Rationing Shops Used As Mini Bank
बँका मार्फत विविध वित्तीय संस्था च्या संयोगाने ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून दिले जाईल सर्व व्यवहार हे ऑनलाईन पद्धतीने सुलभ व जलद गतीने ग्राहकांना दिले जातील व नागरिकांना दुकानांमध्ये दुकान अशा प्रकारची सुविधा प्राप्त होईल यामुळे शंभर टक्के डिजिटल व्यवहार होतील आणि नागरिकांना ज्या बँकिंग सुविधा असतील या सहजरित्या उपलब्ध होतील.
शासन निर्णयानुसार राष्ट्रीयकृत बँका इंडियन पोस्ट पेमेंट बँक टपाल विभाग संचार मंत्रालय भारत सरकार व खाजगी बँका यांच्या सेवा राज्यातील सर्व शिधावाटप दुकाना मार्फत नागरिकांना देण्यात येईल याची शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे याच्यासाठी पुढे सर्व शिधावाटप दुकानदार आणि बँकांमध्ये करार केला जाईल व सर्व शिधावाटप दुकानदारांना याच्याबद्दल प्रशिक्षण पण देण्यात येईल याच्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना गावातच आता बँकिंग सुविधा प्राप्त होणार आहे व रेशन दुकानदाराला उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत पण निर्माण होणार आहे असा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय तुम्ही maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.