Complete Information About MSME In Marathi
एमएसएमई म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग म्हणजेच लघु आणि मध्यम उद्योग. MSME चे व्यवस्थापन सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) द्वारे केले जाते आणि भारताच्या सामाजिक-आर्थिक विकासात एमएसएमई क्षेत्राचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, म्हणूनच त्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा देखील म्हटले जाते. हे क्षेत्र केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर ग्रामीण भागाच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजावते. २७ ऑगस्ट २०२२ पर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार भारतात सुमारे ७९.२७ दशलक्ष MSME आहेत.
एमएसएमई प्रमाणपत्र म्हणजे काय? What is MSME Certificate In Marathi?
MSME नोंदणी म्हणजे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगासाठी भारत सरकार कडून लहान व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास (MSMED) कायदा, 2006 लागू केला आहे. मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस एंटरप्राइझमधील एमएसएमई कायद्यानुसार रजिस्ट्रेशन करू शकता.
प्रत्येक सूक्ष्म, लहान किंवा मध्यम व्यवसायिकांनी उद्यम आधार रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे, हे रजिस्ट्रेशन आयुष्यभरासाठी वैध आहे आणि ज्या व्यवसायिकांनी आपला व्यवसाय आधीच सुरू केला आहे त्यांना मिळू शकते.
एमएसएमई फुल फॉर्म? MSME Full Form
MSME म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हे भारत सरकारने सुरू केलेले व्यवसाय एमएसएमई क्षेत्रांच्या विकासासाठी त्यांच्या आकाराने लहान आणि तुलनेने कमी भांडवली गुंतवणुकीद्वारे स्थानिक विकासात योगदान देत आहेत. आणि देशांतील अर्थव्यवस्थेचा एक आवश्यक भाग आहेत, कारण ते बर्याचदा रोजगार देतात व देशातील विकासासाठी योगदान देत आहेत.
MSME साठी कोण अर्ज करू शकतो? Who Can Apply MSME Ragistration In Marathi
मित्रांनो खूप साऱ्या लोकांना हा प्रश्न पडलेला असतो की आपण एम एस एम ई नोंदणी करावी का नाही एम एस एम ई नोंदणी आपल्यासाठी आहे का ही नोंदणी कोण करावी लागते याबद्दलची यादी खालील प्रमाणे दिली आहे.
- प्रोप्रायटर शिप फॉर्म
- प्रायव्हेट कंपनी
- सरकारी कंपनी
- एल एल पी कंपनी
- वन पर्सन कंपनी
- को-ऑपरेटिव्ह सोसायटी
एम एस एम ई उद्यम आधार रजिस्ट्रेशन कसे करावे? How to do MSME Udyam Aadhaar Registration In Marathi?
मित्रांनो सर्वप्रथम एम एस एम ई च्या ऑफिशिअल वेबसाईट https://udyamregistration.gov.in/ वरती जावे लागेल त्यानंतर नवीन उद्यम आधार पर्याय निवडावा लागेल त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर व आधार कार्ड वरील संपूर्ण नाव टाकावे लागेल त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर वरती ओटीपी येतो ओटीपी व्हरिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन नंबर टाकावा लागेल व व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- तुमच्या व्यवसायाचे नाव
- तुमची कास्ट
- व्यवसायाचा पत्ता
- पिन कोड
- व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक
- अकाउंट नंबर
- आयएफएससी कोड
- कामगारांची संख्या
- व्यवसायाची कॅटेगिरी
या सर्व गोष्टी संपूर्णपणे भरून घ्यावे लागतील त्यानंतर सबमिट बटन वर ती क्लिक करून फायनल ओटीपी सबमिट करून घ्यावा लागेल व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमच्या ई-मेल आयडी वरती एम एस एम ई कडून मेल येईल त्यानंतर तुम्ही सर्टिफिकेट डाऊनलोड करू शकता.
udyam नोंदणी प्रक्रिया? Udyam Registration Process
मित्रांनो उद्यम आधार रजिस्ट्रेशन कसे करायचे याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिली आहे
Step1: https://udyamregistration.gov.in/Government-India/Ministry-MSME-registration.htm लिंक वर क्लिक करा
Step2: या पर्यायावर क्लिक करा
Step3: त्यानंतर तुमचा आधार नंबर आणि आधार कार्ड वरील संपूर्ण नाव जशास तसे व्यवस्थित भरून घ्या
एम एस एम ई (उद्यम आधार) रजिस्ट्रेशन करण्याचे फायदे? Benefits of MSME Registration
मित्रांनो एम एस एम ई म्हणजेच उद्यम आधार रजिस्ट्रेशन करण्याचे काय फायदे आपल्याला मिळतात याबद्दलची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- एम एस एम ई म्हणजेच उद्यम आधार नोंदणी केलेल्या व्यवसायांना बँकेकडून कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध केले जाते.
- राज्य सरकार द्वारे एम एस एम ई अंतर्गत येणाऱ्या व्यवसायांना लागणाऱ्या टॅक्स वरती सूट दिली जाते.
- लाईट बिलामध्ये सवलत मिळते
एम एस एम ई उद्यम आधार चे प्रकार? Types of MSMEs In Marathi
सूक्ष्म:- सूक्ष्म उद्योग अंतर्गत असे व्यवसाय येतात ज्यांनी 1 करोड रुपयांच्या आत व्यवसायासाठी गुंतवणूक केली असले व वार्षिक उत्पन्न हे 5 करोड पेक्षा कमी असेल.
लघु:- लघु उद्योग अंतर्गत असे व्यवसाय येतात ज्यांनी 10 करोड रुपयांच्या आत व्यवसायासाठी गुंतवणूक केली असले व वार्षिक उत्पन्न हे 50 करोड पेक्षा कमी असेल.
मध्यम:– लघु उद्योग अंतर्गत असे व्यवसाय येतात ज्यांनी 20 करोड रुपयांच्या आत व्यवसायासाठी गुंतवणूक केली असले व वार्षिक उत्पन्न हे 100 करोड पेक्षा कमी असेल.
Udyam नोंदणी प्रमाणपत्र डाउनलोड? Udyam Registration Certificate Download
उद्याम रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट कसे डाउनलोड करतात याबद्दल माहिती खालील प्रमाणे दिली आहे सर्वप्रथम तुम्हाला ही लिंक ओपन करावी लागेल https://udyamregistration.gov.in/Udyam_Login.aspx
Step1:- सर्वप्रथम तुमचा उद्यम आधार नंबर व्यवस्थित रित्या टाकून घ्यावा उदाहरणार्थ ( UDYAM-MH-33-0275178)
Step1:- व त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून घ्यावा
Step 3: व्हॅलिडेट जनरेट ओटीपी यावरती क्लिक करावे
Step4: तुमच्या समोर उद्यम आधार रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट प्रिंट करण्याचा पर्याय येईल त्यावर ती क्लिक करा आणि ते पीडीएफ मध्ये सेव करा किंवा लगेच प्रिंट करा
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण MSME संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता वही माहिती तुमच्या मित्रांना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा घेता येईल