Ration card Update 2023: राशन ऐवजी खात्यात पैसे वितरण सुरू, लवकर करा अर्ज

Ration card Update 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये केसरी राशन कार्ड  (शिधापत्रिका) धारकांना शासनाच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला रेशन ऐवजी दीडशे रुपये म्हणजेच वर्षाला 1800 रुपये शिधापत्रिका धारकांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात येणार आहे याबद्दलचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

यासाठी राज्य शासनाकडून शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला आपल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन या योजनेसाठी फॉर्म भरून घेण्यात घ्यायचा आहे हा फॉर्म भरून दिल्यानंतर आपल्या घरातील रेशन कार्ड वरील जेवढे लाभार्थी असतील प्रत्येक लाभार्थ्यानुसार आपल्या खात्यामध्ये जी रक्कम तयार होईल ती दीडशे रुपयांच्या प्रमाणे कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्यामध्ये जमा होईल

कधीपासून पैसे येण्यास सुरुवात होईल?

मित्रांनो राज्यातील केशरी रेशन कार्ड शिधापत्रिका धारकांना रेशन ऐवजी बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा शासन निर्णय काढला आहे याची अंमलबजावणी जानेवारी 2024 पासून या शिधापत्रिकाधारकांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला वार्षिक 1800 रुपये त्याच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मराठवाड्यातील 14 जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांना या योजनेचा लाभ होणार आहे.

 योजनेसाठी अर्ज कोण करू शकतो?

या योजनेसाठी महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यातील 14 जिल्ह्यांचा समावेश आहे या जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारका धारक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत जर समजा तुमच्या घरामध्ये रेशन कार्ड मध्ये दहा लोकांची नावे असतील तर तुम्हाला फक्त जो कुटुंब प्रमुख असेल त्यानेच फॉर्म भरावा लागेल व ही जी रक्कम येणार आहे ती कुटुंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल जर तुमच्या कुटुंबात दहा व्यक्ती असतील तर प्रत्येक व्यक्तीच्या नावाने दीडशे रुपये तर दहा व्यक्तींचे पंधराशे रुपये कुटुंबप्रमुखाच्या खात्यामध्ये जमा होती होतील.

अर्ज कसा करावा?

प्रत्येक जिल्ह्यातील केशरी रेशन कार्ड धारकांनी आपापल्या रेशन दुकानदाराकडे जाऊन या योजनेसाठीचा फॉर्म भरून घ्यावा हा फॉर्म आपल्याला रेशन दुकानदारा जवळच मिळेल हा फॉर्म व्यवस्थित भरून घेतल्यानंतर तो रेशन दुकानदाराजवळच जमा करावा लागेल त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला जानेवारी 2024 पासून रेशन ऐवजी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल

निष्कर्ष:

ज्या जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांनी याबद्दलचा फॉर्म भरून घेतला असेल अशा शिधापत्रिकाधारकांना राज्य शासनाकडून दिला गेलेला निधी जमा करण्यात येत आहे या जिल्ह्यातील लोकांचे अद्यापही फॉर्म भरले नसून नाहीत अशा लोकांनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरून घ्यावे या योजनेचा लाभ घ्यावा आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल इतरांनाही माहिती नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या गोष्टीचा फायदा होईल.

 

Leave a Comment