Petrol And Diesel Price Today: पहा आपल्या शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव?

Petrol And Diesel Price Today: देशातील काही प्रमुख शहरांमध्ये जसे दिल्ली कोलकत्ता मुंबई आणि चेन्नई येथे गुरुवारी म्हणजेच आज 27 जुलै 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये थोडासा फरक दिसून आला आहे गेल्या काही महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर हे चीर होते परंतु प्रत्येक शहरांमध्ये त्याच्या किमतीमध्ये दररोज चढ उतार होत आहे असे आपल्याला पाहायला मिळत आहे त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यावर लागणारा तसेच ट्रान्सपोर्टेशन चा खर्च आणि तेथील स्थानिक कर या गोष्टींमुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये आपल्याला बदल पाहायला मिळत आहेत व हे बदल विविध क्षेत्रांमध्ये व विविध शहरांमध्ये बदललेले आपल्याला पाहायला मिळते.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये 21 मे रोजी देशात खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आपल्याला पाहायला मिळाले होते त्यावेळी वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्पादन शुल्क हे आठ रुपये लिटर आणि डिझेलवर सहा रुपये लिटरने कमी केले होते व मे 2022 मध्ये केंद्र सरकारच्या उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये इंधनावरील व्याज कमी केल्या कारणास्तव आपल्याला पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मध्ये फरक झालेला पाहायला मिळाला होता.

प्रमुख शहरानुसार आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव?

मुंबई

27 जुलै 2023 रोजी मुंबईत पेट्रोलची किंमत 0.15 रु ने कमी झाली आहे. आणि किंमत 106.31 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे आणि डिझेल किंमत 94.27 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

पुणे

27 जुलै 2023 रोजी पुण्यात पेट्रोलची किंमत 0.90 रुपयांनी कमी झाली आहे आणि किंमत 106.07 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे आणि 27 जुलै रोजी पुण्यात डिझेलच्या दरात 0.32 रुपयांची घट झाली असून डिझेलची किंमत 92.81 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे.

संभाजीनगर

27 जुलै 2023 रोजी औरंगाबादमध्ये पेट्रोलच्या किमतीत 0.28 रुपयांनी घट झाली असून पेट्रोलची किंमत 108.75 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे आणि 27 जुलै रोजी औरंगाबादमध्ये डिझेलच्या किमतीत 3.00 रुपयांनी घट झाली असून डिझेलची किंमत प्रति लिटर 93.02 रुपयांवर पोहोचली आहे.

नाशिक

27 जुलै 2023 रोजी नाशिकमध्ये पेट्रोलच्या दरात रु.0.78 ने घट झाली आहे आणि किंमत प्रति लिटर रु.106.22 वर पोहोचली आहे आणि 27 जुलै  रोजी नाशिकमध्ये डिझेलच्या दरात 0.21 रुपयांची घट झाली असून डिझेलची किंमत प्रति लिटर 93.27 रुपयांवर पोहोचली आहे.

नागपूर

27 जुलै 2023 रोजी नागपुरात पेट्रोलची किंमत 0.57 रुपयांनी कमी झाली आहे आणि किंमत 106.04 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे आणि 27 जुलै रोजी नागपुरात डिझेलची किंमत 0.26 रुपयांनी कमी झाली असून डिझेलची किंमत 92.88 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे

Leave a Comment