मोर पक्षी संपूर्ण माहिती 2023 | Peacock Information In Marathi

नमस्कार मित्रांनो ऑल इन वन मराठी च्या या पोस्टद्वारे आपण Peacock Information In Marathi मध्ये पाहणार आहोत यामध्ये मोरांच्या किती जाती आहेत मोर काय खातो आणि मोरा बद्दल काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील व त्यासोबतच काही लोक मोराची शेती करत आहेत त्याबद्दल पण आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.

Peacock Information In Marathi

Peacock Information In Marathi

मित्रांनो सर्वप्रथम आपण जाणून घेऊ मोरा बद्दल मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच असेल मोराला पक्षांचा राजा म्हटले जाते मोराचे हिरवे निळे पंख आणि त्याच्या डोक्यावरील तुला पाहून कोणताही व्यक्ती मोराच्या मोहात पडल्याशिवाय राहणार नाही कदाचित आपल्याला माहीत नसेल मोर हा कुकुटवर्गीय पक्षी असून त्याला वैज्ञानिक नाव पाव क्रिस्टेटस असे दिले गेले आहे

इंग्रजीमध्ये मोराला Peacock असे म्हटले जाते व संस्कृत मध्ये मोराला मयूर असे नाव दिले गेले आहे मोर पक्षी संपूर्ण भारतात आणि भारतातील प्रत्येक राज्यात किंवा शहरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो असे म्हटले जाते भारतीय संस्कृतीनुसार मोराला शांती आणि सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे 26 जानेवारी 1963 रोजी मोर या पक्षाला देशाचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल भारतासोबतच मोराला म्यानमार व श्रीलंका या देशांनी सुद्धा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले आहे.

Peacock Information In Marathi

मोरा बद्दल आणखी सांगायचे झाले तर मोर हा प्राचीन काळापासून या पृथ्वीवर उपलब्ध आहे म्हणूनच हिंदू देवता श्रीकृष्णांच्या डोक्यावरती मोरपीस आपल्याला पाहायला मिळतात तसेच माता सरस्वती आणि महादेवाचे सुपुत्र कार्तिके यांचे वाहन देखील मोरच आहे सम्राट अशोक आणि मौर्य राजांच्या नाण्यांवरती सुद्धा मोर कोरलेला आपल्याला पाहायला मिळतो असे म्हटले जाते की शहाजहान बादशहा हा सुद्धा मोराच्या सिंहासनावर बसत होता.

खरं पाहायला गेलं तर मोर हा मूळचा भारतातला आहे पण काही वर्षांपूर्वी अलेक्झांडर नावाच्या व्यक्तीने भारतातून मोर ही प्रजाती घेऊन जाऊन अनेक देशांमध्ये मोराचा वास्तव्य निर्माण केला सध्या मोराच्या अनेक देशांमध्ये अनेक प्रजाती आपल्याला पाहायला मिळतील मोराचे वास्तव्य आहे खास करून नदी नाले जंगल आणि शेती या ठिकाणी पाहायला मिळते पण सध्या मोर हे शहरात सुद्धा पाहायला मिळत आहेत.

मोर पक्षाचे नैसर्गिक शत्रू? 

मित्रांनो मोरया पक्षाला जंगली प्राण्यांचा खूप मोठा धोका आहे यामध्ये सर्वप्रथम नाव येते वाघ रान मांजर आणि कोल्हा हे तीन प्राणी मोराची शिकार करतात त्यामुळे मोर यांच्यापासून वाचण्यासाठी संध्याकाळी झाडावरती आराम करतो कारण उंची वरती झोपल्यामुळे या प्राण्यांपासून मोर आला धोका कमी असतो.

मोर काय खातो?

आपल्यापैकी अनेक जणांना माहीत नसेल मोराचे मुख्य खाद्य काय आहे मोर हा बहुबक्षी असल्यामुळे तो उंदीर, पाली, किडे, सरडे किंवा सरपटणारे साप, गोम त्यासोबतच धान्य सुद्धा मोर खातो त्यामुळे आपल्याला अनेकदा मोर हे शेतामध्ये फिरताना पाहायला मिळतात कारण त्या ठिकाणी धान्य जमिनीवर पडलेले असते ते खाऊन ते आपला निवारा करतात.

मोराचे आयुष्य किती वर्ष आहे?

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे मोर हा काही पाळीव प्राणी नाही त्यामुळे आपण त्याचा अंदाज लावू शकत नाहीत की तो किती वर्ष जगू शकतो पण शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार मोर हा 25 ते 30 वर्षापर्यंत जगू शकतो.

मोराचा पिसारा किती लांब असतो?

आपल्या सर्वांना माहित आहे मोर हा पावसाळ्यात जेव्हा ढग जमा होतात तेव्हा तो आपला पिसारा फुलवतो आपल्या सर्वांना माहीत नसेल पण मोराचा पिसारा जेव्हा तो फुलवतो तो जवळपास 90 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर इतका मोराचा पिसारा फुलतो आणि त्यात जवळपास 200 पिसे असतात.

मोराची लांबी किती असते? 

मित्रांनो मोराची लांबी ही चोची पासून ते शेपटीपर्यंत जवळपास 100 ते 115 सेंटिमीटर इतकी असते यामध्ये कमी जास्त सुद्धा असू शकते ते निर्भर करते मोरावरती व त्यानुसारच पिसारा सुद्धा छोटा किंवा मोठा असू शकतो.

मोराच्या प्रजाती आणि त्यांची नावे? 

मित्रांनो मोराच्या जगात जवळपास 12 प्रजाती आढळून येतात त्या कोणकोणत्या आहेत आणि त्यांची नावे काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती खाली दिली गेली आहे ती व्यवस्थित रित्या वाचून घ्या.

ग्रीन पीकॉक

ग्रीन पीकॉक ही मोराची एक प्रजाती आहे जी प्रामुख्याने चीन म्यानमार थायलंड मलेशिया व्हाईटनम या सारख्या देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते या मोराच्या शरीराचा 80 टक्के भाग हा हिरव्या रंगाचा असतो प्रामुख्याने हे मोर फुले आणि झाडे खातात आणि हे मोर जमिनीवर तीच राहतात

वाइल्ड पलवान पीकॉक

मित्रांनो वाईल्ड पलावन पीकॉक ही एक मोराची प्रजाती आहे ही प्रामुख्याने फिलिपाईन्स देशांमध्ये पाहायला मिळते प्रामुख्याने हे मोर पलावान आयर्लंड वरती पाहायला मिळतात या मोराचा पिसारा हा काळा कलरचा असतो व त्यावर ती जांभळ्या रंगाचे ठिपके असतात आणि या मोराचा डोळा हा लाल रंगाचा असतो असे म्हटले जाते की हे मोर पंधरा वर्षापर्यंत जगू शकतात.

व्हाईट ब्लू पिकॉक?

व्हाईट ब्ल्यू पीकॉक बद्दल आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत नसेल पण हा मोर पांढऱ्या आणि निळ्या व हिरव्या रंगाचे मिश्रण असलेला मोर आहे हा मोर दिसायला अतिशय सुंदर असतो की त्याला पाहिल्यानंतर कोणीही त्याच्याकडे मोहित होईल या मोराची मान ही निळ्या रंगाची आणि पांढऱ्या रंगाची असते व या मोराचे पंख पांढऱ्या आणि हिरव्या रंगाचे असतात असा मोर तुम्ही कदाचित कधी पाहिला नसेल.

एशियन पिकॉक?

एशियन पीकॉक बद्दल आपल्या सर्वांना माहीतच असेल कारण हा मोर भारतात पाहायला मिळतो आपल्यापैकी जवळपास सर्वांनीच हा मोर पाहिला असेल आणि हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि पावसाळ्यामध्ये हा मोर आपला सुंदर पिसारा फुलवून नाचताना आपल्यापैकी खूप जणांनी पाहिला असेल आणि या मोराला पक्षांचा राजा असेही म्हटले जाते.

सिल्वर पीइड पिकॉक?

या मोराचा शोध हा 1992 मध्ये अमेरिकेमध्ये लागला होता या मोराच्या शरीराचा बहुतांश हिस्सा हा पांढरा कलरचा असतो त्यामध्ये वीस ते तीस टक्के कलर हा वेगळा प्रकारचा असतो या मोराचा कलर चांदी सारखा पांढरा शुभ्र असतो व या मोराचा आकार हा भारतातील मोरा एवढा असतो हा मोर दिसायला खूपच सुंदर दिसतो जेव्हा तो पिसारा फुलवतो त्याची सुंदरता आणखीनच शोभून दिसते.

द ग्रेट अर्ग्युस फेंसन्ट

ही एक मोराची प्रजाती आहे जी आपल्याला प्रामुख्याने बोर्निया, सुमात्रा मलय पेनिन्सुला या देशांमध्ये पाहायला मिळतो हा मोर फुले आणि झाडाची पाने खातो या मोराचा रंग हा गोल्डन कलरचा असतो त्यामुळे याला गोल्डन पिकॉक असे पण म्हटले जाते या मोराची लांबी ही मादी पेक्षा जास्त असते जेव्हा हा मोर आपला पिसारा फुल होतो त्यावेळेस याची सुंदरता आणखीनच निखरून येते.

पर्पल पिंक पीकॉक?

हे मोर दिसायला अतिशय सुंदर असतात या मोराच्या माने खालचा भाग हा पर्पल पिंक कलरचा असतो व या मोराच्या पंखांचा कलर हा फिकट हिरव्या रंगाचा असतो आणि याच्या शेपटीमध्ये गोल आकाराचे पर्पल पिंक कलरचे ठिपके असतात हे आपल्याला खूप कमी ठिकाणी पाहायला मिळतात

व्हाईट पिकॉक?

मित्रांनो पांढरा मोर हा सहसा भारतामध्ये पाहायला मिळतो हा मोर इतर मोरांसारखाच असतो परंतु या मोराचा कलर पांढराशुभ्र असतो जेव्हा हा मोर आपला पिसारा फुल होतो तेव्हा लोक त्याच्याकडे पाहतच राहतात आपल्याला माहीत नसेल पण पांढरे मोर हे खूप कमी आहेत या मोराचे डोळे हे निळ्या रंगाचे असतात आणि बाकी शरीराचा पूर्ण भाग हा पांढऱ्या रंगाचा असतो म्हणून हे मोर लांबून पण आपल्याला दिसू शकतात हे मोर आपल्याला भारतामध्ये कर्नाटक राज्यात दांडेली वाइल्डलाइफ सेंचुरी मध्ये पाहायला मिळतील.

रेड पीकॉक?

मित्रांनो लाल कलरचे मोर हे जगभरात खूप कमी पाहायला मिळतात कारण मोराची ही प्रजाती खूपच दुर्मिळ आहे या मोराची मान ही संपूर्णपणे लाल रंगाची असते व या मोराचे पाठीचा भाग हा या मोराची मान ही संपूर्णपणे लाल रंगाची असते व या मोराचे पाठीचा भाग हा पर्पल कलरचा असतो व याचे पंखावरती जे ठिपके असतात ते लाल रंगाचे आपल्याला पाहायला मिळतात हा मोर पिसारा फुलवल्यानंतर खूपच आकर्षक दिसतो.

केमियो ब्लॅक शोल्डर पिकॉक?

मित्रांनो या मोराचा मानेचा संपूर्ण भाग हा काळा रंगाचा असतो व याच्या पंखांचा रंग हा हलकासा गोल्डन रंगाचा असतो हा मोर दिसायला खूपच सुंदर असतो आपल्याला माहीत नसेल काळा मोर हा फळे फुले झाडाची पाने व त्यासोबतच किडे मुंग्या अशा प्रकारचे खाद्य खातो.

कांगो पीकॉक?

मित्रांनो हा मोर प्रामुख्याने आफ्रिकेमध्ये पाहायला मिळतो या मोराची शेपटी म्हणजेच पिसारा हा खूप छोटा असतो या मोराच्या डोक्यावरती पांढऱ्या रंगाचा तुरा असतो या मोराची मान ही ऑरेंज कलरची असते आपल्याला माहीत नसेल पण काँगो पिकॉक हा आफ्रिकेचा राष्ट्रीय पक्षी असून हा स्वभावाने खूप शांत असतो असे म्हटले जाते व या मोराची शिकार करण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत.

ग्रे पीकॉक फेंसन्ट?

मित्रांनो हा मोर हा म्यानमार देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे व या मोराचा रंग हा संपूर्णपणे ग्रे कलरचा असतो व या मोराचे पंख हे ब्ल्यू आणि पर्पल कलर चे असतात हे मोर फळे झाडाची पाने व किडे मुंग्या अशा प्रकारचे खाद्य खातात या मोरामध्ये जवळपास खूप सारे कलर आढळून येतात म्हणून या मोराला सुंदर पक्ष्यांपैकी एक म्हणून नावाजले गेले आहे.

मोर पिसाचे फायदे?

मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहेच मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे मोर जितका सुंदर आहे तितकीच त्याची मोरपंख सुंदर असतात आपण अनेकदा मोरपंख लोकांना जवळ बाळगताना पाहिले असतील किंवा कोणाच्या घरावरती किंवा कोणाच्या घरामध्ये पुस्तकांमध्ये अल्बम मध्ये ठेवलेली आपण पाहिली असतील अनेक जणांना हा प्रश्न पडला असेल की मोरपंख नेमका सोबत का ठेवावा किंवा पुस्तकांमध्ये अल्बम मध्ये का ठेवतात आपल्याला माहीत नसेल तर आपण या मोरपंखाचे काय फायदे आपल्याला होतात याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला खाली दिली आहे.

Benefits Of Peacock Feathers

  • मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा जर चुकीचा बसवला असेल तर त्याने अनेक प्रकारच्या निगेटिव्ह गोष्टी आपल्या आयुष्यात घडत असतात अशा वेळी आपण तीन मोरपंख जर दरवाजाला दरवाजावरती लावली तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी जाऊन आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येथे असे म्हटले जाते.
  • ज्या ज्या नवरा बायको मध्ये सतत मतभेद होत असतील भांडण होत असतील तर अशा लोकांनी त्यांच्या लग्नाच्या अल्बम मध्ये मोरपंख ठेवावा त्याने त्यांच्यातील मतभेद दूर होऊन प्रेम वाढण्यास सुरुवात होते.
  • आपल्यापैकी बऱ्याच जणांना स्वप्न पडत असतील पण जर स्वप्न सतत पडत असतील आणि ती भीतीदायक स्वप्न असतील तर अशा लोकांनी झोपण्यापूर्वी आपल्या उशीच्या खाली मोरपंख ठेवावेत याने त्यांना शांत झोप येईल व स्वप्न पडणे बंद होईल.
  • आपल्या आयुष्यात जर पैशांची चणचण जाणवत असेल तर आपण आपल्या घरात दक्षिण पूर्व दिशेला तीन मोरपंख ठेवावीत याने लक्ष्मीची आवक आपल्या घरामध्ये वाढेल आणि पैशांची चणचण दूर होईल.
  • मोरपंखाने जर गंगाजल आपल्या घरामध्ये सर्वत्र शिंपडले तर आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते आणि घरामध्ये प्रसन्नता आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते.
  • ज्या शाळकरी मुलांना एखादा विषय अवघड जात असेल किंवा त्या विषयाबद्दल आवड नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी त्या विषयाच्या पुस्तकांमध्ये जर मोरपंखी ठेवली तर त्यातून तुम्हाला ऊर्जा प्राप्त होईल व त्या विषयाबद्दल तुमची रुची वाढेल.
निष्कर्ष:-

मित्रांनो या पोस्टच्या माध्यमातून आपण Peacock Information In Marathi बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आपण मोरांच्या जातींबद्दल आणि मोरा बद्दल व मोरपिसांपासून होणाऱ्या फायद्याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर इतरांना पण नक्की शेअर करा व आमच्याकडून जर कोणती माहिती लिहायची राहिली असेल तर ती पण आम्हाला कमेंट करून कळवा जेणेकरून आम्ही यामध्ये बदल करू

FAQ.

Q1: मोर कुठे राहतात?

मोर हे जंगलात शेतात आणि नदीकाठी पाहायला मिळतात व ते झाडावरती राहतात.

Q2: मोर काय खातात?

मोर फळे झाडांची पाने सरपटणारी प्राणी पाली किडे मुंग्या व धान्य खातात

Q3: कोणत्या राज्यात मोर सर्वाधिक आढळून येतो?

असे पाहायला गेले तर मोर हे सर्वत्र आढळतात पण सर्वात जास्त जम्मू काश्मीर पूर्व आसाम या भागात पाहायला मिळतात

Q4: मोर सर्व भक्षक आहे का?

मोर हा सर्वभक्षी आहे तो अन्नधान्य फळे झाडाची पाने सरपटणारी प्राणी अशा प्रकारच्या सर्व गोष्टी खातो त्यामुळे मोर हा सर्वभक्षी आहे

Q5: भारतात मोराच्या किती जाती आहेत?

भारतात मोराच्या दोन जाती पाहायला मिळतात त्यात प्रामुख्याने हिरवा मोर आणि पांढरा मोर

 

 

Leave a Comment