Kusum Solar Pump Scams

Kusum Solar Pump Scams

मित्रांनो शेतकऱ्यांना सोलार पंपाची आवश्यकता असल्यामुळे राज्यांमध्ये दोन सोलार पंप योजना राबवल्या जातात यासाठी प्रत्येक शेतकरी हा नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सर्च करत असतो पण त्यांना या दोन योजनेच्या पोर्टल व्यतिरिक्त आणखी भरपूर साऱ्या लिंक पाहायला मिळतात व आपला शेतकरी त्या लिंक तर्फे तेथे तात्काळ आपले रजिस्ट्रेशन करून घेतात रजिस्ट्रेशन करून घेतल्यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल नंबर व कागदपत्रे त्या लोकांपर्यंत पोहोचतात व ते लोक वारंवार आपल्या शेतकरी मित्रांना फोन करत राहतात व त्यांच्याकडून फोटो मागवला जातो आणि एक सर्टिफिकेट आपल्याला दिले जाते त्यावरती कुसुम सोलार योजनेचा नाव टाकून शेतकऱ्याचा फोटो टाकून एक सर्टिफिकेट शेतकऱ्याला दिले जाते.

ते सर्टिफिकेट व्हाट्सअप द्वारे शेतकऱ्यांना पाठवून त्यांना सांगण्यात येते की तुम्ही कुसुम सोलार योजनेसाठी पात्र झाला आहात त्यासाठी आपल्याला पाच हजार सहाशे रुपये तात्काळ भरून घ्यावे लागतील आणि शेतकरी आनंदाने ते पैसे त्या लोकांना पाठवतात व त्यानंतर शेतकरी सोलार पंपासाठी मागणी करतात त्यावेळी त्यांना सोलार पंपाचा पाच ते दहा टक्के हिस्सा मागितला जातो म्हणजेच 25 ते 30 हजार रुपये शेतकऱ्याकडे मागणी केली जाते व शेतकऱ्याला सोलार पंप हवा असल्यामुळे तो पैसे देत राहतो आणि हा खेळ असाच चालत राहतो परंतु शेतकऱ्याला सोलार पंप न देता त्याच्याकडून मोठ्या संख्येने पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते.

शेतकरी मित्रांना एवढीच विनंती आहे की आशा टोळ्या सध्या सक्रिय झालेल्या असून तुम्ही त्यांना बळी पडू नका सरकारकडून नोंदणी करून घेतली जात आहे त्यानंतर त्याचा सर्वे करून तुम्हाला सोलर पंप दिला जाईल जर कोणी पैसे मागून तुम्हाला सोलार पंप देण्याचे आवाहन करत असेल तर अशा लोकांना बळी पडू नका आता सोलर पंप नाही मिळाला तर दोन महिन्यांनी मिळेल दोन महिन्यांनी मिळाल तर चार महिन्यांनी मिळेल पण तुम्हाला सोलर पंप मिळवून जाईल त्यामुळे सतर्क रहा.