर थोडेसे तांदूळ अर्पण करावे
- शिवलिंगाला व शिवमुर्तीला उदबत्ती ओवाळून घ्यावी
- व मनोभावे शंकराची आरती करून घ्यावी
- त्यानंतर शिव शंकराला नैवेद्य अर्पण करावा व नमस्कार करून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा
कोणते फुल शिवशंकराला अर्पण करू नये? Which Flower Is Not Used For Shiva Puja
मित्रांनो भगवान शंकराला केतकी चे फुल अर्पण करू नये त्या व्यतिरिक्त तुम्ही भगवान शंकराला कोणतेही फूल अर्पण करू शकता पण शिव महापुराण मध्ये असे सांगितले आहे कि भगवान शिव शंकराला पांढरे फूल अर्पण करावे किंवा धोत्र्याचे फुल अर्पण करावे
हे पण वाचा: पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती
शिव अवतार किती आहेत? How many Shiva avatars are there?
मित्रांनो शिवमहापुरान यामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान शंकराचे 19 अवतार आहेत यांच्या अवताराची यादी खालील प्रमाणे दिली आहे शरभ अवतार
- पिप्पलाद अवतार
- नंदी अवतार
- भैरव अवतार
- अश्वत्थामा
- वीरभद्र अवतार
- गृहपति अवतार
- ऋषि दुर्वासा अवतार
- हनुमान अवतार
- वृषभ अवतार
- यतिनाथ अवतार
- कृष्णदर्शन अवतार
- अवधूत अवतार
- भिक्षुवर्य अवतार
- किरात अवतार
- सुनटनर्तक अवतार
- ब्रह्मचारी अवतार
- अर्धनारीश्वर अवतार
- सुरेश्वर अवतार
शिव शंकराचे 108 नावे कोणती? What are the 108 names of Shiva Shankar?
- आशुतोष
- आदिगुरु
- आदिनाथ
- आदियोगी
- अज
- अक्षयगुण
- अनघ
- अनंतदृष्टी
- औघद
- अव्ययप्रभु
- भैरव
- भालनेत्र
- भोलेनाथ
- भुतेश्वर
- भूदेव
- भूतपाल
- चंद्रपाल
- चंद्रप्रकाश
- दयाळू
- देवादिदेव
- धनदीप
- ज्ञानदीप
- द्युतीधारा
- दिगंबर
- दुर्जनीय
- दुर्जय
- गंगाधर
- गिरीजापती
- गुणग्रही
- गुरुदेव
- हर
- जगदीश
- जराधीशामन
- जतिन
- कैलास
- कैलासाधिपती
- कैलासनाथ
- कमलाक्षन
- कंठ
- कपालिन
- कोचदैय
- कुंडलिन
- ललाटाक्ष
- लिंगाध्यक्ष
- लोकांकर
- लोकपाल
- महाबुद्धी
- महादेव
- महाकाल
- महामाया
- महामृत्युंजय
- महानिधी
- महाशक्तिमय
- महायोगी
- महेश
- महेश्वर
- नागभूषण
- नटराज
- नीलकंठ
- नित्यसुंदर
- नृत्यप्रिय
- ओंकार
- पालनहार
- पंचतशरण
- परमेश्वर
- परमयोगी
- पशुपती
- पिनाकिन
- प्रणव
- प्रियभक्त
- प्रियदर्शन
- पुष्कर
- पुष्पलोचन
- रवीलोचन
- रुद्र
- सदाशिव
- सनातन
- सर्वचर्य
- सर्वशिव
- सर्वतपन
- सर्वयोनी
- सर्वेश्वर
- शंभो
- शंकर
- शांतहः
- शूलीन
- श्रेष्ठ
- श्रीकांत
- श्रुतिप्रकाश
- स्कंदगुरु
- सोमेश्वर
- सुखदा
- स्वयंभू
- तेजस्विनी
- त्रिलोचन
- त्रिलोकपती
- त्रिपुरारी
- त्रिषूलिन
- उमापती
- वाचस्पती
- वज्रहस्त
- वरद
- वेदकर्ता
- वीरभद्र
- विशालअक्ष
- विश्वेश्वर
- विश्वनाथ
- वृषवाहन
निष्कर्ष:
मित्रांनो आशा करतो की आपल्याला Shiva Puja कशी करावी याबद्दल समजले असेल ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपणाला शिव पूजा कशी करावी त्याचा विधी कसा असतो व त्याबद्दल त्याचे फायदे आणि शिवशंकराच्या 108 नावांबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा धन्यवाद