Milk Prices Maharashtra: दूध दरासाठी शासनाचा मोठा निर्णय,आता असे ठरणार दुधाचे भाव

Milk Prices Maharashtra: नमस्कार शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसांमध्ये राज्यांमध्ये दुधाच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घसरण झालेली आहे आणि पशुखाद्याचे दर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर दिनांक 27 जून 2023 रोजी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री व दूध उत्पादक त्यासोबतच पशुखाद्य उत्पादक सहकारी व खाजगी दूध संघ आणि शेतकरी संघटनांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक पार पडली.

या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार 27 जून 2023 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून दुधाचे दर निश्चित करण्यासाठी राज्य शासनाकडून मोठा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे मित्रांनो राज्यामध्ये दूध संकलन हे प्रामुख्याने खाजगी आणि सहकारी संस्थांच्या माध्यमातून केले जाते आता राज्य शासनाच्या माध्यमातून दुधाला किमान भाव मिळावा यासाठी एक समिती नेमण्यात आली आहे या समितीचे अध्यक्ष आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास महाराष्ट्र राज्य हे असतील व इतर दूध जिल्हा उत्पादक संघ हे सदस्य असतील.

या समितीच्या माध्यमातून दर तीन महिन्याला बैठक घेतली जाईल राज्यातील सहकारी व खाजगी दूध संघाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गाईच्या दुधाला (3.5/8.5) व म्हशीच्या दुधाला (6.0/9.0) दिला जाणारा किमान दूध दर (मिनिमम रेट कॅप) हा निश्चित केला जाणार आहे या समितीच्या बैठकीमध्ये जो दूध दर निश्चित केला जाईल त्यास आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांना शासनाची मान्यता घ्यावी लागेल.

व किमान दूध दर कोणतेही कपात न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना देणे हे राज्यातील सर्व सहकारी व खाजगी दूध संस्थांना बंधनकारक करण्यात येईल राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना किमान दूध दर प्रत्येक तीन महिन्यांना दिले जाते हा एक मोठा दिलासादायक निर्णय शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने घेतला आहे.

Leave a Comment