Lek Ladki Yojana | अशा प्रकारे करू शकता अर्ज, संपूर्ण माहिती

मित्रांनो शिंदे फडणवीस सरकारकडून 2023 मधील पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून Lek Ladki Yojana आता नव्या स्वरूपात सुरू करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरीब कुटुंबातील मुलींना 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

Lek Ladki Yojana

मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावरती 5000 हजार रुपये रोख रक्कम मुलीच्या खात्यात जमा केली जाईल तसेच मुलगी इयत्ता चौथी मध्ये गेल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 4000 रुपये जमा करण्यात येतील व मुलगी इयत्ता सहावी मध्ये गेल्यानंतर तिच्या खात्यामध्ये 6000 हजार रुपये जमा करण्यात येतील तसेच मुलगी अकरावीत गेल्यावर मुलीच्या खात्यात 8000 हजार रुपये रक्कम जमा केली जाईल लाभार्थी मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख रक्कम तिच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे या योजनेचा लाभ प्रत्येक गरीब कुटुंबातील मुलींना देण्यात येणार आहे ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असेल अशा कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ घेता येईल.

Lek Ladki Yojana

सर्वप्रथम जाणून घेऊ ही योजना नेमकी काय आहे महाराष्ट्र राज्यातील मुलींना सक्षम बनवण्यासाठी शिंदे फडणवीस सरकारकडून उचललेला हा एक महत्त्वाचा पाऊल या योजनेअंतर्गत देशातील राज्यातील मुलींना सक्षम बनवण्यासाठी आर्थिक मदत म्हणून ही योजना सुरू केली गेली आहे यामुळे राज्यातील मुलींना त्यांच्या शिक्षणासाठी मदत दिली जाईल राज्य सरकारकडून सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे आपल्या सर्वांना माहीत असेलच आपल्या देशांमध्ये स्त्री भ्रूण हत्या मोठ्या प्रमाणात होत आहेत त्याचे कारण समजून मुलींना सक्षम बनवण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी हे एक मोठे पाऊल ठरेल या योजनेअंतर्गत गरीब वर्गातील मुलींना जन्मापासून तिच्या शिक्षणापर्यंत आर्थिक मदत महाराष्ट्र शासनाकडून केली जाईल.

लेक लाडकी योजनेबद्दल संपूर्ण माहिती

योजनेचे नाव लेक लाडकी योजना
योजनेची सुरुवात 9 मार्च 2023
योजनेचा मुख्य उद्देश मुलींना सक्षम बनवण्यासाठी
लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील गरीब मुली
ऑफिशियल पोर्टल अद्याप सुरू केले गेले नाही
पहिला हप्ता जन्मानंतर 5000 रुपये
दूसरा हफ्ता इयत्ता चौथी मध्ये 4000 रुपये
तिसरा हप्ता इयत्ता सहावी मध्ये 6000 रुपये
चौथा हप्ता अकरावी मध्ये आठ हजार रुपये
पाचवा हप्ता अठरा वर्षे पूर्ण झाल्यावर 75000 रुपये

 

लेक लाडकी योजनेचा मुख्य उद्देश काय आहे?

मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असेलच महाराष्ट्र राज्यातील अनेक कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हालाखीची असल्या कारणामुळे याचा परिणाम मुलींच्या शिक्षणावर ती होतो त्यामुळे अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेची सुरुवात केली आहे या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मुलींच्या शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा लाभ पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील मुलींना सरकारतर्फे देण्यात येणार आहे ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलीच्या जन्मापासून ते तिच्या अठरा वर्ष वयापर्यंतच्या शिक्षणासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जाईल त्यामुळे मुलींना चांगले शिक्षण मिळू शकेल आणि त्या आपल्या कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतील यासाठी एक छोटासा प्रयत्न.

लेक लाडकी योजनेसाठी पात्रता?

मित्रांनो लेक लाडकी योजनेसाठी महाराष्ट्र सरकारकडून काही निकष व अटी लागू करण्यात आले आहेत

 • मुलगी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे गरजेचे आहे
 • या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिच्या पाल्यांकडे पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड असणे आवश्यक आहे
 • या योजनेचा लाभ गरीब वर्गातील मुलींना मिळणार आहे
 • या योजनेच्या अंतर्गत मुलीच्या 18 वर्षे वयानंतर तिला तिचे शैक्षणिक कागदपत्रे दाखवावे लागतील त्यानंतर तिला पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्र सरकारकडून 75 हजार रुपये रक्कम तिच्या खात्यात देण्यात येईल

लेक लाडकी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

 • मुलीचा जन्म दाखला
 • मुलीचे आधार कार्ड
 • कुटुंबाचे रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला
 • शिक्षणा संबंधीचे कागदपत्रे
 • आई वडिलांचे आधार कार्ड
 • बँक पासबुक
 • जातीचे प्रमाणपत्र
 • आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर
 • दोन पासपोर्ट साईज फोटो

लेक लाडकी योजनेसाठी अर्ज कशाप्रकारे करता येईल?

वरील दिलेल्या माहितीनुसार शिंदे फडणवीस सरकारकडून नुकतीच या योजनेची सुरुवात केली आहे त्यामुळे सध्या सरकारकडून लेक लाडकी योजनेसाठी कोणतेही पोर्टल सुरू करण्यात आले नाही सरकारकडून लवकरात लवकर या योजनेसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात येईल याबद्दलची माहिती आपल्याला ऑल-इन-वन मराठीच्या पोस्ट द्वारे आपल्याला कळवण्यात येईल व अर्ज कसा करता येईल याबद्दल संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपल्याला सांगण्यात येईल.

FAQ.

Q1. लेक लाडकी योजना वेबसाईट कदी पासून सुरु होणार आहे ?

अद्याप याबद्दल सरकारकडून कोणतेही पोर्टल सुरू केले गेले नाही लवकरच सुरू होईल

Q2. लेक लाडकी योजना कोणासाठी आहे?

महाराष्ट्र राज्यातील मुलींसाठी आणि ज्यांच्याकडे केशरी आणि पिवळ्या रंगाच्या रेशन कार्ड धारकांसाठी

 

1 thought on “Lek Ladki Yojana | अशा प्रकारे करू शकता अर्ज, संपूर्ण माहिती”

 1. पण माझ्या मुलीचे वय 5 वर्ष आहे तरी मला लेक लाडकी योजना साठी पात्र होईल का

  Reply

Leave a Comment