Namo Shetkari Yojana: पीएम किसान योजनेच्या आधारावर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू करण्याची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती त्यानुसार 15 जून रोजी मार्गदर्शक सूचना शासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत पीएम किसानचा लाभ घेत असलेले शेतकरी लाभासाठी पात्र ठरणार असून राज्यातील जवळपास एक कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या संख्येमध्ये वाढ होऊ शकते कारण 15 लाख शेतकरी आपली केवायसी पूर्ण करून या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत मात्र सध्या तरी जवळपास एक कोटी शेतकरी लाभास पात्र आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात या योजनेप्रमाणेच राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणली असून या योजनेअंतर्गत सुद्धा वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार याप्रमाणे मिळणार आहेत या दोन्ही योजनेचे एकूण वर्षाला 12 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमो शेतकरी महासन्मान निधी योजने करिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाण म्हणून गृहीत धरण्यात येणार आहेत.
हे काम करा पूर्ण
राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो महासन्मान निधी योजनेची अंमलबजावणी बाबत मार्गदर्शक सूचना जारी झाल्याने ही योजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पीएम किसान योजनेच्या आधारावर या योजनेची निकष आहेत शिवाय ते शेतकरी लाभासाठी पात्र ठरणार आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेअंतर्गत केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी केली नसेल अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा आगामी हप्ता मिळण्याची चिन्हे कमी आहेत परिणाम अशा शेतकऱ्यांना महासन्मानच्या लाभापासून देखील वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी या दोन्ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केल्या नसतील त्यांनी केवायसी आणि आधार जोडली पूर्ण करणे आवश्यक आहे.
पीएम किसान पोर्टलवर नोंदणी केलेले व केंद्र शासनाच्या निकषानुसार लाभासाठी पात्र ठरलेले सर्व लाभार्थी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या लाभासाठी पात्र असणार आहेत तसेच केंद्र शासनाने निकषांमध्ये केलेले बदल तात्काळ नमो शेतकरी योजनेसाठी देखील लागू होणार आहेत तसेच पीएम किसान पोर्टलवर नव्याने नोंदणी होऊन लाभ मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे.
नमो शेतकरी योजना या दिवशी मिळणार पहिला हप्ता पहा