Pm Kisan Ekyc Update: पी एम किसान योजनेत झाला मोठा बदल ना ओटीपी ना फिंगरप्रिंट

Pm Kisan Ekyc Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो किसान योजनेमध्ये मोठा व शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बदल करण्यात आला आहे या बदलामुळे देशातील व राज्यातील लाखो शेतकरी अपात्र होतील अशी भीती होती अशा लाखो शेतकऱ्यांना व पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना निश्चितच याचा फायदा होईल असा मोठा बदल करण्यात आला आहे.

मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना पात्र होण्यासाठी इ केवायसी करणे फिजिकल वेरिफिकेशन करणं शेतकऱ्यांना काही अटी घालण्यात आलेल्या आहेत आपणाला माहित आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा फिजिकल व्हेरिफिकेशन झालेला आहे तसेच त्यांची केवायसी पण झालेली आहे पण आपल्या राज्यात असे काही शेतकरी आहेत जे वयोवृद्ध आहेत आणि अद्याप त्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही व ई केवायसी पण झालेली नाही या कारणास्तव हे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत.

कारण ते शेतकरी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांचं आधार कार्ड ला मोबाईल लिंक करणे हे शक्य होत नाही तसेच बायोमेट्रिक मार्फत त्यांची ई केवायसी करणं सुद्धा शक्य होत नाही यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून व राज्य शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी शिबिर आयोजन करून करण्यात आली होती तरीही त्यांची केवायसी झाली नाही मग अशी शेतकरी या योजनेसाठी अपात्र होतील याची चिंता ही शेतकऱ्यांना पडली होती.

कृषी विभागाच्या माध्यमातून केंद्र शासनाला व राज्य शासनाला याबद्दलची विचारणा केली त्यावरती केंद्र शासनाने आता पीएम किसान योजनेच्या एप्लीकेशन मध्ये बदल करण्यात आले आहेत ज्याच्या माध्यमातून अशा वृद्ध शेतकऱ्यांना केवायसी करताना कुठल्याही प्रकारचा ओटीपी कुठल्याही प्रकारचा बायोमेट्रिक देण्याची गरज नाही त्या शेतकऱ्यांचा फोटो घेऊन फेस कॅम्प मार्फत केवायसी करणे शक्य होणार आहे.

घरबसल्या कशाप्रकारे करता येईल इ केवायसी पहा

Leave a Comment