Ration Card New Changes
रेशन कार्ड योजनेचे नवीन नियम
भारत सरकारने नुकतेच 2023 मध्ये रेशन कार्ड म्हणजेच (शिधापत्रिकां) नवीन नियम लागू केले आहेत. हे नियम शिधापत्रिका प्रणाली अधिक कार्यक्षम बनवणे आणि केवळ पात्र कुटुंबांनाच अनुदानित धान्य मिळावे यासाठी आहे.
रेशन कार्ड च्या पात्रतेसाठी उत्पन्नाचे नियम कडक करण्यात आले आहेत शहरी भागात राहणाऱ्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे तीन लाखांपेक्षा जास्त नसावे व ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखांपेक्षा जास्त नसावे हा नियम लागू करण्यात आला आहे.
ज्या कुटुंबात चार चाकी वाहन आहे असे कुटुंब यापुढे रेशन कार्ड साठी पात्र राहणार नाहीत असा नवीन नियम लागू करण्यात आला आहे.
सर्व रेशन कार्ड हे आधार कार्डशी संलग्न करण्यात येणार आहेत ज्यामुळे यामुळे शिधापत्रिकांचा गैरवापर रोखण्यास मदत होईल व केवळ पात्र कुटुंबांनाच अनुदानित धान्य मिळेल याची खात्री होईल