कसा सुरू करावा मेहंदी पार्लर व्यवसाय? | How to start a Mehndi Parlor business?

 Mehndi Parlor Business In Marathi

मित्रांनो आपल्याला ठाऊक आहेच भारताला सांस्कृतिक देश म्हणून ओळखले जाते त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या देशातील सण आपल्या देशामध्ये विविध जातींमध्ये आणि धर्मामध्ये खूप सारे सण साजरे केले जातात प्रत्येक राज्यामध्ये सण साजरे करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण यामध्ये कॉमन गोष्ट म्हणजे मेहंदी कारण देशांमध्ये कोणताही सण असो किंवा लग्न समारंभ असो अथवा घरामधील छोटेमोठे कार्यक्रम असतील यामध्ये स्त्रिया मेहंदी लावण्यास विसरत नाहीत कारण मेहंदी शिवाय स्त्रियांचा कोणताही सण किंवा लग्न समारंभ किंवा कार्यक्रम साजरा होत नाही म्हणून भारतामध्ये मेहंदी पार्लर व्यवसाय खूप वाढत आहे

Mehndi Parlor Business

कदाचित आपल्याला माहीत नसेल या सणाच्या देशात मेहंदीचा खूप मोठा व्यवसाय आहे जुन्या काळापासून मेहंदी चा वापर केला जातो परंतु बदलत्या तंत्रज्ञानाच्या मदतीने त्यात बरेचसे बदल झाले आहेत परंतु लोक सण असो किंवा कुठलाही उत्सव असो मेहंदी लावायला विसरत नाहीत काळ बदलला तरीही मेहंदीच्या मागणीत कधीच कमी आली नाही म्हणून जर तुम्हीही मेहंदी लावण्याचा व्यवसाय सुरू केला तर तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल.

मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण मेहंदी पार्लर व्यवसाय कसा सुरु करावा याबद्दल माहिती घेणार आहोत यासोबतच मेहंदी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता लागते मेहंदी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी किती पैशांची गरज लागते मेहंदी पार्लर व्यवसाय मधून कमाई किती होते याबद्दल जाणून घेणार आहोत.

मेहंदी पार्लर व्यवसायासाठी नावाची निवड कशी करावी? How to choose a name for Mehndi Parlor business

मित्रांनो तुम्हाला माहीत असेलच कोणताही व्यवसाय हा त्याच्या नावाने ओळखला जातो त्यामुळे आपल्या व्यवसायाचे नाव हे सगळ्यांपेक्षा वेगळे असायला हवे कारण नावामुळेच लोक तुमच्याकडे जास्तीत जास्त आकर्षित होतात यासोबतच तुमच्या व्यवसायाच्या नावाचा लोगो तयार करणे आवश्यक असते लोगो च्या मदतीने तुम्ही तुमच्या व्यवसायाची मार्केटिंग करू शकता किंवा सोशल मीडिया वरती त्याची जाहिरात करू शकता.

मेहंदी पार्लर व्यवसाय सुरू करण्यासाठी जागेची निवड कशी करावी? How to choose a place to start a mehndi parlor business

मित्रांनो जर तुम्ही मेहंदी लावण्याचा व्यवसाय घरातूनच करत असाल तर खूपच छान पण जर तुम्ही घराच्या बाहेर मेहंदी पार्लर सुरू करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला एखादे छानसे दुकान भाड्याने घ्यावे लागेल दुकान घेताना हे लक्षात असू द्या दुकान हे मार्केट मध्ये असायला पाहिजे जिथे खूप साऱ्या महिला येत असतील म्हणजेच गर्दीच्या ठिकाणी कारण लोकांना माहीत झाले तरच तुमचा व्यवसाय चालू शकतो.

मेहंदी पार्लर व्यवसाय सुरू करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची माहिती पाहिजे? What to know before starting a Mehndi Parlor business

आपल्याला माहित असेल मेहंदी लावणे ही एक कला आहे आणि या कलेबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे कारण मेहंदी लावण्याचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला मेहंदीच्या सर्व डिझाईन्स बद्दल माहिती असायला हवी कारण तुम्ही जेवढी सुंदर मेहंदी काढताल तेवढा तुमच्या व्यवसायाचा प्रचार जास्त होईल.

मेहंदीच्या प्रकारांबद्दल माहिती? Information about the types of mehndi

मित्रांना प्रत्येक देशानुसार मेहंदीचे खूप सारे प्रकार आहेत पण आपण लोकांच्या आवडीनुसार मेहंदी डिजाइन काढू शकतात पण आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे मेहंदी चे कोण कोणते प्रकार आहेत याबद्दल ची यादी खालील प्रमाणे दिली आहे
  • भारतीय मेहंदी
  • पारंपारिक मेहंदी
  • वधू मेहंदी
  • पाकिस्तानी मेहंदी
  • अरेबिक मेहंदी
  • मोरोक्कन मेहंदी
  • वेस्टर्न मेहंदी
  • कंटेम्पररी मेहंदी
  • इंडो वेस्टर्न मेहंदी
  • आफ्रिकन मेहंदी
  • इंडो अरेबिक मेहंदी

मेहंदी पार्लर व्यवसायासाठी किती गुंतवणूक करावी लागेल? How much to invest for Mehndi Parlor business

मित्रांनो जर तुम्ही मेहंदी पार्लर व्यवसाय हा घरातूनच करत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची आवश्यकता पडणार नाही कारण यामध्ये तुमची कला आणि मेहंदी लावण्यासाठी लागणारे कोण फक्त दहा ते वीस रुपयांमध्ये तुम्हाला मार्केटमध्ये सहजरीत्या मिळतील जर तुम्ही मेहंदी पार्लर शॉप उघडणार असाल तर त्यासाठी तुम्हाला दुकानाचे भाडे आणि दुकानासाठी डिपॉझिट भरावे लागेल.

मेहंदी पार्लर व्यवसायातून किती पैसे कमावता येतात? How much money can be made from Mehndi Parlor’s business

मित्रांनो मेहंदी लावण्याचे व्यवसायामध्ये मेहंदीची डिझाईन जेवढी चांगली असेल तेवढे पैसे तुम्ही घेऊ शकता त्या व्यतिरिक्त तुम्ही मार्केटमध्ये मेहंदी काढण्यासाठी किती पैसे घेतात याबद्दलची माहिती घेऊन तुम्ही तुमचे रेट ठरवू शकता साधारणता मेहंदी काढण्याच्या व्यवसायातून तुम्ही महिना वीस ते तीस हजार रुपये पर्यंत कमवू शकता.

मेहंदी पार्लर व्यवसायाची मार्केटिंग कशी करावी? Marketing for Mehndi Parlor Business

मित्रांनो मेहंदी लावण्याच्या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला मेहंदीच्या डिजाईनचे छोटे छोटे व्हिडिओ तयार करून तुम्ही सोशल मीडियावर अपलोड करू शकता किंवा व्हाट्सअप द्वारे तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्र-मैत्रिणींना ते शेअर करू शकता याव्यतिरिक्त तुम्ही ते व्हिडिओ यु ट्यूब वरती टाकू शकता सोबतच तुमच्या शहरातील न्यूज पेपर मध्ये तुमच्या व्यवसायाची जाहिरात करू शकता किंवा तुमच्या व्यवसायाची जाहिरात तुम्ही गुगल एडवर्ड्स मार्फत तुमच्या शहरा पुरती मर्यादित करू शकता.
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टमध्ये आपण मेहंदी पार्लर व्यवसाय कसा सुरु करावा याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता किंवा तुमच्या मित्र-मैत्रिणींना व नातेवाईकांना ही माहिती शेअर करू शकता जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा नक्कीच होईल

Leave a Comment