नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण प्रदोष व्रत बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत या पोस्टच्या माध्यमातून आपण Pradosh Vrat कसा केला जातो प्रदोष व्रत महत्त्व काय आहे प्रदोष व्रत कोण करू शकते ,एकूण किती प्रदोष व्रत असतात, प्रदोष व्रताची पूजा कशी केली जाते, प्रदोष व्रतामध्ये काय खावे आणि प्रदोष व्रत उद्यापन कशाप्रकारे करता येईल अशा अनेक गोष्टींची माहिती आपण पाहणार आहोत तर ही पोस्ट व्यवस्थित रित्या वाचून घ्या.
Pradosh Vrat
मित्रांनो आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक सारे व्रत आहेत त्यापैकी एक महत्त्वाचा व्रत म्हणजे प्रदोष व्रत हा व्रत देवाधिदेव महादेव आणि माता पार्वती यांची कृपादृष्टी आपल्यावरती व्हावी यासाठी हा व्रत केला जातो हा व्रत केल्याने आपल्या आयुष्यातील दुःखे निघून जातात असे शिवमहापुराण मध्ये सांगितले आहे.
प्रत्येक महिन्यामध्ये जशा दोन एकादशी येतात तशाच प्रकारे दर महिन्याला दोन प्रदोष सुद्धा येतात शिवमहापुराणांमध्ये प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे या दिवशी भगवान शंकराची पूजा विधिपूर्वक केली जाते आणि हिंदू धर्मात प्रदोष व्रताला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते दर महिन्यात दोन प्रदोष येतात या दिवशी महादेवाची आणि देवी पार्वतीची पूजा विधिपूर्वक केली जाते हिंदू पंचांगानुसार शुक्ल पक्षाच्या त्रयोदशीला प्रदोष असतो सूर्य मावळण्यापूर्वीच्या तीन घटकांच्या काळाला प्रदोष असे म्हणतात.
प्रदोष व्रत लिस्ट २०२३
सोमवार | 3 एप्रिल 2023 |
सोमवार | 17 एप्रिल 2023 |
बुधवार | 3 मे 2023 |
बुधवार | 17 मे 2023 |
गुरुवार | 1 जून 2023 |
गुरुवार | 15 जून 2023 |
शनिवार | 1 जुलै 2023 |
शनिवार | 15 जुलै 2023 |
रविवार | 30 जुलै 2023 |
रविवार | 13 ऑगस्ट 2023 |
सोमवार | 28 ऑगस्ट 2023 |
मंगळवार | 12 सप्टेंबर 2023 |
बुधवार | 27 सप्टेंबर 2023 |
गुरुवार | 12 ऑक्टोबर 2023 |
गुरुवार | 26 ऑक्टोबर 2023 |
शुक्रवार | 10 नोव्हेंबर 2023 |
शनिवार | 25 नोव्हेंबर 2023 |
रविवार | 10 डिसेंबर 2023 |
रविवार | 24 डिसेंबर 2023 |
प्रदोष व्रत आणि त्यापासून मिळणारे फायदे?
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच प्रदोष प्रत्येक महिन्यामध्ये दोन येतात आणि वर्षांमध्ये 24 प्रदोष येतात Pradosh Vrat करण्यामागचे वेगवेगळी कारणे आहेत प्रदोष हे वारानुसार असतात आणि त्याची फळे पण आपल्याला वेगवेगळी मिळतात.
सोमप्रदोष
मित्रांनो जर प्रदोष सोमवारी आला असेल तर त्याला सोम प्रदोष म्हटले जाते आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण सोम प्रदोष व्रत करू शकता हे केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा देवाधिदेव महादेव पूर्ण करतात असे स्कंद पुराणांमध्ये सांगितले आहे.
मंगळ प्रदोष
मित्रांनो जर प्रदोष मंगळवारी येत असेल तर त्याला मंगळ प्रदोष असे म्हटले जाते मंगळ प्रदोष व्रत हे ज्या लोकांना आजार आहे आणि आजारापासून मुक्ती हवी असेल तर त्यासाठी आपण मंगळ प्रदोष व्रत करू शकता.
बुध प्रदोष
जर प्रदोष बुधवारी येत असेल तर त्याला बुध प्रदोष असे म्हटले जाते आपल्या मनातील सर्व इच्छा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण बुद्ध प्रदोष प्रत सुरुवात करू शकता.
गुरु प्रदोष
जर प्रदोष गुरुवारी येत असेल तर त्याला गुरु प्रदोष असे म्हटले जाते आपल्या जीवनातील शत्रू कायमस्वरूपी निघून जावे असे वाटत असेल तर त्यासाठी गुरु प्रदोष व्रत सुरू करावा याने भगवान शंकराची कृपादृष्टी आपल्यावरती पडेल आणि आपल्या आयुष्यातून आपले शत्रू निघून जातील
शुक्र प्रदोष
जर प्रदोष हा शुक्रवारी येत असेल तर त्याला शुक्र प्रदोष असे म्हटले जाते आपल्या जीवनात सुख शांती धन प्राप्ती यासाठी आपण शुक्र प्रदोष व्रत सुरू करू शकता ज्याने देवादी देव महादेव यांची कृपादृष्टी आपल्यावरती होऊन आपल्या जीवनात सुख शांती व समृद्धी येऊ शकते.
शनि प्रदोष
जर प्रदोष शनिवारी येत असेल तर त्याला शनी प्रदोष असे म्हटले जाते. शनी प्रदोष व्रत हा ज्या लोकांना मूल होत नसेल अशा लोकांनी जर शनी प्रदोष व्रत केले तर शंकराची कृपादृष्टी होऊन त्यांना मूलप्राप्ती होण्यासाठी हा व्रत केला जातो.
रवी प्रदोष
जर प्रदोष रविवारी येत असेल तर त्याला रवी प्रदोष असे म्हटले जाते रवी प्रदोष व्रत केल्याने जगातील कोणताही व्यक्ती आपली दुःख परेशानी दूर करू शकत नाही ते देवाधिदेव महादेव रवी प्रदोष व्रत केल्याने आपली कृपादृष्टी दाखवून ते दूर करतात
प्रदोष व्रत कोण करू शकतो?
प्रदोष व्रत हा भगवान शंकराला समर्पित असल्यामुळे आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण हा व्रत करतो हा व्रत लहान मुले मुली स्त्री पुरुष प्रौढ व्यक्ती कोणीही हे व्रत करू शकतो.
प्रदोष काळ टाईम
मित्रांनो खूप जणांना हा प्रश्न निर्माण होतो की प्रदोष काळ कधीपासून सुरू होतो आणि कधी संपतो तर मित्रांनो प्रदोष काळ हा सूर्य सूर्यास्त होण्यापूर्वी 30 मिनिट अगोदर पासून प्रदोष काळाला सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर 30 मिनिटानंतर प्रदोष काळ संपतो म्हणून प्रदोष काळामध्येच पूजा करावी
प्रदोष व्रताच्या पूजेसाठी साहित्य?
- पूजेचे ताट
- कुंकू
- अभिर
- गुलाल
- अष्टगंध
- लाल चंदन
- पिवळ चंदन
- अक्षदा (विना तुकडे पडलेले तांदूळ)
- बेल पाने
- धोत्र्याचे फुल
- तांब्याच्या तांब्या
- एक तांब्या पाणी
- शमीपत्र
- पंचामृत
प्रदोष व्रताची पूजा कशी करावी?
प्रदोष व्रताची पूजा ही प्रदोष काळादरम्यान केली जाते प्रदोष काळाची सुरुवात ही सूर्यास्त होण्यापूर्वी तीस मिनिटांपासून सुरुवात होते आणि सूर्यास्त झाल्यानंतर तीस मिनिटांपर्यंत आपण प्रदोष व्रताची पूजा करू शकतो प्रदोष व्रताची पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला शंकराच्या शिवलिंगा वरती पंचामृत अर्पण करावे व ते पंचामृत दोन्ही हाताने शिवलिंगाला व्यवस्थित लावून घ्यावे त्यानंतर शिवलिंगावरती एक तांब्या जल म्हणजेच पाणी अर्पण करून घ्यावे शिवलिंग स्वच्छ धुऊन घेतल्यानंतर त्यावरती आपण हळदी कुंकू गुलाल हे शिवलिंगाला व्यवस्थित रित्या लावून घ्यावे व त्यानंतर आपण विभूती शिवलिंगावर ती लावून घ्यावी आणि त्यावरती हळदी कुंकू लावावे त्यानंतर शमीपत्र आणि बेलपत्र शिवलिंगावर ती अर्पण करून घ्यावे व त्यानंतर जी फुले आपण सोबत घेऊन गेला आहात ती धोत्र्याची फुले शिवलिंगावर ती अर्पण करावेत आणि देवाची आरती करून घ्यावी आणि देवाला साखरेचा किंवा खिरेचा नैवेद्य दाखवावा आणि देवासमोर प्रार्थना करावी.
प्रदोष व्रत आरती?
जय शिव ओंकारा ॐ जय शिव ओंकारा ।
ब्रह्मा विष्णु सदा शिव अर्द्धांगी धारा ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
एकानन चतुरानन पंचानन राजे ।
हंसानन गरुड़ासन वृषवाहन साजे ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
दो भुज चार चतुर्भुज दस भुज अति सोहे।
त्रिगुण रूपनिरखता त्रिभुवन जन मोहे ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
अक्षमाला बनमाला रुण्डमाला धारी ।
चंदन मृगमद सोहै भाले शशिधारी ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
श्वेताम्बर पीताम्बर बाघम्बर अंगे ।
सनकादिक गरुणादिक भूतादिक संगे ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
कर के मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धर्ता ।
जगकर्ता जगभर्ता जगसंहारकर्ता ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका ।
प्रणवाक्षर मध्ये ये तीनों एका ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
काशी में विश्वनाथ विराजत नन्दी ब्रह्मचारी ।
नित उठि भोग लगावत महिमा अति भारी ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
त्रिगुण शिवजीकी आरती जो कोई नर गावे ।
कहत शिवानन्द स्वामी मनवांछित फल पावे ॥ ॐ जय शिव ओंकारा॥
प्रदोष व्रतात संध्याकाळी काय खावे?
मित्रांनो हिंदू धर्मातील सर्वात लाभदायी व्रत म्हणजे प्रदोष व्रत या वृत्तामध्ये आपल्याला निरंकार व्रत करावा लागतो यामध्ये आपल्याला जेवण करता येत नाही फक्त आपल्याला फळावरती उपवास सोडावा लागतो फळा व्यतिरिक्त आपण दुसरे काहीही खाऊ शकत नाहीत आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला मिठाचा एकही पदार्थ खाता येत नाही.
प्रदोष व्रताचे उद्यापन कसे करावे?
जेव्हा आपण प्रदोष व्रताला सुरुवात करतो त्यानंतर अकरा प्रदोष व्रत किंवा 26 प्रदोष व्रत पूर्ण झाल्यानंतर आपण उद्यापन करू शकतो उद्यापन करण्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला गणपतीची पूजा करावी लागते व उद्यापनदिवशी आपल्याला दोन ब्राह्मण जोडीने आपल्या घरी बोलवावे लागतील त्यांच्या पायावरती पाणी अर्पण करून हळदी कुंकू लावून पूजा करावी त्यानंतर ज्या ठिकाणी आपण प्रदोष व्रताचे उद्यापन करणार आहात त्या ठिकाणी छोटासा मंडप टाकून घरातल्या घरात तिथे देवाची स्थापना करावी आणि तिथे सुंदर रांगोळी वगैरे काढून घेऊन प्रदोष व्रताची पूजा करावी आणि 108 वेळेस जी आपण खीर बनवणार आहात त्याची आहुती द्यावी लागेल आणि ब्राह्मणाद्वारे विधी पूर्वक मंत्रोपचार करून 108 वेळेस शंकराचे नाव घेऊन तुम्हाला शंकराला भोग लावावा लागेल किंवा अहो ती द्यावी लागेल.
व त्यानंतर ब्राह्मणांना जोडीने जेवण्यास विनंती करावी जेवण करून त्यांना दक्षिणा द्यावा व त्यांच्या पायावरती मस्तक टिकून त्यांच्याकडून आशीर्वाद घ्यावा व आपल्या डोक्यावरती तांदूळ किंवा अक्षदा टाकण्यास सांगाव्या आणि देवाची देव महादेवाला प्रार्थना करावी अशा प्रकारे उद्यापन करू शकता किंवा उद्यापन संपन्न होईल.
हे पण वाचा: पशुपती व्रत कसा करावा संपूर्ण माहिती
प्रदोष व्रत किती दिवस ठेवावे?
आपल्यापैकी अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होत असेल की प्रदोष व्रत सुरू केल्यानंतर किती प्रदोष व्रत आपण करू शकतो आणि त्यानंतर त्याचे उद्यापन कधी करावे आपल्या सर्वांना माहीत असेलच एक महिन्यांमध्ये दोन प्रदोष येतात तर आपण कमीत कमी 11 प्रदोष व्रत करू शकता किंवा जास्तीत जास्त 26 प्रदोष व्रत करावे आणि त्यानंतर त्याचे उद्यापन करावे.
निष्कर्ष:
आशा करतो की ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण Pradosh Vrat कसे करावे व्रतामध्ये काय खावे कोण व्रत करू शकते पूजेची सामग्री पूजा कशी करावी याबद्दल आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की इतरांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा होईल आणि आम्हाला पण कमेंट करून कळवा धन्यवाद
FAQ:-
प्रश्न:- प्रदोष व्रतात काय खावे आणि काय खाऊ नये?
उत्तर:- प्रदोष काळात उपवास करताना फक्त हिरवा मूग खावा, प्रदोष व्रतात साधे मीठ खाऊ नये. आपण पूर्ण उपवास फळ आहार देखील करू शकता.
प्रश्न:- प्रदोष व्रत किती वर्ष करावा?
उत्तर:- जास्तीत जास्त एक वर्ष 11 किंवा 26 प्रदोष करू शकता.
प्रश्न:-प्रदोष काळाची वेळ कोणती?
उत्तर:- प्रदोष काळाची योग्य वेळ सूर्यास्त होण्यापूर्वी तीस मिनिट अगोदर आणि सूर्यास्त झाल्यानंतर तीस मिनिटापर्यंत
1 thought on “Pradosh Vrat 2023 | प्रदोष व्रत संपूर्ण माहिती”