RBI Recruitment 2023: रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी, ४५० पदांसाठी होणार भरती

RBI Recruitment 2023: मित्रांनो या महागाईच्या काळात देशातील प्रत्येक तरुण हा सरकारी नोकरीच्या शोधात आहे अशा देशातील पदवी तर पदवीधर तरुणांसाठी खुशखबर आहे त्यांच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे ती म्हणजे रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये सहाय्यक पदाच्या जवळपास 450 जागांसाठी लवकरच भरती केली जाणार आहे.

आरबीआय सहाय्यक पदासाठी 450 जागांची भरती करण्यात येणार असून याबद्दलची जाहिरात आरबीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आली आहे तसेच अर्ज देखील दाखल करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करण्यात आलेली आहे या लेखाद्वारे आपण अर्ज करण्याची शेवटची तारीख परीक्षा शुल्क किती लागेल या परीक्षेसाठी पात्रता काय असेल वयोमर्यादा काय असेल वेतन किती मिळू शकेल व याची निवड कशी करण्यात येईल याबद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.

RBI सहाय्यक भरती 2023 तपशील?

पद आरबीआय सहाय्यक
पदसंख्या 450
वयोमर्यादा किमान 20 वर्षे व कमाल 28 वर्षे
अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2023
वेतन 20,700
वेबसाईट www.rbi.org

 

RBI सहाय्यक भरती 2023 शैक्षणिक पात्रता?

खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कुठलाही शाखेची बॅचलर पदवी पन्नास टक्के गुणांसोबत असणे अनिवार्य आहे व ओबीसी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना फक्त उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यांना 50 टक्के गुणांची आठ लागू नाही त्यासोबतच सर्व उमेदवारांना कम्प्युटर संबंधी बेसिक माहिती तसेच वर्ड प्रोसेसिंग चे नॉलेज असणे बंधनकारक आहे व उमेदवाराला उत्तम इंग्लिश भाषा लिहिता वाचता आणि बोलता यायला पाहिजे.

RBI सहाय्यक भरती 2023 वयाची अट काय आहे?

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या सहाय्यक पदासाठी वयोमर्यादा ही किमान वीस वर्षे व कमाल 28 वर्षे असणे आवश्यक आहे यामध्ये एक सप्टेंबर 2023 पासून उमेदवाराचे वय मोजले जाईल आणि उमेदवाराचा जन्म हा 2 सप्टेंबर 1995 पूर्वी तसेच 1 सप्टेंबर 2003 नंतर झालेला नसावा व यामध्ये ओबीसी एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3 व 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे.

RBI सहाय्यक भरती 2023 अर्जासाठी शुल्क किती लागेल?

उमेदवार हा जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस प्रवर्गातून असेल तर त्याला 450 रुपये + जीएसटी चार्ज भरावा लागेल आणि उमेदवार हा एससी एसटी आणि दिव्यांग प्रवर्गातून असेल तर त्याला 50 रुपये + जीएसटी चार्ज भरावा लागेल.

RBI सहाय्यक भरती 2023 अर्ज कसा करावा?

  • अर्ज करण्यासाठी या RECRUITMENT FOR THE POST OF ASSISTANT – 2023 (ibps.in) लिंक वरती क्लिक करावे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर मुखपृष्ठ उघडेल.
  • आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन चा पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करा.
  • त्यानंतर विचारली गेलेली माहिती व्यवस्थित भरून घ्या ज्यामध्ये संपूर्ण नाव पत्ता ईमेल आयडी मोबाईल नंबर भरून सेव आणि नेक्स्ट या पर्यायावर क्लिक करा.
  • फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या
  • सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्यावी व नंतर ती चेक करून घ्यावी त्यामध्ये त्रुटी आहेत का काही ते पहावे
  • सर्व माहिती अपलोड करून घ्यावी व पेमेंट या पर्यायावर क्लिक करावे.

RBI सहाय्यक भरती 2023 निवड प्रक्रिया?

RBI सहाय्यक भरती 2023 साठी निवड तीन-टप्प्यांद्वारे केली जाईल ज्यामध्ये पहिली प्राथमिक परीक्षा असेल दुसरी मुख्य परीक्षा असेल आणि त्यासोबतच भाषा प्राविण्य चाचणीचा यामध्ये समावेश असेल सगळ्यांनी याची नोंद घ्यावी.

  • प्राथमिक परीक्षा: प्राथमिक परीक्षेतील टॉप 1500 उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षेतील पात्र 500 उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी (LPT) साठी शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • LPT: LPT साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाईल

RBI सहाय्यक भरतीसाठी महत्वाच्या टिप्स?

  • रिझर्व बँक ऑफ इंडिया सहाय्यक पदासाठी अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोंबर 2023 ही देण्यात आलेली असून आजपासून 4 ऑक्टोंबर पर्यंत परीक्षा शुल्क भरून घेण्यात येणार आहे.
  • 21 ऑक्टोंबर 2023 ते 23 ऑक्टोबर 2023 या काळात उमेदवारांची पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
  • मुख्य परीक्षा दोन डिसेंबर 2023 रोजी घेण्यात येईल.
  • पूर्व परीक्षेत पात्र उमेदवारांनाच मुख्य परीक्षा देता येणार आहे.
  • मुख्य परीक्षेसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना भाषा प्राविण्य चाचणी द्यावी लागणार आहे.

RBI सहाय्यक भरती 2023 पगार आणि फायदे?

रिझर्व बँक ऑफ इंडिया सहाय्यकाला प्रारंभिक पगार INR 35,400 प्रति महिना आहे. RBI इतर अनेक फायदे देखील देते, जसे की: प्रॉव्हिडंट फंड, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय विमा, प्रवास भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी.

RBI सहाय्यक भरती 2023 परीक्षा नमुना आणि अभ्यासक्रम?

प्राथमिक परीक्षा:

प्राथमिक परीक्षा ही संगणक-आधारित चाचणी (CBT) असेल ज्यामध्ये 100 बहु-निवडक प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 1 तास 30 मिनिटांचा असेल.

मुख्य परीक्षा:

मुख्य परीक्षा ही CBT असेल ज्यामध्ये 200 बहु-निवडक प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी 2 तास 30 मिनिटे असेल.

अभ्यासक्रम:

RBI सहाय्यक भर्ती 2023 परीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील विषयांचा समावेश असेल सामान्य जागरूकता, परिमाणात्मक योग्यता, तर्क करण्याची क्षमता, तर्क करण्याची क्षमता, इंग्लिश भाषेचे आकलन इत्यादी.

Leave a Comment