पीएचडी संपूर्ण माहिती | PhD Course Information

PHD Course Complete Information in Marathi

मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याचे एक स्वप्न असते ते म्हणजे जास्तीत जास्त शिक्षण घेऊन प्रामाणिकपणे जॉब करणे व स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे नाव मोठे करावे जर तुम्ही एखाद्या विषयाचा अभ्यास करून त्यामध्ये डिग्री मिळवण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला त्या कोर्स बद्दल संपूर्ण माहिती असणे आवश्यक असते की हा कोर्स काय आहे हा कोर्स कसा केला जातो हा कोर्स करण्यासाठी काय पात्रता असावी लागते त्या कोर्स मध्ये काय काय शिकवले जाते तर मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या लेखामध्ये आपण अशाच एका कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत ज्याला पी एच डी असे म्हणतात

PhD Course Information

मित्रांनो पीएचडी हा एक खूप प्रसिद्ध कोर्स आहे पीएचडी ला डॉक्टर ऑफ फिलोसोफी असे म्हणतात हा कोर्स पूर्ण केल्यावर व्यक्तीच्या नावासमोर डॉक्टर हा शब्द जोडला जातो पण याचा अभ्यासक्रम खूप अवघड आहे हा कोर्स पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम घ्यावे लागतील आणि सोबतच संयम पण ठेवावा लागेल कारण हा डिग्री कोर्स आपण डायरेक्ट करू शकत नाहीत यासाठी सुरुवातीला तुम्हाला शालेय शिक्षण तसेच कॉलेज शिक्षण पूर्ण करावे लागेल त्यानंतरच तुम्ही पीएचडी कोर्स करू शकता.

पीएचडी काय आहे? What is a Ph.D.?

मित्रांनो पीएचडी हा एक डॉक्टर डिग्री कोर्स आहे ज्यामध्ये तुम्हाला कुठल्याही एका विषयाचा अभ्यास करावा लागतो पीएचडी हा कोर्स तीन वर्षाचा असतो जो तुम्ही सहा वर्षांमध्ये पूर्ण करू शकता हा कोर्स पूर्ण केल्यावर तुमच्या नावासमोर डॉक्टर हा शब्द जोडला जातो मित्रांनो तुम्ही ज्या विषयांमधून पीएचडी कोर्स पूर्ण कराल त्या विषयाबद्दल तुम्हाला भरपूर ज्ञान प्राप्त होते व त्या विषया मधील तज्ञ म्हणून तुम्हाला ओळखले जाते.

पीएच.डी कोर्स करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? What Qualifications Are Required To Do Ph.D Course?

मित्रांनो पीएचडी कोर्स करण्यासाठी तुमचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले असावे लागते त्यासोबतच तुमचे पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच मास्टर डिग्री मध्ये किमान 55% मार्क्स तुम्हाला असायला हवेत तरच तुम्ही पीएचडी कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी पात्र ठरू शकता. जर तुम्ही एस सी एस टी किंवा ओबीसी वर्गा मधून असाल तर तुम्हाला ५% सवलत मिळते म्हणजेच तुम्हाला मास्टर डिग्री मध्ये 50% मार्क असतील तरी पण तुम्ही पीएचडी कोर्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता

मित्रांनो तुम्ही ज्या विषयांमध्ये पीएचडी करण्याचा विचार करत आहात त्याच विषयांमधून तुमची मास्टर डिग्री पूर्ण झालेली असावी लागते त्यासोबतच नेट आणि जेआरएफ आणि एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते त्यानंतर तुम्ही विश्वविद्यालया मधून पीएचडी कोर्स करू शकता.

पीएचडी कोर्स करण्यासाठी वयाची मर्यादा काय आहे? What Is The Age Limit For Doing PhD Course

मित्रांनो पीएचडी हा एक कोर्स आहे यासाठी कोणतीही वय मर्यादा नाही हा कोर्स तुम्ही कधीही करू शकता फक्त यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेले असावे मग तुम्ही कोणत्याही वयामध्ये हा कोर्स करू शकता.

कोण-कोणत्या विषयांमध्ये आपण पीएचडी करू शकतो? In What Subjects Can You Do PhD?

मित्रांनो तुम्हाला जर पीएचडी करायची असेल असेल तर तुम्हाला एक विषय निवडावा लागेल पीएचडी करण्यासाठी कोणता विषय घेतला पाहिजे हे पूर्णपणे तुमच्यावरती निर्भर करते आपल्या माहितीसाठी पीएचडी कोण कोणत्या विषयांमध्ये करता येते त्याबद्दल ची यादी खालील प्रमाणे दिली आहे.

 • इंग्लिश पीएचडी
 • हिंदी पीएचडी
 • इतिहास पीएचडी
 • कृषी पीएचडी
 • शरीरविज्ञान पीएचडी
 • रसायनशास्त्र पीएचडी
 • भौतिकशास्त्रात पीएचडी
 • बायोसायन्स पीएचडी
 • वाणिज्य व्यवस्थापन पीएचडी
 • व्यवसाय प्रशासन पीएचडी
 •  समाजकार्य पीएचडी
 •  कायदा पीएचडी

पीएचडी कोर्स करण्यासाठी फीस किती लागते? How Much Does It Cost To Do a PhD Course?

मित्रांनो पीएचडी कोर्स करण्यासाठी लागणारी फीस ही कॉलेज वरती ती निर्भर करते पण सरकारी कॉलेजमधून तुम्ही पीएचडी करण्याचा विचार करत असाल तर प्रत्येक वर्षाला 20000 हजार रुपये फिस आपल्याला द्यावी लागते पण प्रायव्हेट कॉलेजमधून पीएचडी करणार असाल तर तुम्हाला 25000 ते 40000 फिस जास्त घ्यावी लागते

पीएचडी कोर्स करण्याचे फायदे? Benefits of Doing PhD Course

 • मित्रांनो पीएचडी ला सर्वात मोठी डिग्री मानले जाते
 • पीएचडी कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्या विषयातील तज्ञ म्हणून ओळखले जाते
 • पीएचडी कोर्स केल्यानंतर तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून म्हणून काम करू शकता
 • पीएचडी कोर्स केल्यानंतर तुमच्या नावासमोर डॉक्टर हा शब्द जोडला जातो
 • पीएचडी केल्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्रातील संपूर्ण माहिती प्राप्त होते

पीएचडी केल्यानंतर काय करावे? What To Do After PhD

मित्रांनो पीएचडी केल्यानंतर खूप सारे करियरसाठी पर्याय आहेत ज्यामध्ये तुम्ही भविष्य घडवू शकता तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक म्हणून काम करू शकता मेडिकल संशोधन मध्ये हे करिअर करू शकता जर तुम्ही सरकारी नोकरी करण्याचा विचार करत असाल तर सरकारी सल्लागार या पदावर काम करू शकता.

पीएचडी केल्यानंतर तर कोणती नोकरी मिळू शकते? What Job Can Be Obtained After Doing PhD

 • मित्रांनो पीएचडी केल्यानंतर तुम्ही कॉलेजमध्ये किंवा विद्यापिठात प्राध्यापक म्हणून नोकरी करू शकता
 • तुम्ही कोणत्याही विभागांमध्ये सल्लागार म्हणून काम करू शकता
 • या व्यतिरिक्त तुम्ही प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा प्रायवेट कोचिंग क्लासेस मध्ये तुमच्या विषयाबद्दल शिकवू शकता
 • यापैकी कोणतीही नोकरी करून चांगले पैसे कमवू शकता

पीएचडी केल्यानंतर किती पगार मिळतो? How Much Salary Do You Get After Doing PhD?

मित्रांनो जर तुम्ही कॉलेजमध्ये किंवा विद्यापीठांमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करत असाल तर तुम्हाला महिन्याला 57000 ते 67000 पर्यंत पगार येऊ शकतो आणि सहायोगी प्राध्यापकाला महिन्याला 80000 ते 85000 हजार पगार मिळते.
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण पीएचडी कोर्स बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता व ही माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा घेता येईल.

Leave a Comment