Nagar Parishad Bharti 2023: नगरपरिषद भरती 2023, आजच करा ऑनलाईन अर्ज.

Nagar Parishad Bharti 2023: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र नगरपरिषद अंतर्गत मोठ्या प्रमाणात भरती निघाली आहे या भरतीमध्ये महाराष्ट्रामध्ये 1782 रिक्त पदे सरळसेवा पद्धतीने भरण्यात येणार आहेत यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करावा त्यासाठी पात्रता काय हवी असेल त्यासोबतच अर्ज कसा करावा या लेखाद्वारे आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

महाराष्ट्र नगर परिषद (Maha DMA) ने विविध विभागांमध्ये 1782 गट-क पदांच्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. नगर परिषद महाराष्ट्र भरती 2023 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 13 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली आहे यासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरून घ्यायचे आहेत फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2023 आहे.

विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा?

महाराष्ट्र नगर परिषद विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.

 • इच्छुक उमेदवार दहावी पास बारावी पास ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात.
 • 18 ते 36 वर्षे वयोगटातील उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.

कोणत्या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे?

 • विद्युत अभियंता
 • संगणक अभियंता
 • स्थापत्य अभियंता
 • लेखपाल लेखापरीक्षक
 • अग्निशमन अधिकारी
 • स्वच्छता निरीक्षक
 • मलमिस्सारण व स्वच्छता अभियंता
 • कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी

नगर परिषद महाराष्ट्र भर्ती 2023 साठी अर्ज कसा करावा?

 • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम महाडीएमए https://mahadma.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर जावे लागेल.
 • संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावरती आपल्याला रिक्रुटमेंट या टॅब वरती क्लिक करावे लागेल.
 • “नगर परिषद महाराष्ट्र भर्ती 2023” लिंकवर क्लिक करावे लागेल.
 • त्यानंतर ऑनलाईन अर्ज करा या बटणावर क्लिक करावे लागेल.
 • आपल्यासमोर अर्ज उघडण्यात येईल तो अर्ज व्यवस्थित रित्या भरून घ्यावा.
 • अर्ज भरल्यानंतर सर्व कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करून घ्यावेत.
 • त्यानंतर आपल्याला या अर्जाची फी फीस भरून घ्यावी लागेल की तुम्ही ऑनलाईन पद्धतीने भरू शकता.
 • त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करून आपला फॉर्म भरून घ्यावा.

नगर परिषद महाराष्ट्र भरती 2023 साठी निवड प्रक्रिया?

नगर परिषद महाराष्ट्र भरती 2023 मध्ये सर्वप्रथम उमेदवाराला प्राथमिक परीक्षा द्यावी लागेल प्राथमिक परीक्षा पास झालेला उमेदवाराला मुख्य परीक्षा द्यावी लागेल मुख्य परीक्षेमध्ये पास झालेल्या उमेदवाराचा उमेदवाराला नंतर मुलाखतीसाठी बोलवले जाईल निवड झालेल्या उमेदवारांची नियमित नियुक्ती केली जाईल.

Leave a Comment