Nuksan Bharpai Anudan Kyc

Nuksan Bharpai Anudan Kyc

मित्रांनो यापूर्वी 50 हजार रुपये अनुदानाच्या याद्या प्रकाशित करण्यात आल्या होत्या त्या यादीमध्ये नाव आल्या शेतकऱ्यांना जशाप्रकारे केवायसी करावी लागली होती त्याचप्रमाणे गारपीट असेल अवकाळी पाऊस असेल अतिवृष्टी अनुदान असेल दुष्काळ अनुदान असेल किंवा सततच्या पावसाचे अनुदान असेल या संदर्भातील ज्या याद्या प्रकाशित केल्या जातील या यादीमध्ये शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक दिला जाईल त्या विशिष्ट क्रमांकानुसार शेतकऱ्याची केवायसी आपले सरकार केंद्राच्या माध्यमातून केली जाईल आपले सरकार केंद्राला शासनाच्या माध्यमातून केवायसी ची जी रक्कम असेल ती दिली जाणार आहे ही केवायसी शेतकऱ्यांना मोफत असणार आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून नुकसान भरपाई केवायसी करण्यात येणार आहे.

Nuksan Bharpai Anudan Kyc

सर्वप्रथम आपले सरकारच्या अधिकृत पोर्टल वरती लॉगिन करावे लागेल लॉगिन झाल्यानंतर शेतकऱ्याला जो विशिष्ट क्रमांक म्हणजेच लाभार्थी क्रमांक मिळाला असेल तर त्या ठिकाणी टाकावा लागेल लाभार्थी क्रमांक टाकल्या नंतर शेतकऱ्याची सर्व माहिती आपल्यासमोर प्रकाशित होईल प्रकाशित झालेल्या माहितीमध्ये काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त करून घ्याव्या व त्रुटी नसल्यास सर्व बाजूसहमती दाखवून आपली केवायसी पूर्ण करून घ्यावी लागेल केवायसी पूर्ण झाल्यावर आपल्याला त्याची पावती दिली जाईल ती आपल्यापाशी प्रिंट करून ठेवावे ठेवावी.

Nuksan Bharpai Recipt

याच्यासाठी शासनाकडून केवायसी करण्याचे आव्हान केले जाईल यासाठी जवळपास 26 लाख 95 हजार शेतकरी पात्र झाले आहेत या शेतकऱ्यांचे याद्या तहसील कार्यालयाला दिल्या गेल्या आहेत काही ठिकाणी तलाठ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्या दाखवण्यात येतील व त्यानंतर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिले जातील ही केवायसी पूर्ण झाल्यानंतर एक ते दोन दिवसांमध्ये हे अनुदानाचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये करण्यात येईल हे अनुदान 10 जुलै च्या आत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल अशी शक्यता आहे