Complete Information About M.ed Course In Marathi
नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या लेखामध्ये आपण एम एड कोर्स बद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो जर तुम्ही भविष्यामध्ये m.ed करण्याचा विचार करत आहात तर ही माहिती उपयोगी ही माहिती काळजीपूर्वक वाचा एम एड कोर्स काय आहे? एम एड कोर्स ची ऍडमिशन प्रक्रिया काय आहे? एम एड कोर्स केल्यानंतर तुम्हाला काय फायदा होऊ शकतो? कोर्स कोणत्या कॉलेजमध्ये करू शकता या सगळ्या प्रश्नांची उत्तर या लेखामध्ये दिली आहेत.
मित्रांनो तुम्हाला जर शिक्षण क्षेत्रामध्ये करियर घडवायचं असेल तर एम एड कोर्स तुम्हाला करणे आवश्यक आहे एम एड ला (मास्टर ऑफ एज्युकेशन) असे म्हणतात.
एम एड कोर्स काय आहे? What Is M.Ed Course
मित्रांनो एम एड हा एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री कोर्स आहे हा कोर्स दोन वर्ष 4 सेमिस्टर मध्ये पूर्ण केला जातो खेळ एम एड ला मास्टर ऑफ एज्युकेशन असे म्हणतात एम एड कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वप्रथम बीएड करणे आवश्यक आहे तरच तुम्ही एम एड करू शकता. कारण एम एड हा मास्टर डिग्री कोर्स आहे त्यामुळे तुम्हाला बॅचलर डिग्री कोर्स पूर्ण असणे गरजेचे आहे तरच एम एड मध्ये विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकतो. हा कोर्स तेच विद्यार्थी करतात ज्यांना शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं करिअर घडवायचा आहे.
जेव्हा तुम्ही हा कोर्स करतात तुम्हाला नवीन नवीन गोष्टींची माहिती होईल यामध्ये तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही चांगले शिक्षक कसे बनवू शकतो शिक्षण क्षेत्रातल्या नवीन पद्धत काय आहे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने कसे शिकवता येईल याबद्दल मार्गदर्शन केले जाते.
एम एड कोर्स करण्यासाठी पात्रता काय आहे? M.Ed Course Eligibility
- एम एड कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्याला सर्वप्रथम ग्रॅज्युएशन पूर्ण पूर्ण करावे लागते
- विद्यार्थ्याला ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यावर कमीत कमी 50 ते 60 टक्के मार्क असावे लागतात.
- ग्रॅज्युएशन झाल्यानंतर विद्यार्थ्याने बीएड केले असावे.
- 5% ओबीसी एसी एसटी या वर्गातील विद्यार्थ्यांना सवलत आहे.
एम एड कोर्स करण्यासाठी फीस किती आहे? How Much Is The Fee For The M.ed Course
मित्रांनो तसे पाहायला गेले तर प्रत्येक कॉलेजमध्ये वेगवेगळी फीस आकारली जाते पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये थोडीशी जास्त ऑफिस तुम्हाला द्यावी लागेल आणि गव्हर्नमेंट कॉलेज मध्ये थोडीशी फीस कमी लागते पण जर आपण अवरेज पाहिले एम एड कोर्स हा दोन वर्षाचा आहे प्रत्येक वर्षाला तुम्हाला कमीत कमी चाळीस हजार रुपये फीस द्यावी लागेल.
M.ed स्पेशलायझेशन कोर्स कोणते आहेत? What are the M.Ed Specialization Courses
- एम एड इन एज्युकेशनल टेक्नॉलॉजी
- एम एड इन स्पेशल एज्युकेशन
- एम एड इन वुमन स्टडीज
एम एड कोर्स ऍडमिशन प्रोसेस? M.ed course admission process
मित्रांनो एम एड कोर्स ला ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये पद्धत वेगवेगळी असते काही कॉलेजेस ॲडमिशन घेण्यापूर्वी एंट्रन्स परीक्षा द्यावी लागते ते तर काही कॉलेजेस मध्ये मिरीट लिस्ट प्रमाणे ॲडमिशन दिले जाते त्यानंतर विद्यार्थ्याला ॲडमिशन मिळते.
एम एड कोर्ससाठी महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालये? Best Colleges In Maharashtra For M.Ed Course
- एस पी पी यु (पुणे)
- मुंबई यूनिवर्सिटी
- आर टी एम एन यु यूनिवर्सिटी (नागपुर)
- वाय सी एम ओ यु यूनिवर्सिटी )नाशिक)
- शिवाजी युनिव्हर्सिटी (कोल्हापूर)
- एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (पुणे)
- एस एन डी टी (मुंबई)
- बी ए एम यु युनिव्हर्सिटी (औरंगाबाद)
- शिवाजी महाराज यूनिवर्सिटी (नवी मुंबई)
- गोंडवाना युनिव्हर्सिटी (गडचिरोली)
- संत गाडगे बाबा यूनिवर्सिटी (अमरावती)
- एस आर टी एम यू एन टी युनिव्हर्सिटी (नांदेड)
- कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी (जळगाव)
एम एड कोर्स केल्यानंतर कोणत्या क्षेत्रांमध्ये जॉब करू शकता? In Which Areas Can You Work After Doing M.Ed Course?
एम एड कोर्स केल्यानंतर कोण कोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला जॉब मिळू शकतो त्या बद्दल ची यादी खालील प्रमाणे दिली आहे.
- प्राध्यापक
- सहायक प्राध्यापक
- खाजगी प्रशिक्षण संस्था
- करिअर सल्लागार
- रिसर्च