Namo Shetkari Yojana First Installment

Namo Shetkari Yojana First Installment

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्याने पी एम किसान योजनेचा लाभ घेत असलेले सर्व पात्र शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी ही केवायसी आणि बँक खात्याला आपला आधार जोडणी केली नाही अशा शेतकऱ्यांना योजनेच्या लाभापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आगामी हफ्त्यापूर्वी तात्काळ ही केवायसी आणि बँक खात्याला आधार जोडणी करून घेणे अनिवार्य आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेले मार्गदर्शक सूचनेनुसार महासंघात योजनेअंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत केंद्र शासनाच्या पीएम किसान योजनेप्रमाणे तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता एप्रिल ते जुलै व दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केला जाणार आहे.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर इतरांना शेअर नक्की करा आणि आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.