Pikvima Update: या जिल्ह्यात अखेर पिक विमा वाटप, उशिरा क्लेम केलेले शेतकरी पात्र

Pikvima Update: खरीप पिक विमा 2022 मधील एक महत्त्वपूर्ण व दिलासादायक अपडेट आलेला आहे मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील उशिरा केलेल्या व इतर कारणास्तव अपात्र केले गेलेले क्लेम पिक विमा कंपनीच्या माध्यमातून मंजूर केले गेले आहेत आशा बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून पिक विमा वाटप करण्याची मंजुरी देण्यात आली आहे यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 70 कोटी 14 लाख रुपये पिक विमा वाटप करण्यात येणार आहे.

मित्रांनो 2022 मध्ये विविध भागांमध्ये अतिवृष्टी राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला होता व यामध्ये शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते मित्रांनो अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषानुसार अतिवृष्टीची नुकसान भरपाई मिळालेली आहे अशा शेतकऱ्यांना पण पिक विमा कंपनीच्या माध्यमातून उशिरा केलेले क्लेम व इतर काही कारणे दाखवून शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले होते यासाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आले होते.

प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रतिनिधींच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता यामुळे राज्य शासनाच्या विनंतीनुसार पिक विमा कंपनीने हे दावे मंजूर केले आहेत यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून 70 कोटी 14 लाख रुपयांचे नुकसान भरपाई चे वाटप करण्यात येणार आहे.

इतर कोणत्या जिल्ह्यांना पिक विमा वाटप केले जाईल पहा

Leave a Comment