sanjay gandhi niradhar yojana Update: संजय गांधी आणि श्रावणबाळ योजना निवृत्तीवेतनात वाढ, मंत्रिमंडळात निर्णय झाला

Sanjay Gandhi Niradhar Yojana Update: नमस्कार मित्रांनो दिनांक 28 जून 2023 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेतील निवृत्तीवेतनधारकांच्या निवृत्तीवेतनामध्ये वाढ करण्यात आलेली आहे याबद्दलचा शासन निर्णय 28 जून 2023 रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे निवृत्ती वेतनामध्ये किती वाढ करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर माहिती या लेखाद्वारे आपल्याला मिळेल.

संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील निवृत्ती वेतनात वाढ

मित्रांनो 28 जून 2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनेत आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेत प्रत्येक महिन्याला पाचशे रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बैठकीत अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते व उपाध्यक्ष स्थानिक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना प्रत्येक महिन्याला एक हजार रुपये मासिक अर्थसहाय्य म्हणून देण्यात येत होते परंतु आता त्यात पाचशे रुपयांची वाढ झाल्याने ते आता या योजनेतील लाभार्थ्यांना दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत.

या योजनेअंतर्गत ज्या विधवा महिलांना एका पथ्य आहे अशा महिलांना सध्या 1000 100 रुपये देण्यात येत होते तर दोन अपत्य असलेल्या लाभार्थ्यांना एक हजार दोनशे इतके महिन्याला अर्थसहाय्य म्हणून मदत देण्यात येत होती यात आता अनुक्रमे चारशे रुपये व तीनशे रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे या दोन्ही योजनेअंतर्गत जवळपास 40 लाख 99 हजार 240 लाभार्थी असून यांच्या निवृत्तीवेतनात वाढ झाल्यामुळे 2400 कोटी रुपये अतिरिक्त तरतुदीस देखील मंत्रिमंडळाने या बैठकीत मान्यता दिली आहे..

मित्रांनो या दोन्ही योजनांच्या अंतर्गत लाभार्थ्यांना आतापर्यंत वेळेवर मासिक वेतन दिले जात नव्हते याबद्दलही या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांनी वेळेवर प्रत्येक महिन्याला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये त्यांचा वेतन जमा करण्याचे आदेश पण देण्यात आले आहेत.

Leave a Comment