Mukhyamantri saur krishi vahini Yojana 2.0: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना यापूर्वी राबविण्यात आली होती ज्यामध्ये या योजनेसाठी भाडेतत्त्वावर जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपये दिले जात होते परंतु आता या योजनेमध्ये बदल करण्यात आलेले आहेत या नवीन योजनेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2.0 असे नाव दिले गेले आहे.
या योजनेच्या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पडीक आहेत अशा शेतकऱ्यांनी जमिनी या योजनेसाठी भाड्याने दिल्या तर त्यांना आता एक लाख 25 हजार रुपये वार्षिक राज्य शासनातर्फे दिले जाणार आहेत याशिवाय प्रत्येक वर्षाला या रकमेमध्ये तीन टक्क्यांनी वाढ करण्यात येणार आहे या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना दिवसा व अखंडित वीजपुरवठा हवा यासाठी ही योजना राबवली जात आहे.
मित्रांनो शेतकऱ्याची सोय आणि त्यांच्या मागणीनुसार शेतातील कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणाच्या वतीने मागील काही वर्षापासून राज्यांमध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली गेली आहे त्या योजनेस राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला होता दिनांक आठ मे 2023 पासून राज्य शासनाने या योजनेस अधिक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला आहे या योजनेमध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 या नावाने नवीन योजना पुढे सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 75000 ऐवजी एक लाख 25 हजार रुपये भाडे देण्यात येणार आहे.
या योजनेसाठी शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही प्रकारच्या जमिनीचा वापर करण्यात येणार आहे व त्यातून शेतकऱ्यांना नियमित उत्पन्नाची संधी पण दिली जात आहे महावितरणाच्या वीज वितरण उपकेंद्रापासून पाच किलोमीटरच्या आतील शेतकरी या योजनेत आपली जमीन देऊ शकतात या योजनेच्या अंतर्गत किमान तीन एकर आणि अधिकारी ५० एकर पर्यंत जमीन सौर ऊर्जेसाठी भाड्याने देता येणार आहे महावितरणाच्या उपकेंद्रापासून जवळील जमिनींना या योजनेत प्राधान्य असणार आहे व या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणाऱ्या ग्रामपंचायतींनाही राज्य शासनाकडून 15 लाख रुपयांचे अनुदान पण दिले जाणार आहे.
कोणत्या जिल्ह्यातून किती प्रतिसाद मिळत आहे?
या योजनेसाठी महावितरणाच्या लातूर परी मंडळातून जवळपास 4548 एकर जमिनीचे प्रस्ताव शेतकऱ्यांकडून दाखल करण्यात आले आहेत या परिमंडळात लातूर बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश आहे.
शेतकऱ्यांचे | शासकीय जमीन |
लातूर 429 एकर | 858 एकर |
बीड 425 एकर | 1118 एकर |
धाराशिव 460 एकर | 1258 एकर |