Pm Kisan Next Installment Date

Pm Kisan Next Installment Date

शेतकरी मित्रांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता चार महिन्यांमध्ये एकदा व वर्षांमध्ये तीनदा अशाप्रकारे वितरित केला जातो याच्यामध्ये एप्रिल मे जून आणि जुलै च्या हप्त्यासाठी शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत जवळपास जून महिना हा संपत आलेला असून आणि या योजनेचा शेवटचा महिना असेल तो म्हणजे जुलै महिना जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्याचा वितरण करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याचा वितरण करत असताना महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार रुपयांचे वितरण नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे पी एम किसान सन्मान निधी व नमो शेतकरी सन्मान निधी दोन्ही योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना आता चार हजार रुपये मिळणार असून म्हणून सर्व शेतकरी या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

सध्या पाहिले तर खरिपाची पेरणी तोंडावर आलेली असून अशातच पावसाने पण येण्यास उशीर केलेला आहे सध्याची परिस्थिती पाहिली तर खरिपाची पेरणी तोंडावर आलेली आहे आणि मान्सूनने पण येण्यास उशीर केलेला असून शेतकऱ्यांना अशा काळामध्ये पैशांची गरज आहे आणि अशातच या हप्त्याची वितरण अद्यापही झालेले नसून शेतकऱ्यांमध्ये याबद्दलची नाराजी दिसत आहे.