Ration Shop Will Become Mini Bank: सर्वसामान्यांसाठी रेशन दुकानात मिळणार आता मिनी बँकिंग सुविधा

Ration Shop Will Become Mini Bank: नमस्कार मित्रांनो राज्यातील रेशन दुकानांना आता बँकेचे स्वरूप प्राप्त होणार आहे राज्यातील सर्व रेशन दुकानांमधून राष्ट्रीयकृत बँक इंडिया पोस्ट पेमेंट बँक व खाजगी बँकांच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सुविधा सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून यासाठी मंजुरी देण्यात आली आहे याच्या संदर्भातील शासन निर्णय 20 जून 2023 या रोजी काढण्यात आला आहे.

मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहेच रेशन दुकानांमध्ये नेहमी सर्व सामान्य नागरिकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रेशन दुकानांमध्ये जर अशा प्रकारच्या सुविधा मिळाल्या तर ते त्यांच्यासाठी फायदेशीर बाब आहे व अशा प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिल्यामुळे रेशन दुकानदारांना पण याचा नक्कीच फायदा होईल व त्यांच्या उत्पन्नामध्ये पण वाढ होईल यामध्ये सर्वसामान्य नागरिक आणि रेशन दुकानदार या दोघांचा विचार करून राज्य शासनाने सुंदर असा शासन निर्णय काढला आहे या शासन निर्णयाचा दोघांनाही फायदा होईल.

राज्य शासनाच्या माध्यमातून इंडिया पोस्ट पेमेंट बँक त्याचप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका व सूचीबद्ध केलेल्या खाजगी बँका यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा ह्या रेशन दुकानदाराच्या माध्यमातून देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे यामुळे रेशन दुकानदारांना जास्तीचा महसूल प्राप्त होईल व सर्व सामान्य नागरिकांना या सुविधा सहजरित्या प्राप्त होतील.

👇💥👇💥👇💥👇

कोणत्या सुविधा मिळतील व काय आहे शासन निर्णय पहा

Leave a Comment