सौरऊर्जा व्यवसाय कसा सुरू करायचा? | How to start a solar energy business?

 

सोलर पॅनल लावण्याची योग्य पद्धत? Proper method of installing solar panels

मित्रांनो आपल्या सर्वांना माहित असेलच भारत सरकार सध्या सौर ऊर्जा solar energy business प्रकल्पावरती जास्त जोर देत आहे कारण सौर ऊर्जेचे अनेक फायदे आहेत याव्यतिरिक्त सौर ऊर्जा प्रकल्पा अंतर्गत लोकांना खूप सारे पैसे कमवण्याचे संधी उपलब्ध होत आहेत आपल्या सर्वांना माहीत असेलच सोलर पॅनल हे कोणीही आपल्या आवश्यकतेनुसार सहजरीत्या लावू शकतो.

सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येक व्यक्तीला घरांमध्ये विजेची कमतरता भासते व सध्याच्या काळात लाईट बिल हे खूप वाढीव दराने येत आहे यामुळे खूप सारे लोक त्रस्त झाले आहेत यासाठी उत्तम पर्याय म्हणजे सोलर पॅनल हे आपण आपल्या घरावरती लावल्यास आपल्याला विजेची कमतरता भासणार नाही व लाईट बिलामध्ये पण कपात होईल सध्या भारत सरकार कडून सोलार पॅनल वरती ३० % सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे

ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण भारत सरकारकडून आयोजित केलेल्या सोलर पॅनल व्यवसायाबद्दल solar energy business व त्यावरती मिळणाऱ्या सबसिडी बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत.

सोलर पॅनल सबसिडी इन्स्टॉलेशन 2022? Solar Panel Subsidy Installation 2022

मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीला भारत सरकार कडून सोलर पॅनल लावण्यासाठी सबसिडी मिळाली असेल तर घरावरती किंवा शेतामध्ये एक किलो वॅट चा सोलर प्लांट लावला तर भारत सरकार कडून त्या व्यक्तीला सबसिडी अंतर्गत 60 हजार रुपये ते 70 हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागेल पण एखादा व्यक्ती भारत सरकारच्या सबसिडी शिवाय सोलर पॅनल लावत असेल तर त्याला जवळपास एक लाख रुपये खर्च करावे लागतील हा खर्च त्या व्यक्तीला खूप भारी पडू शकतो याव्यतिरिक्त भारत सरकार प्रत्येक राज्यांना अतिरिक्त सबसिडी देण्याचा विचार करत आहे कारण जास्तीत जास्त लोक सोलार पॅनल लावून स्वतः विजेची निर्मिती करू शकतील.

सौर पॅनेल कसे बसवायचे? How to install solar panels?

भारत सरकार तर्फे सोलर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला तुमच्या शहरातील सोलर पॅनल अधिकाऱ्याशी बोलावे लागेल त्यानंतर तुम्ही लोन साठी अर्ज करण्याबाबत बोलू शकता सबसिडी सोबत पॅनल लावण्यासाठी तुम्हाला प्राधिकरण ऑफिस मधून सबसिडी चा फॉर्म घ्यावा लागेल व तुमच्या मनावर  सोलार पॅनल लावू शकतात.

देशातील प्रत्येक राज्यांमध्ये जे प्रमुख शहर आहेत त्या ठिकाणी सौर विभागाचे कार्यालय आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सोलार पॅनल संदर्भात माहिती घेऊ शकता.

सोलर पॅनल लावण्यासाठी किती खर्च येतो? How much does it cost to install solar panels?

जर तुम्ही सोलर पॅनल लावला तर तुम्हाला जास्तीच्या लाईट बिला पासून सुटकारा मिळू शकतो व तुमचा अतिरिक्त खर्च वाचू शकतो सोलर पॅनल लावण्यासाठी तुम्हाला एका बॅटरी ची आवश्यकता असते त्याची किंमत जवळपास २० हजार रुपये पर्यंत असते ही बॅटरी दहा वर्षानंतर बदलावी लागते सोलर पॅनल तुम्ही कोणत्याही ठिकाणी सहजरीत्या लावू शकता त्यासाठी तुम्हाला कुठलाही खर्च येणार नाही.

सोलर पॅनल किती काळ ऊर्जा देऊ शकतात? How long can solar panels provide energy?

सोलर पॅनल बसवल्यानंतर, आपल्याला सर्व वेळ सौरऊर्जेद्वारे वीजपुरवठा मिळतो आणि सौर पॅनेल हा एकमेव मार्ग आहे, ज्यामुळे विजेच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होत नाही. सौर पॅनेलची क्षमता सुमारे 1 kW ते 5 kW  पर्यंत असते. यासाठी तुमच्या घरात सोलर पॅनल बसवणे आवश्यक असते.

सोलर पॅनल्स म्हणजे काय? What are solar panels?

सौर पॅनेल हे एक प्रकारचे उपकरण आहे ज्याद्वारे सूर्य प्रकाशापासून वीज तयार केली जाते जी तुम्ही तुमच्या घरात वापरू शकता सौर पॅनेल हे लहान पेशींनी बनलेले असतात ज्यावर सूर्यप्रकाश पडताच त्या पेशींच्या मदतीने त्या प्रकाशाचे विद्युत प्रवाहात किंवा विजेत रूपांतर होते, अशा अनेक पेशी एकत्र येऊन एक मोठा सोलर पॅनेल तयार होतो.

सोलर प्रोडक्स सेलिंग व्यवसाय? Solar Products Selling Business Idea?


मित्रांनो सध्याच्या काळात सोलर प्रोडक्स ची मागणी मार्केटमध्ये सर्वात जास्त आहे तुम्ही तुमच्या शहरांमध्ये सोलर संबंधित प्रॉडक्ट विकून व्यवसाय करू शकता

  • सोलर तवा
  • सोलर गिझर
  • सोलर बल्प
  • सोलर लॅम्प
  • सोलर गार्डन लाइट्स

अशा प्रकारचे अनेक प्रॉडक्ट तुम्ही विकून चांगली आमदनी प्राप्त करू शकता

सोलर रिपेरिंग आणि मेन्टेनन्स व्यवसाय? Solar Repairing and Maintenance Business Idea

मित्रांनो भारतामध्ये Solar Pannel बसवण्याची मागणी खूप वाढली आहे अशात जर तुम्ही सोलर रिपेरिंग आणि मेंटेनन्स चा व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यामधून खूप सारे पैसे कमवण्याची संधी मिळणार आहे कारण या व्यवसायात खूप कमी प्रमाणात लोक उपलब्ध आहेत त्यामुळे सोलर रिपेरिंग चा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो..

सौर ऊर्जा ट्रेनिंग प्रोग्राम कोणते आहेत? What are Solar Energy Training Programs?

मित्रांनो भारत सरकारकडून Solar Energy Taining Program आपल्यासाठी फ्री मध्ये उपलब्ध करून दिले जात आहेत ते तुम्ही पाहून स्वतहाचा व्यवसाय सुरू करू शकता देशातील प्रत्येक राज्यामध्ये हे ट्रेनिंग प्रोग्राम सुरू आहेत जवळपास याचे 175 ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहेत

सूर्यमित्रा स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम

भारतातील सोलर पॅनल बनवणाऱ्या कंपन्या कोणत्या आहेत.? Which are the solar panel manufacturing companies in India?

मित्रांनो वाढत्या सोलर पॅनल च्या मागणीमुळे भारतामध्ये खूप साऱ्या कंपन्या सोलर पॅनल बनवत आहेत जर तुम्ही त्यापैकी एखाद्या ही कंपनीची एजन्सी तुमच्या शहरांमध्ये सुरू कराल तर त्यामधून तुम्हाला खूप सारे पैसे कमावण्याची संधी उपलब्ध होईल.

  • लूम सोलर प्रायव्हेट लिमिटेड
  • मोसर बेर सोलर लिमिटेड
  • वेबसोल एनर्जी सिस्टम लिमिटेड
  • भारत सोलर एनर्जी

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्ट द्वारे आपण भारत सरकारकडून सोलर पॅनल व्यवसाय solar energy business ला देण्यात येणाऱ्या सबसिडी बद्दल इन्स्टॉलेशन बद्दल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या व्यवसायांच्या संधी बद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करुन कळू शकता व ही माहिती तुमच्या मित्र-मैत्रिणींना किंवा नातेवाइकांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण या माहितीचा लाभ घेता येईल

Leave a Comment