How To Strat Papad Making Business In Marathi
मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की भारतामध्ये पापडाची मागणी किती आहे कारण घरामध्ये कुठलाही कार्यक्रम असो किंवा सण असो घरामध्ये नियमितपणे जेवणामध्ये पापडाचा वापर केला जातो खरं सांगायचं झालं तर पापडा शिवाय जेवणाला चवच नाही. तर मित्रांनो ऑल इन वन मराठी च्या या पोस्टमध्ये आपण पाहणार आहोत Papad Making Business In Marathi बद्दल संपूर्ण माहिती पापड बनवण्याच्या व्यवसायाला किती खर्च लागतो काय सामग्री लागते हा व्यवसाय घरी बसून करता येतो का या व्यवसायामध्ये किती कमाई होते अशा खूप साऱ्या प्रश्ना बद्दल माहिती घेणार आहोत.
पापड बनवण्याच्या व्यवसायाला लागणाऱ्या आवश्यक मशीन? Machines Needed For Papad Making Business?
- पुलुब्लिझर मशीन (मसाले आणि बटर मिक्स करण्यासाठी)
- फ्लोर मिल मशीन
- ग्राइंडर मशीन
- पापड बनवण्याची मशीन
- ड्रायर मशीन (पापड वाळवण्यासाठी)
- पॅकिंग मशीन (पापड पॅक करण्यासाठी)
पापड बनवण्याच्या व्यवसायासाठी आवश्यक साहित्य? Necessary Materials For Papad Making Business?
- उडदाची डाळ
- मीठ
- हिंग
- मसाले
- पाणी
- काळा पेपर
- खाद्यतेल
पापड बनवण्याच्या व्यवसायाला लागणारा खर्च? The Cost Of Papad Making Business?
पापड बनवण्याच्या व्यवसायाला लागणारा खर्च हा तुमच्या गुंतवणुकीवर निर्भर करतो कारण पापड बनवण्याच्या व्यवसायाला सुरुवातीला तुम्हाला खर्च लागेल जसे की मशीन आणि सामग्रीसाठी तसे पाहायला गेले तर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास चार ते पाच लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल पण तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये पण हा व्यवसाय सुरू करू शकतो.
पापड व्यवसायामध्ये कमाई किती होते? How Much Money Earn in Papad Making Business?
पापड बनवण्याच्या व्यवसायामध्ये एक किलो पापड मागे वीस रुपये तुम्हाला मिळू शकतात जर तुम्ही दिवसाला दहा किलो चे पापड तयार केले तर तुमची दिवसाची कमाई दोनशे रुपये होईल म्हणजे महिना सहा हजार रुपये तुम्हाला पडेल जसजसे तुम्ही व्यवसाय वाढवाल तसे तसे कमाई पण तुमची वाढत जाईल.
पापड व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणत्या लायसन्स ची आवश्यकता लागते? What License Is Required To Start a Papad Business?
- शॉप ॲक्ट लायसन
- उद्यम आधार रजिस्ट्रेशन
- फूड लायसन
पापड बनवण्याच्या व्यवसायासाठी मार्केटिंग कशी करावी? Marketing For Papad Making Business?
मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहित असेलच की कोणताही व्यवसाय सुरु केला तर त्या व्यवसायाला मोठे करण्यासाठी मार्केटिंगची आवश्यकता लागते जोपर्यंत तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत पण तुमचा व्यवसाय वाढू शकणार नाही.
मित्रांनो सध्याच्या काळात कोणत्याही व्यवसायाची मार्केटिंग करणे हे खूप सोपे झाले आहे कारण सध्याचा काळ हा डिजिटल युग म्हणून ओळखला जातो त्यामुळे कोणताही व्यवसाय आपण जर डिजिटली घेऊन गेला तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल.
- तुम्ही तुमच्या व्यवसायाची जाहिरात सोशल मीडियाद्वारे करू शकता
- तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही लोकल न्यूज पेपर मध्ये देऊ शकता
- तुमच्या व्यवसायाचे बॅनर गर्दीच्या ठिकाणी किंवा मार्केट एरिया मध्ये लावू शकता
- व्यवसायाचे व्हिजिटिंग कार्ड तुम्ही लोकांना देऊ शकता
अशा प्रकारे तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग केली तर खूप सारे लोक तुमच्या व्यवसायाकडे आकर्षित होतील तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल.
मित्रांना ऑल इन वन मराठी च्या या पोस्टमध्ये आपण पापड बनवण्याच्या व्यवसायाबद्दल आपणाला माहिती दिली ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आम्हाला कमेंट करून कळवा.