Pmkisan 14th Installment Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या गोष्टीची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे पी एम किसान योजनेचा येणारा पुढील 14 वा हप्ता अखेर प्रतीक्षा संपली प्रधानमंत्री पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हप्त्याची अखेर तारीख झाली निश्चित या तारखेला येईल तुमच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा हप्ता जमा करण्यात येईल.
अखेर प्रतीक्षा संपली
मित्रांनो पी एम किसान सन्माननिधी योजनेचा येणारा पुढील 14 वा हप्ता हा निश्चित करण्यात आलेला असून तो 28 जुलै 2023 रोजी सकाळी 11:00 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देण्यात येणार आहे आतापर्यंत जवळपास 13 हप्ते हे देशातील शेतकरी बांधवांना देण्यात आले होते परंतु अद्यापही चौदावा हप्ता हा दिला गेला नव्हता यासाठी शेतकरी बांधव हे आतुरतेने वाट पाहत होते आता त्यांच्या प्रतीक्षेला रोख लागली आहे.
पी एम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता हा अनेक साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नव्हता अनेक सारे शेतकरी यापासून वंचित राहिले होते त्याचे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या बेनिफिशियरी स्टेटस पाहिले असता अनेक साऱ्या शेतकऱ्यांच्या ईटीवायसी केल्या गेल्या नव्हत्या त्यासोबतच त्यांच्या शेतजमिनीचे लँड शेडिंग केले गेलेले नव्हते तसेच काही शेतकऱ्यांचे त्यांच्या बँक खात्याला अकाउंट नंबर लिंक केला गेलेला नव्हता असे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मागील हप्ता जमा करण्यात आला नव्हता.
यासाठी केंद्र सरकारकडून तसेच राज्य सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांना याबद्दलचे निर्देश देण्यात आले होते सध्या देशातील व राज्यातील शेतकऱ्यांनी या गोष्टींची बाब लक्षात घेऊन आपली एक केवायसी तसेच बेनिफ लँड शेडिंग तसेच आपल्या बँक खात्याला आपले अकाउंट नंबर लिंक करून घेतले आहेत असे जवळपास साडेआठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणारा पुढील 14 वा हप्ता हा 28 जुलै रोजी त्यांच्या बँक खात्यामध्ये सकाळी 11 वाजता वितरित केला जाणार आहे.
मागील राहिलेला हप्ता मिळेल का नाही?
मित्रांनो मागील राहिलेला तेरावा हप्ता अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला नव्हता अशा शेतकऱ्यांनी जर आपली पूर्ण केली असेल तसेच केंद्र सरकारकडून व राज्य शासनाकडून जे निर्देश देण्यात आले होते ते जर पूर्ण करण्यात आले असतील तर अशा लाभार्थी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा मागील हप्ता तसेच येणारा पुढील हप्ता हे दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत.
नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळेल?
मित्रांनो नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना ही राज्य शासनाकडून महाराष्ट्र राज्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे या योजनेचा हप्ता आपल्याला कधी मिळेल असे अनेक प्रश्न राज्यातील शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असतील तर आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता 14 जुलै 28 जुलै 2023 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील व देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे त्याच तारखेला राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्या उपस्थितीत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वितरित करण्यात येणार आहे.
कोणते शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत?
महाराष्ट्र राज्यात अनेक शेतकरी बांधव असे आहेत जे मयत झाले आहेत अशा अनेक शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही अशी शेतकरी या दोन्ही योजनेसाठी अपात्र असतील याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी.