जन समर्थ पोर्टलविषयी संपूर्ण माहीती | Jan Samarth Portal In Marathi

 Complete Information About Jan Samarth Portal In Marathi

मित्रांनो भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज क्रेडिट-लिंक्ड सरकारी योजनांसाठी नवीन पोर्टल ची सुरुवात केली आहे ज्याला जनसमर्थ पोर्टल असे म्हणतात या पोर्टल मुळे सरकारी योजनेअंतर्गत कर्ज घेणे सोपे होणार आहे व या पोर्टलवरून 13 सरकारी योजना अंतर्गत कर्ज घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येतील सध्या फक्त चार प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करण्याची सुविधा या पोर्टल वरती उपलब्ध असेल यामध्ये शिक्षण, कृषी पायाभूत सुविधा, व्यवसाय स्टार्ट अप आणि उपजीविका कर्ज  यांचा समावेश आहे जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून तुम्हाला कर्ज करण्याचा अर्ज पासून ते मंजुरी पर्यंत सर्व काही तुम्हाला ऑनलाईन करता येईल व अर्जदारांना जनसमर्थ पोर्टल द्वारे त्यांच्या कर्जाची स्थिती तपासता येईल आणि अर्जदारांना कर्ज न मिळाल्यास ऑनलाईन तक्रारही करता येणार आहे जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून सरकारने 125 हून अधिक कर्ज दाते एकत्र आणले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जनसमर्थन पोर्टलच्या माध्यमातून मध्यमवर्गीय तरुणांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत कर्जासाठी एक मोठे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे यामुळे तरुणांना स्वयंरोजगार वाढवण्यासाठी कर्ज घेणे अगदी सोपे झाले आहे.

Jan Samarth Portal

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण जनसमर्थ पोर्टल काय आहे? जनसमर्थ पोर्टल ची उद्दिष्टे काय आहेत? जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून कोणाला कर्ज मिळेल? जनसमर्थ पोर्टल द्वारे कर्ज मिळण्यासाठी पात्रता काय असेल? कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? या बद्दल संपूर्ण माहिती आपल्याला दिली आहे.

जन समर्थ पोर्टल काय आहे? What is Jan Samarth Portal?

जन समर्थ पोर्टल हे एक १३ सरकारी योजनांना जोडणारे डिजिटल पोर्टल आहे हे देशातील अशा प्रकारच्या सुविधा प्रदान करणारे पहिले व्यासपीठ आहे जे लाभार्थ्यांना थेट कर्जदारांशी जोडते जन समर्थ पोर्टलचा मुख्य उद्देश तरुणांना डिजिटल प्रक्रियेद्वारे योग्य प्रकारच्या सरकारी योजनांचे मार्गदर्शन करणे आणि विविध क्षेत्रांमध्ये कर्ज उपलब्ध करून देणे आणि देशाच्या विकासाला प्रोत्साहन देणे हा आहे
या पोर्टल द्वारे कर्ज घेण्यास इच्छुक असणाऱ्या व्यक्ती सहजपणे त्याची पात्रता तपासू शकतो आणि जर कर्जदार कर्जासाठी पात्र असेल तर तो पोर्टल वर ऑनलाइन अर्ज करू शकतो यासोबतच अर्जदाराला डिजिटल पद्धतीने परवानगी मिळणार आहे याच्या मदतीने कोणताही अर्जदार अर्ज केल्यानंतर त्याच्या कर्जाच्या स्थिती बद्दल माहिती अगदी सहज रित्या मिळवू शकतो जन समर्थ पोर्टल सर्व योजना पूर्ण होईपर्यंत खात्रीपूर्वक कव्हरेज प्रदान करते.

जन समर्थ पोर्टलची वैशिष्ट्ये काय आहेत ? What are the features of Jan Samarth Portal?

  •  जन समर्थ पोर्टलवर बँका सोबतच अनेक एनबीएफसी किंवा इतर कर्ज देणाऱ्या संस्था उपलब्ध आहेत जे या पोर्टल द्वारे कर्जासाठी अर्ज करतील त्यांना मान्यता देऊ शकतात
  • 125 हून अधिक वित्तीय संस्था तसेच बँका या पोर्टलशी जोडल्या गेल्या आहेत
  • तुम्ही या पोर्टलवरून तेरा सरकारी योजनेअंतर्गत चार प्रकारच्या कर्जासाठी अर्ज करू शकता.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? What documents are required?

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदान ओळखपत्र
  • बँक स्टेटमेंट

जन समर्थ पोर्टलवर अर्ज कसा करावा? How To Apply On Jan Samarth Portal?

सध्या या पोर्टलवर कर्जासाठी चार श्रेणी तयार करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये शैक्षणिक कर्ज, कृषी पायाभूत सुविधा कर्ज, व्यवसाय स्टार्ट अप कर्ज आणि उपजीविका कर्ज अशी या श्रेणींची नावे आहेत. प्रत्येक कर्ज श्रेणी अंतर्गत अनेक योजना आहेत. लाभार्थ्याला कोणत्या श्रेणीतील कर्ज घ्यायचे आहे, त्याला आधी त्याच्याशी संबंधित काही प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील. त्यानंतर या उत्तरांद्वारे लाभार्थी त्यांची पात्रता देखील तपासू शकतील. जर ग्राहक कर्जासाठी पात्र असेल तर त्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल.

जन समर्थ पोर्टलवर अर्जाची स्थिती कशी तपासायची? How to check the status of the application on the Jan Samarth portal

 जन समर्थ पोर्टलद्वारे कोणतीही व्यक्ती कर्ज घेऊ शकते, परंतु त्याला कर्ज मिळेल की नाही हे पात्रतेच्या आधारावर ठरवले जाईल. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला तीन दिवसात कर्ज मिळेल. यासोबतच तुम्ही या पोर्टलद्वारे कर्ज अर्जाची स्थिती देखील पाहू शकता. तुमचे कर्ज कोणत्या टप्प्यात आहे याची माहिती तुम्हाला मिळेल. अर्जदार जन समर्थ पोर्टलवर कर्ज अर्जाची स्थिती देखील पाहू शकतो. यासाठी, अर्जदाराने नोंदणीचे तपशील भरून साइन-इन करावे, ही स्थिती जाणून घेण्यासाठी डॅशबोर्डवरील माय एप्लीकेशन टॅबवर क्लिक करावे लागेल.
जना समर्थ पोर्टल रजिस्ट्रेशन लिंक : https://www.jansamarth.in/register

जन समर्थ पोर्टल अंतर्गत कोणत्या बँकेकडून कर्ज मिळू शकते? Which bank can get loan under Jan Samarth Portal?

  • स्टेट बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ बडोदा
  • पंजाब नॅशनल बँक
  • कॅनरा बँक
  • युनियन बँक
  • बँक ऑफ इंडिया
  • बँक ऑफ महाराष्ट्र
  • इंडियन बँक
  • सेंट्रल बँक ऑफ इंडिया
  • युको बँक
  • एचडीएफसी बँक
  • कोटक महिंद्रा बँक
  • आयसीआयसीआय बँक
  • ॲक्सिस बँक
  • आयडीबीआय बँक
  • इंडियन ओवरसीज बँक
  • पंजाब अँड सिंध बँक

जन समर्थ पोर्टल अंतर्गत योजनांची यादी ? List of schemes under Jan Samarth Portal?

शैक्षणिक कर्ज

  • केंद्रीय क्षेत्र व्याज सबसिडी योजना (CSIS)
  • परदेशी अभ्यासासाठी शैक्षणिक कर्जावरील व्याज सबसिडीची योजना
  • डॉक्टर आंबेडकर केंद्रीय क्षेत्र योजना

कृषी पायाभूत सुविधा कर्ज

  • कृषी दवाखाने आणि कृषी व्यवसाय केंद्र योजना
  • कृषी पायाभूत सुविधा निधी

व्यवसायिक कामासाठी चे कर्ज

  • पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
  • विणकर मुद्रा योजना
  • प्रधानमंत्री मुद्रा योजना
  • पीएम स्वनिधी योजना
  • मॅन्युअल सफाई कामगाराच्या पुनर्वसनासाठी स्वयंरोजगार योजना
  • स्टँड अप इंडिया योजना

उपजीविकेचे कर्ज

  • दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण जन समर्थ पोर्टल बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून करू शकता आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा होईल.

Leave a Comment