Pm Kisan Beneficiary Status
मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा तेरावा हप्ता जमा झाला नव्हता त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला आहे की पुढील हप्ता आपल्याला जमा होईल की नाही तर शेतकऱ्यांनी आपल्या खात्याची लाभार्थी स्थिती अशा पद्धतीने चेक करून घ्या यासाठी सर्वप्रथम आपल्याला पी एम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती जावे लागेल या पोर्टलच्या मुखपृष्ठावरती उजव्या कोपऱ्यात आपल्याला पर्याय दिले जातील खाली दिलेल्या इमेज मध्ये पाहू शकता.
यामध्ये नवीन रजिस्ट्रेशनचा पहिला पर्याय आहे ज्यामध्ये आतापर्यंत शेतकऱ्याने पी एम किसान योजनेचा लाभ घेतला नसेल अशा शेतकऱ्यांनी तो पर्याय निवडून त्यामध्ये आपले सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यावी व रजिस्ट्रेशन करून घ्यावे.
दुसरा पर्याय हा केवायसी चा दिला आहे या मार्फत ज्या शेतकऱ्यांचे केवायसी झालेली नाही अशा शेतकऱ्यांनी हा पर्याय निवडून तिथे आपली केवायसी करून घ्यावी किंवा आपल्या खात्याची केवायसी झाली आहे का नाही सध्याची स्थिती काय आहे याबद्दलची माहिती पण या पर्यायाद्वारे आपण सुनिश्चित करू शकता
गेट डेटा वरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या खात्याचा सर्व तपशील दिसू नये यावरती आपली केवायसी हिरव्या कलर मध्ये दिसत असेल लँड सीडींग हिरव्या कलर मध्ये दिसत असेल तर आपला पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होईल.