Mansoon Update: नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात प्रत्येक शेतकरी व सामान्य माणूस हा मान्सूनची आतुरतेने वाट पाहत होता दरवर्षीप्रमाणे मान्सून हा सात जूनला महाराष्ट्रामध्ये हजेरी लावतो पण यावर्षी मान्सूनने हजेरी लावण्यास उशीर केला त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या राज्यात भरपूर भागात झाल्या नाहीत त्यामुळे प्रत्येक शेतकरी हा पावसाची वाट पाहत होता त्यासोबतच राज्यातील प्रत्येक नागरिका उन्हाच्या तडाक्यामुळे हैरान झाला होता त्यामुळे प्रत्येक जण पावसाची आतुरतेने वाट पाहत होते.
आता मान्सून महाराष्ट्रामध्ये सक्रिय झाला असून राज्याच्या विविध भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे राज्यातील धुळे, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, बीड जिल्ह्याचा काही भाग लातूर व धाराशिव जिल्ह्याचा काही भाग जालना हे भाग वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे या पावसामुळे शेतकरी समाधानी आहेत परंतु तरीही शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची अपेक्षा आहे.
मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यामध्ये पावसाच्या वातावरण असणार आहे हवामान खात्याच्या माध्यमातून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये येल्लो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे.
कोणत्या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा दिला आहे पहा