मित्रांनो या लेखामध्ये आपण Patanjali Credit Card बद्दल माहिती घेणार आहोत आपल्या सर्वांना माहीतच आहे पतंजली हा भारतातील खूप प्रसिद्ध ब्रँड आहे ज्याने ब्युटी हेल्थकेअर मेडिसिन तसेच फूड प्रॉडक्ट्स अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपली ओळख बनवली आहे तसेच पतंजली सध्या फायनान्स क्षेत्रांमध्ये आली आहे पतंजलीने नुकतेच पंजाब नॅशनल बँकेचे सोबत हात मिळवला आहे आणि त्यांनी दोन क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहेत ती क्रेडिट कार्ड कोण कोणते आहे त्यापासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात आणि ते क्रेडिट कार्ड घेण्यासाठी आपल्याला अर्ज कशा पद्धतीने करावा लागेल याबद्दल आपण मराठीच्या या पोस्टमध्ये पाहणार आहोत.
पतंजली क्रेडिट कार्ड | What Is Patanjali Credit Card
सर्वप्रथम आपण जाणून घेऊ पतंजली क्रेडिट कार्ड काय आहे पतंजली आयुर्वेदिक लिमिटेड व पंजाब नॅशनल बँक आणि नॅशनल पेमेंट ऑफ कॉर्पोरेशन (NPCI) यांनी मिळून पतंजली क्रेडिट कार्ड ची सुरुवात केली आहे यामध्ये त्यांनी दोन कार्ड लॉन्च केले आहेत प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि दुसरा आहे सिलेक्ट क्रेडिट कार्ड यासोबतच विमा संरक्षण अशा अनेक प्रकारची सुविधा ग्राहकांना दिल्या आहेत.
पतंजली क्रेडिट कार्ड फायदे? Patanjali Credit Card Benefits
मित्रांनो पतंजलीने दोन क्रेडिट कार्ड सुरू केले आहेत हे दोन्ही क्रेडिट कार्ड ब्रांडेड असून ते ग्राहकांना रिवॉर्ड पॉइंट कॅशबॅक आणि विमा संरक्षण यासारखे मूलभूत फायदे देतात हे दोन्ही क्रेडिट कार्ड पतंजलीच्या निष्ठावान ग्राहकांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देतील कारण हे दोन्ही कार्ड स्वदेशी आहेत म्हणजेच भारतीय आहेत आणि ते रुपये शी जोडले गेले आहेत.
पतंजली प्लॅटिनम कार्ड फायदे?
मित्रांनो पतंजली प्लॅटिनियम कार्डचे लिमिटेड कमीत कमी 25 हजार रुपये आणि जास्तीत जास्त पाच लाख रुपये पर्यंत मिळू शकते. व हे कार्ड तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला पतंजली कडून 300 रिव्हर्स पॉईंट दिले जातील त्यासोबतच प्लॅटिनम कार्ड वरती दोन लाख रुपयांचा विमा तुम्हाला कंपनीकडून दिला जाईल ज्यामध्ये मृत्यू झाल्यावर किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर कव्हर केल्या जातील पतंजलीच्या कुठल्याही स्टोअरवर तुम्ही शॉपिंग केली तर त्यावर ती तुम्हाला दोन टक्के कॅश बॅक दिला जाईल जर तुम्ही पतंजली स्वदेशी समृद्धी सोबत जोडले असाल तर तुम्हाला त्यावर ती 5% 7%टक्के एवढा कॅशबॅक मिळू शकतो. यासोबतच Add on कार्ड फैसिलिटी दिली जाते
पतंजली सिलेक्ट कार्ड फायदे?
पतंजली सिलेक्ट कार्ड ची लिमिट कमीत कमी 50 हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा लाख रुपयांपर्यंत आहे यामध्ये सुद्धा तुम्हाला रिवार्ड पॉईंट 300 दिले जातील यासोबतच या कार्ड मध्ये तुम्हाला दहा लाखांपर्यंत इन्शुरन्स मिळेल ज्यामध्ये तुम्ही ॲक्सिडेंटल मृत्यू झाल्यावर किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यावर यासोबतच पतंजलीच्या कुठल्याही स्टोअर मध्ये तुम्हाला 2% चा कॅश बॅक दिला जाईल याव्यतिरिक्त तुम्हाला जास्तीचा म्हणजेच पाच ते सात टक्के कॅशबॅक दिला जाईल जर तुम्ही ऑनलाईन रिचार्ज करत असाल किंवा तुम्ही पतंजलीचे स्वदेशी समृद्धी योजनेचे उमेदवार असाल तर यासोबतच तुम्हाला गोल्फ जिम आणि स्पा यासारख्या सुविधा तुम्हाला सॅलेट कार्ड मधून मिळणार आहेत आणि मेडिकल चेकअप ची सुद्धा सुविधा तुम्हाला मिळणार आहे.
पतंजली क्रेडिट कार्ड शुल्क आणि चार्जेस? Patanjali Credit Card Fees And Charges
तुम्हाला जर पतंजलीचे क्रेडिट कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे यावर ती आपल्याला किती चार्जेस आकारले जातात जर तुम्ही पतंजलीचे प्लॅटिनम कार्ड बनवणार असाल तर त्यासाठी तुम्हाला कुठलीही पैसे आकारले जात नाहीत पण तुम्हाला वर्शिक 500 रुपये भरावी लागते जॅकी प्रत्येक बँक क्रेडिट कार्ड वरती हे चार्जेस घेते आणि जर तुम्ही पतंजलीचे सिलेक्ट कार्ड बनवत असाल तर त्या वरती तुम्हाला कोणतीही जोईन फी 500 घेतली जाते तुम्हाला वार्षिक 750 रुपये फीस भरावी लागेल.
पतंजली क्रेडिट कार्ड वैधता? Patanjali Credit Card Validity
प्रत्येक बँकेच्या क्रेडिट कार्डची व्हॅलिडीटी ही तीन ते पाच वर्षापर्यंत असते तसेच पतंजलीच्या क्रेडिट कार्डची व्हॅलिडीटी पण कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त पाच वर्षांपर्यंत असू शकते याबद्दलची रीतसर माहिती तुम्हाला पीएनबी बँकेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती मिळेल किंवा जवळच्या पीएनबी बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही चौकशी करू शकता.
पतंजली क्रेडिट कार्ड लिमिट? Patanjali Credit Card Limit?
प्लॅटिनम कार्ड लिमिट | 25000 ते 500000 |
सेलेक्ट कार्ड लिमिट | 50000 ते 100000 |
पतंजली क्रेडिट कार्ड पात्रता? Patanjali Credit Card Eligiblity?
- भारताचे नागरिक असणे आवश्यक
- तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला हवे
- पगार पत्रक
- व्यावसायिकांसाठी आयटीआर
पतंजलि क्रेडिट कार्ड साठी डॉक्यूमेंट? Document for Patanjali Credit Card
ओळख पुरावा:-
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- पॅन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन
- पासपोर्ट
रहिवासी पुरावा:-
- लाईट बिल
- रेशन कार्ड
- ड्रायव्हिंग लायसन
उत्पन्नाचा पुरावा:-
- पगार स्लिप
- आयटीआर स्लिप
पतंजली क्रेडिट कार्ड साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? How to Apply for Patanjali Credit Card Online
मित्रांनो तुम्हाला पण पीएनबी पतंजली क्रेडिट कार्ड काढायचे असेल तर खालील दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने क्रेडिट कार्ड साठी आपलाय करू शकता.
Step1: सर्वप्रथम तुम्हाला https://www.patanjaliayurved.net/pnb या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल
Step2: त्यानंतर तुम्हाला Apply Now हा पर्याय दिसेल यावरती क्लिक करा
Step3: यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही पंजाब नॅशनल बँकेचे जुने कस्टमर आहात का असाल तर येस करा नसाल तर नो करा
Step4: त्यानंतर तुम्ही जिथे मोबाईल नंबर पॅन कार्ड नंबर आणि ईमेल आयडी व्यवस्थित टाकून घ्या
Step5: त्यानंतर एक्सेप्ट आणि प्रोसीड वरती क्लिक करा
Step6: त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती आणि ईमेल आयडी वरती दोन्ही वरती तुम्हाला ओटीपी येईल तो व्यवस्थित भरून घ्यावा
Step7: त्यानंतर तुम्हाला आधार नंबर व्यवस्थित रित्या भरून घ्यावा लागेल व आधार नंबर वरती एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला किती टाकून घ्यावे लागेल
Step8: ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म उघडेल त्यामध्ये तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून घ्यायची आहे ज्यामध्ये तुमच्या वैयक्तिक माहिती असेल तुमचा रहिवासी पत्ता असेल किंवा तुमचा ऑफिस पत्ता असेल व त्यानंतर सेव आणि नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल
Step9: यानंतर तुम्हाला विचारले जाईल की तुम्हाला कोणते कार्ड हवे आहे त्यानुसार तुम्ही ते कार्ड सिलेक्ट करा आणि पुढे प्रोसेस करा
Step10: त्यानंतर तुम्हाला सर्व कागदपत्रे अपलोड करून घ्यावी लागते ज्यामध्ये तुमचे ओळखपत्र रहिवासी पत्ता इन्कम प्रूफ बँकेचे स्टेटमेंट तुमचा पासपोर्ट साईज फोटो सही आणि पॅन कार्ड हे सर्व कागदपत्रे अपलोड करावे लागतील आणि सब्मिट या बटनावर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या मोबाईल वरती मेसेज येईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट दाखवली जाईल आणि तुमचा एप्लीकेशन नंबर दाखवला जाईल व त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ केवायसी करण्याच्या लिंक दिली जाईल त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमची व्हिडिओ केवायसी कम्प्लीट करून घ्यावी तुम्हाला त्यानंतर क्रेडिट कार्ड मिळून जाईल.
पतंजली क्रेडिट कार्ड कस्टमर केअर नंबर? Patanjali Credit Card Customer Care Number
जर तुमच्या मनामध्ये पतंजली क्रेडिट कार्ड बद्दल आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली दिलेल्या टोल फ्री नंबर वरती कॉल करून चौकशी करू शकता
- 1800 180 2345
- 0120 4616200
निष्कर्ष: