पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती | Pashupatinath vrat complete information

Table of Contents

पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती मराठीत

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण पशुपती व्रत कसा केला जातो या बद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला देणार आहोत पशुपती व्रताचा उपवास कसा केला जातो? नेमका पशुपती वृत्त काय आहे? पशुपतिनाथ वृत्ताची महिमा काय आहे? पशुपतिनाथ वृत्त केल्याने आपल्याला काय लाभ होतो? अशा सर्व प्रश्नांची ची माहिती आपल्याला दिली आहे तरी आपण ही संपूर्ण माहिती नीट वाचून घ्यावी.

मित्रांनो खूप सारे लोक स्वतःच्या पद्धतीने पशुपतिनाथ व्रत कसा केला जातो याबद्दल माहिती देत आहेत पण ती माहिती खूप वेळा चुकीची पण ठरू शकते त्यामुळे आपल्याला काळजी घेणे गरजेचे आहे कारण हे व्रत चुकीच्या पद्धतीने केले तर त्याचा लाभ आपल्याला मिळू शकत नाही त्यामुळे हे व्रत संपूर्ण माहिती घेऊनच करावे.

पशुपतिनाथ व्रताचा महिमा?

मित्रांनो पशुपतिनाथ व्रताचे अनेक फायदे आहेत जेव्हा तुम्ही हा व्रत पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने कराल तेव्हाच तुम्हाला त्याची महिमा कळेल या व्रताचे पालन केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील हे व्रत केल्याने तुमचे रखडलेली कामे सहज पूर्ण होतील एकदा तुम्ही महादेव पशुपतिनाथ च्या चरणी जाताल तेव्हा देवाचे देव महादेव तुमची खरी श्रद्धा पाहून केलेल्या उपवासाचे फळ नक्कीच तुम्हाला देतात असे शिव महापुराना मध्ये सांगितले आहे.

पशुपतिनाथ व्रत कधीपासून सुरू करावा?

मित्रांनो पशुपतिनाथ व्रत करण्यासाठी कोणताही महिना निश्चित नाही तुम्ही हा व्रत कोणत्याही महिन्यामध्ये करू शकता यासाठी तुम्हाला कोणतीही तारीख किंवा मुहूर्त बघण्याची गरज नाही यासाठी तुम्ही कोणत्याही सोमवारी हा व्रत करू शकता कृष्ण पक्ष असो वा शुक्ल पक्ष दिवस फक्त सोमवारचा असावा हे लक्षात ठेवा.

पशुपतिनाथ व्रत कोणी करू नये?

मित्रांनो देवाचे देव महादेव हे स्वतः सृष्टीचे पालन हारआहेत या जगातील सर्व प्राण्यांचे देव देवतांचे नाथ आहेत म्हणून त्यांना हे कधीच वाटणार नाही  माझ्या भक्तांना कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटावे म्हणून जे लोक वयस्कर आहेत, आजारी आहेत किंवा ज्या महिला गर्भवती आहेत अशा लोकांनी हा व्रत करू नये.

पशुपतिनाथ व्रत कोण कोण करू शकते?

मित्रांनो पशुपतिनाथ व्रत हा कोणीही केला तरी चालतो म्हणजे पुरुष किंवा महिला हे दोघेही व्रत करू शकतात पण महिलांना जर मासिक पाळी आली असेल तर ही पूजा घरच्यांनी कोणीही केली तरी चालते पण हे ही शक्य नसेल तर फक्त उपवास केला तरी चालत.

पशुपतिनाथ व्रतासाठी लागणारी साहित्य

  • पूजेचे ताट
  • कुंकू
  • अभिर
  • गुलाल
  • अष्टगंध
  • लाल चंदन
  • पिवळ चंदन
  • अक्षदा (विना तुकडे पडलेले तांदूळ)
  • बेल पाने
  • धोत्र्याचे फुल
  • तांब्याच्या तांब्या

पशुपतिनाथ व्रताची सकाळची पूजा कशी करावी? विधि

सगळ्यात पहिल्यांदा सोमवारी सकाळी शुभ मुहूर्ता मध्ये आंघोळ करून पूजेचे ताट तयार करून घ्यावे  मित्रांनो लक्षात ठेवा बरेच लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे धोत्र्याचे फुल ठेवतात असा कोणताही नियम नाही जर तुमच्याकडे धोत्र्याचे फुल नसेल तर काही हरकत नाही कारण देवाचे देव महादेव भोळे आहेत भोलेनाथ आहेत त्यांना या गोष्टींची गरज नाही फक्त ते भक्ताचं प्रेम बघतात पूजेचे ताट बनवताना हे लक्षात ठेवा दोनदा पूजा होईल तेवढे सामान सोबत ठेवा म्हणजे सकाळची आणि सायंकाळची पूजा होईल

मित्रांनो मंदिरात जाण्यापूर्वी ही गोष्ट लक्षात ठेवा की ज्या मंदिरामध्ये पहिली पूजा करणार आहात त्याच मंदिरात बाकीच्या चारीही पूजा कराव्या लागतील म्हणून अशा मंदिरात जावा जिथे तुम्हाला पशुपतिनाथ व्रताची पूजा करता येईल येईल

मंदिरात जाऊन पहिल्यांदा देवाच्या पाया पडा आणि मनातल्या मनात उपवासाचा संकल्प करा सोमवारी खूप सारे भक्त दर्शन करायला येत असतात त्यामुळे त्यांनी वाहिलेली फुले बेल पाने शिवलिंगावर असतात त्यामुळे सर्वप्रथम शिवलिंग व्यवस्थीत साफ करून घ्या त्यानंतर पाण्याने शिवलिंगाचा अभिषेक करा पाण्याने अभिषेक करताना हे लक्षात ठेवा अभिषेक केलेले पाणी थोडसं वाटीमध्ये धरा पूजा करताना कोणतीही घाई करू नका शांततेत पूजा करून घ्या पूजा करते वेळी ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जप करावा

व त्यानंतर शिवलिंगाला अभिर गुलाल कुंकू अष्टगंध लाल चंदन पिवळा चंदन व्यवस्थित लावून घ्यावा त्यानंतर बेलाची पाने धोत्र्याचे फुल किंवा आणलेली सोबत अन्य फुले देवाला वाहून घ्यावी त्यानंतर अक्षदा शिवलिंगावर टाकावा आणि देवाच्या पाया पडावे त्यानंतर घरी जाऊन पूजेचे ताट आपल्या देवघरात ठेवावे.

पशुपतिनाथ व्रताची सायंकाळची पूजा कशी करावी

सायंकाळी पूजा करते वेळेस तुम्हाला सर्वप्रथम कनकीचे सहा दिवे बनवून घ्यावे लागतील त्यानंतर गोड नैवेद्य बनवून सोबत घ्यावा लागेल लक्षात असू द्या सकाळी ज्या मंदिरात पूजा केली त्याच मंदिरात सायंकाळची पूजा करावी लागेल शिवलिंगाची पूजा केल्यानंतर सोबत आणलेले पाच कणकेचे दिवे शिवलिंगा समोर लावावे व उर्वरित राहिलेला एक दिवा तुमच्या सोबत ठेवावा लागेल त्यानंतर देवाला आणलेला नैवेद्य किंवा प्रसादाचे तीन हिस्से करून देवा समोर ठेवावे आणि देवाला नमस्कार करावा मनातील इच्छा देवाला सांगावी.

हे पण वाचा : प्रदोष व्रत संपूर्ण माहिती

व नंतर प्रसादाचे दोन हिस्से देवा समोरच राहू द्यावे आणि एक हिस्सा तुम्हाला सोबत घेऊन जावा लागेल घरा जवळ आल्यानंतर घरात येण्यापूर्वी घराच्या दारात आणलेला एक दिवा उजव्या हाताला दिवा लावावा आणि तो दारात ठेवून मगच घरात प्रवेश करावा उपवास सोडण्यापूर्वी मंदिरातून आणलेला प्रसाद ग्रहण करून घ्यावा हा प्रसाद इतर कोणालाही देता येणार नाही तो स्वतः ग्रहण करावा लागेल व त्यानंतर जेवण करून उपवास सोडू शकता या पद्धतीने तुमच्या पहिल्या सोमवारची पूजा संपन्न होईल अशाच पद्धतीने बाकीच्या चारही सोमवारी पूजा करून घ्यावी तर तुमचा पशुपती वृत्त संपन्न होईल

पशुपतिनाथ व्रताची आरती?

जय गंगाधर जय हर जय गिरिजाधीशा ।

त्वं मां पालय नित्यं कृपया जगदीशा ॥ ॐ जय गंगाधर …

कैलासे गिरिशिखरे कल्पद्रमविपिने ।

गुंजति मधुकरपुंजे कुंजवने गहने ॥ ॐ जय गंगाधर …

कोकिलकूजित खेलत हंसावन ललिता ।

रचयति कलाकलापं नृत्यति मुदसहिता ॥ ॐ जय गंगाधर …

तस्मिंल्ललितसुदेशे शाला मणिरचिता ।

तन्मध्ये हरनिकटे गौरी मुदसहिता ॥ ॐ जय गंगाधर …

क्रीडा रचयति भूषारंचित निजमीशम्‌ ।

इंद्रादिक सुर सेवत नामयते शीशम्‌ ॥ ॐ जय गंगाधर

बिबुधबधू बहु नृत्यत नामयते मुदसहिता ।

किन्नर गायन कुरुते सप्त स्वर सहिता ॥ ॐ जय गंगाधर …

धिनकत थै थै धिनकत मृदंग वादयते ।

क्वण क्वण ललिता वेणुं मधुरं नाटयते॥ ॐ जय गंगाधर …

रुण रुण चरणे रचयति नूपुरमुज्ज्वलिता ।

चक्रावर्ते भ्रमयति कुरुते तां धिक तां ॥ ॐ जय गंगाधर …

तां तां लुप चुप तां तां डमरू वादयते ।

अंगुष्ठांगुलिनादं लासकतां कुरुते ॥ ॐ जय गंगाधर …

कपूर्रद्युतिगौरं पंचाननसहितम्‌ ।

त्रिनयनशशिधरमौलिं विषधरकण्ठयुतम्‌ ॥ ॐ जय गंगाधर …

सुन्दरजटायकलापं पावकयुतभालम्‌ ।

डमरुत्रिशूलपिनाकं करधृतनृकपालम्‌ ॥ ॐ जय गंगाधर …

मुण्डै रचयति माला पन्नगमुपवीतम्‌ ।

वामविभागे गिरिजारूपं अतिललितम्‌ ॥ ॐ जय गंगाधर …

सुन्दरसकलशरीरे कृतभस्माभरणम्‌ ।

इति वृषभध्वजरूपं तापत्रयहरणं ॥ ॐ जय गंगाधर …

शंखनिनादं कृत्वा झल्लरि नादयते ।

नीराजयते ब्रह्मा वेदऋचां पठते ॥ ॐ जय गंगाधर …

अतिमृदुचरणसरोजं हृत्कमले धृत्वा ।

अवलोकयति महेशं ईशं अभिनत्वा ॥ ॐ जय गंगाधर …

ध्यानं आरति समये हृदये अति कृत्वा ।

रामस्त्रिजटानाथं ईशं अभिनत्वा ॥ ॐ जय गंगाधर …

संगतिमेवं प्रतिदिन पठनं यः कुरुते ।

शिवसायुज्यं गच्छति भक्त्या यः श्रृणुते ॥ ॐ जय गंगाधर

पशुपतिनाथ व्रताचे उद्यापन कसे करावे?

मित्रांनो पशुपतीनाथ व्रताचे उद्यापन हे पाचव्या सोमवारी करता येते उद्यापन करते वेळी लक्षात असू द्या उद्यापन हे सायंकाळी सूर्य मावळण्याच्या 40 मिनिटे अगोदर किंवा सूर्य मावळल्यानंतर चाळीस मिनिटांनी करू शकता

उद्यापण करते वेळेस आपल्याला एक नारळ व ११ रुपये 21 रुपये किंवा 51 रुपये आपल्याला अर्पण करावे लागतात व उद्यापण करते वेळेस 108 तांदूळ किंवा गहू किंवा बेल पान देवाला अर्पण करावे लागतात पण अर्पण करतेवेळी सगळे एकदाच अर्पण करायचे नाहीत एकेक करून तुम्ही ते अर्पण करावेत व आपली मनोकामना देवाला सांगावी

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण पशुपतिनाथ व्रत संपूर्ण माहिती आपल्याला देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करुन कळू शकतात व ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करता येतील.

पशुपती व्रत करताना हे नियम पाळावेत?These rules should be followed while doing Pashupati Vrat?

  • पशुपती व्रत करणाऱ्या व्यक्तीने मंदिरात जाते वेळेस पायात चप्पल घालू नये
  • पशुपती व्रत नवरा-बायको जोडीने करत असतील तर मंदिरात जाते वेळेस पूजेचे ताट दोघांचे वेगवेगळे असायला पाहिजे
  • पशुपती व्रताची पूजा सोमवारी सकाळी आणि संध्याकाळी असते त्यामुळे पूजेच्या ताटात दोन वेळा पूजा करता येईल एवढीच सामग्री सोबत घ्यावी
  • लक्षात असू द्या पूजेचे ताट दोन टाईम तेच वापरावे सकाळी आणि संध्याकाळी
  • पाच सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावा तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही
  • जर तुम्ही किरायाने राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही
  • पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये फक्त एकादशी करावी आणि एक सोमवार जास्त करावा
  • पशुपती व्रत करते वेळेस जर मासिक पाळी आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा मंदिरात जाऊन पूजा करू नये व एक सोमवार जास्त करावा
  • पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम् या मंत्राचा जप करावा
  • संध्याकाळच्या पूजेला जे 5 कनकीचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचे असावेत

पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे प्रश्न?

श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का?

पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवार करता येतील त्यामुळे पशुपती वृत्त अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये करू नये.

पशुपती व्रत करताना नॉनव्हेज पूर्ण बंद करावे लागते का?

पशुपती व्रत करते वेळेस तुम्हाला संपूर्णपणे नॉनव्हेज बंद करावे लागते पशुपती व्रत सुरू केल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत तुम्हाला नॉनव्हेज खाता येणार नाही व आपल्या घरामध्ये पण नॉनव्हेज बनवता येणार नाही जसे आपण श्रावण महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवत नाहीत तसेच पशुपती व्रत सुरू केल्यानंतरही उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज खाण्यास व घरामध्ये बनवण्यास टाळावे.

पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे?

पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या मंदिरात आपण रोज पूजा करत असाल तर ज्यावेळेस आपण शिवलिंगावर ती जल अर्पण करत असाल त्यावेळी आपले आपला चेहरा हा उत्तरेकडे असायला हवा म्हणजेच आपल्याला दक्षिणेच्या बाजूने बसावे लागेल म्हणजे आपला चेहरा हा उत्तरेकडे असेल व शिवलिंगावर ती पाणी अर्पण करावे लागेल व त्यानंतर तुम्ही पश्चिमेला किंवा पूर्वेला बसून उर्वरित पूजा केली तरी चालेल कारण पशुपती व्रत हा आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो त्यामुळे पूजा तुम्ही कुठेही बसून करू शकता परंतु पाणी अर्पण करताना दक्षिणेकडे बसून आपले मुख उत्तरेकडे असणे गरजेचे आहे त्याने आपल्या मनातील इच्छा व आकांक्षा देवाधिदेव महादेव पूर्ण करतील.

परंतु प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे जर जागा मिळाली तर दक्षिणेला बसून पाणी अर्पण करावे जर जागा मिळाली नाही तर जिथे जागा मिळेल तिथे बसून तुम्ही पूजा करून घ्यावी.

घरात असलेल्या शिवलिंगाची पूजा केली तर चालते का?

पशुपती व्रत करते वेळेस आपल्याला घरातील शिवलिंगाची पूजा करून हा व्रत करता येणार नाही कारण मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलवता येत नाही त्यामुळे पुराणांमध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवाजी देव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजेच शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते त्यामुळे मंदिरात जाऊनच पशुपती व्रताची पूजा करावी.

पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वहावे लागतात?

पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे बेलपत्र उपलब्ध असतील तर 101 बेलपत्र वाहले तर चालतात जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकता पण लक्षात असू द्या सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेत तेवढेच संध्याकाळच्या पूजेला पण करावे लागतील.

घरी आणलेल्या दिव्याचे काय करावे?

जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस प्रज्वलित करावा लागतो तो दिवा मावळल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गाईला चालू शकता किंवा तो पाण्यामध्ये सोडू शकता?

आरती करताना 5दिवे उचलून ते ताटात ठेवून करावी का?

मंदिरात घेऊन गेलेले पाच दिवे हे आपल्याला शिवलिंगाच्या समोर एका पेपर वरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी.

नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का?

पशुपतिनाथ व्रत करतेवेळी जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही नैवेद्य हा कधीही गोड असावा त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये.

शेवटच्या सोमवारी उद्यापणाच्या वेळी ६ दिवे व गोड नैवद्य पण न्यायचा का?

पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला सहा दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल कारण पशुपती व्रत हा पाच सोमवारचा असतो त्यामुळे उद्यापणा दिवशी सुद्धा इतर चार सोमवारी जशी पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते.

उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे?

उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली असेल तर त्या दिवशी आपण पशुपती नाथ यांचा उपवास करू शकता परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवार ही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही.

FAQ :-

प्रश्न:- पशुपतिनाथ व्रत म्हणजे काय?

उत्तर:- पशुपतिनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केलात तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणी पासून होणारा त्रास हे व्रत केल्याने दूर होऊ शकतात

प्रश्न:- पशुपती व्रतात काय खावे

उत्तर:- फळ खाऊ शकता व चहा पिऊ शकता

प्रश्न:- पुरुष पशुपतिनाथ व्रत करू शकतात का

उत्तर:-  हो पुरुष पण पशुपतिनाथ व्रत करू शकतात

48 thoughts on “पशुपतीनाथ व्रत संपूर्ण माहिती | Pashupatinath vrat complete information”

  1. खूप छान माहिती दिली यामुळे पूजा करताना काय व कसे कराचे याचे नीट ज्ञान झाले

    Reply
  2. खूप छान सुटसुटीत माहिती दिली.. यामुळे पूजा करताना काय साहित्य पाहिजे कसे काय करायचे याचे आकलन झाले… धन्यवाद श्री शिवाय नमोस्तुभ 🙏🙏🌺🌺

    Reply

    Reply
  3. शंकर भगवान पींड देवी मंदिर च्या बाहेर आहे तिथे पशुपति व्रताची पूजा केली तर चालेल का

    Reply
    • नाही ताई घरच्या शिवलिंगाची पूजा नाही चालत कारण घरातील शिवलिंग आपन एका जगेवरुन दुसऱ्या जगेवर हलवतो पण मंदिरातिल शिवलिंग एकच ठिकानी असतो आणि त्यात असे मानले जाते की मंदिरातिल शिवलिंग स्थापन केलेले असते मंदिरात शिवशंकराचा वास असतो

      Reply
  4. खूप छान सुटसुटीत माहिती दिलात … यामुळे पूजा करताना काय साहित्य पाहिजे कसे काय करायचे याचे आकलन झाले… धन्यवाद

    अभिर म्हणजे गुलालच का काही वेगळे आहे कृपया रिप्लाय द्या .

    श्री शिवाय नमोस्तुभ

    Reply
      • पशुपती व्रत मधे आरती पाच दिव्यांनी करायची का?
        की त्यातला च एक दिवा उचलून करावी सायंकाळी?

        Reply
        • जे दिवे आपण पूजेसाठी घेऊन गेलो आहोत त्या दिव्यांनी आरती करता येत नाही त्यासाठी घरून वेगळी आरती घेऊन जावी आणि त्यानेच आरती करावी

          Reply
  5. अभिर म्हणजे गुलालच का काही वेगळे आहे कृपया रिप्लाय द्या .

    Reply
      • सर पूजा करताना कोणत्या दिशेने चेहरा करून बसावे ?

        Reply
        • पशुपती व्रत करताना तुम्ही कोणत्याही दिशेला बसून पूजा करू शकता पूर्व पश्चिम कारण सध्या सर्वत्र महादेवाच्या मंदिरात खूप गर्दी आहे त्यामुळे जिथे जागा मिळेल तिथे बसून पूजा करू शकता पण मनातली इच्छा मागण्यासाठी तुम्ही एक तांब्या पाणी पूजेसाठी घेऊन गेला आहात ते दक्षिणेकडे बसून तुमचे मुख उत्तरेकडे असले पाहिजे व शिवलिंगावर पाणी अर्पण करा व मनात इच्छा मागा देवाधिदेव महादेव तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील.

          Reply
  6. शेवटच्या सोमवारी उद्यापणाच्या वेळी ६ दिवे व गोड नैवद्य पण न्यायचा का??

    Reply
    • हो मॅडम बाकीच्या सोमवारी जशी पूजा केली तशीच उद्यापनाच्या दिवशी पण तुम्हाला पूजा करावी लागेल व नैवेद्य पण घेऊन जावा लागेल

      Reply
    • पशुपती व्रताचे उद्यापन दिवशी एकादशी असेल तर तुम्ही फक्त एकादशी करू शकता त्या दिवशी उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवार ही पशुपती व त्यामध्ये पकडला जात नाही

      Reply
    • संध्याकाळच्या पूजेला जाताना तुम्हाला नैवेद्य बनवून घेऊन जावा लागेल नैवेद्याचे तीन भाग हे मंदिरात जाऊनच करावे लागतात घरून तुम्ही तीन भाग करून घेऊन जाऊ शकत नाहीत व त्यातील दोन भाग मंदिरातच ठेवायचे असतात व एक भाग तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे व तो नैवेद्य घरातल्या कुठल्याही व्यक्तीला न देता तुम्ही एकट्यानेच तो ग्रहण करावा लागेल.

      Reply
  7. उपवास संध्याकाळी सोडायचा असतो का…. किंवा उपवास केला तर संध्याकाळी काय खावे

    Reply
  8. मी अमेरिकेत राहते आहे… जवळ शंकराचे मंदिर आहे पण तिथे आपल्याला जाऊन पूजा करता येत नाही…मला पशुपति व्रत करायचे आहे …..तर हे घरात करता येईल का?

    Reply
    • मॅडम पशुपती व्रत करताना महादेवाची जी पिंड असते ती स्थानापन्न केलेली असते मंदिरामध्ये ती एकाच ठिकाणी राहते त्याची हालचाल होत नाही त्यामुळे आपण मंदिरात जाऊनच पशुपती व्रत करू शकता घरातील महादेवाची पिंड ही आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पूजा करते वेळेस जागा बदलतो त्यामुळे घरामध्ये तुम्हाला पशुपती वृत्त करता येणार नाही त्यासाठी जवळच्या कुठेतरी मंदिरामध्ये तुम्हाला जाऊन ते करावी लागेल

      Reply
  9. मला एक प्रश्न विचारायचा आहे कृपया plz उत्तर द्या..मी पशुपती व्रताला सुरावट केली आहे ..माझा एक व्रत पूर्ण झालं आहे..पण दुसऱ्या सोमवारी माझी सकाळीच पूजा झाली पण मासिक धर्म आल्यामुळे रात्रीची होऊ शकली नाही. नंतर तिसऱ्या सोमवारी पण असाच झालं. सकलची पूजा झाली पण दुपरी आमच्या कुळ मधेल कोणी गेले तर रात्रीं ची पूजा नाही झाली..त्या नंतर 14 दिवस सुतक लागलं.पूजा केली नाही..मला vicharye आहे की जो एक व्रत झालं आहे त्याला पकडून. समोरचे करायचे की आता नवीन पहिले पासून व्रत सुरू करावे.. कृपया उत्तर द्या

    Reply
    • मॅडम अशा जर अडचणी आल्या असतील आणि फक्त एकच सोमवार तुमचा झाला असेल तर तो सोडून द्या आणि आता नव्याने पशुपती व्रत करण्यास सुरुवात करा

      Reply
    • पुढे चालून तुम्ही पशुपती वृत्त करत असताना जर मासिक धर्म आला तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करावा लागेल परंतु मंदिरात जाऊन पूजा करू शकणार नाही व तो सोमवार ही पशुपतिव्रतामध्ये धरता येणार नाही एक्स्ट्रा एक सोमवार करावा लागेल.

      Reply
  10. अधिक श्रावण मधे पशुपती व्रत केले तर चालले का..एक झालं आहे

    Reply
    • मॅडम अधिक महिन्यांमध्ये आणि श्रावण महिन्यामध्ये पशुपती व्रत केलेले चालत नाही त्यामुळे हे झाल्यानंतर तुम्ही पशुपती वृत्त करू शकता

      Reply
  11. खूप छान माहिती दिली यामुळे पूजा करताना काय व कसे कराचे याचे नीट ज्ञान झाले
    dhanyavad

    Reply
  12. adhik mahinyat karu shakto ka pashupatinath vrat? ani jo diva ujavya hatala (Right hand) lavaycha aahe toh aaplya ujavya hatala lavava na?

    Reply

Leave a Comment