Satbara Utara Information: नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले कायदेशीर काम असतील किंवा सरकारी कामे असतील किंवा अनेक साऱ्या योजनांची कामे असतील अथवा पीक विम्याची कामे असतील बँकेकडून कर्ज हवे असेल अशा प्रत्येक ठिकाणी लागणारा एक महत्त्वपूर्ण कागदपत्र म्हणजे जमिनीचा सातबारा महाराष्ट्रातील अनेक साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न असतो की सरकारी कामांसाठी अथवा अनेक इतर कामांसाठी डिजिटल सातबारा चालतो का अथवा हस्तलिखित सातबारा चालतो का असे प्रश्न अनेक जणांना पडतात किंवा सातबारा वापरण्याचे काही नियम व अटी आहेत का या लेखाद्वारे आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
मित्रांनो यासाठी राज्य सरकारकडून दोन शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत यासाठी चा पहिला शासन निर्णय हा दिनांक 19 डिसेंबर 2019 रोजी जाहीर करण्यात आला होता या शासन निर्णयानुसार भूलेख संकेतस्थळावरून आपले सरकार सेवा केंद्रा मार्फत जनतेला देण्यात येणाऱ्या विनाशुल्क गट नंबर सातबारा व आठ चा उतारा पाहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली होती पण या सुविधेचा काही लोक हे गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे महसूल व वन विभागाने ही माहिती तंत्रज्ञान विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यामुळे जो सातबारा गट नंबर 8 चा उतारा महाभूमी संकेतस्थळावरून डाऊनलोड केला गेला असेल व त्यावरती व्ह्यू ओन्ली चा वॉटर मार्क असेल तो सातबारा फक्त माहितीसाठी असून त्याची कोणतीही प्रत शासकीय किंवा कायदेशीर कामासाठी वापरण्यात येणार नाही असे या शासन निर्णयातून जाहीर करण्यात आले होते.
नेमका कोणता सातबारा वापरावा?
सातबारा वापरण्याच्या संबंधीचा दुसरा शासन निर्णय हा 23 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आला या शासन निर्णयानुसार डिजिटल सातबारा हा एकमेव सातबारा जो आपण कुठल्याही कामासाठी वापरू शकाल याबद्दलचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला ज्या वरती डिजिटल स्वाक्षरी असेल असा सातबारा गट नंबर 8 अ चा उतारा ज्या वरती डिजिटल स्वाक्षरी केलेली असेल असे सर्व कागदपत्रे आपण प्रत्येक कामासाठी वापरात घेऊ शकाल हा सातबारा आपण या https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/ संकेतस्थळावर जाऊन डाउनलोड करू शकता व तो सर्व कामांसाठी वापरू शकता यावरती कुठल्याही अधिकाऱ्याची किंवा तलाठ्याची स्वाक्षरी असण्याची आवश्यकता नाही.
मित्रांनो फक्त डिजिटल सातबारा तुम्ही कोणत्याही कामासाठी वापरू शकता यासाठी महत्त्वाची सूचना म्हणजे डिजिटल सातबारा ची प्रिंट ही ब्लर नसूनही व ती व्यवस्थित प्रिंट केलेली असावी तर तो सातबारा आठाचा उतारा व गट नंबर प्रॉपर्टी पत्र ही कागदपत्रे तुम्ही वापरू शकाल.