How To Get a Personal Loan From State Bank Of India In Marathi
नमस्कार मित्रानो ऑल इन वन मराठीच्या या पोस्ट मध्ये SBI Bank Personal loan २०२२ ऑनलाइन प्रोसेस बद्दल जाणून घेणार आहोत एस बी आय कडून पर्सनल लोण घेण्यासाठी कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे? स्टेट बँक ऑफ इंडिया वयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोणते नियम व आटी आहेत? State Bank Of India Personal Loan घेण्यासाठी पात्रता? State Bank Of India कडून जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकते? स्टेट बँक ऑफ इंडिया कर्ज वर किती % व्याज दर लागतो? कर्ज वापस करण्यासाठी किती महिन्याचा कालावधी मिळतो? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कर्ज घेतल्यावर कोण कोणते एक्सट्रा चार्जेस तुम्हाला दयावे लागतात. या लेखा मध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया वैयक्तिक कर्जाचे प्रकार ? Types of State Bank of India Personal Loans?
- स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शन कर्ज
- स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस क्रेडिट
- लोण अगेन्ट्स सेक्युरिटी
- स्टेट बँक ऑफ इंडिया तात्काळ पर्सनल कर्ज
तसे कर्जा चे खूप सारे प्रकार आहेत आपण या लेखा मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस वयक्तिक कर्ज बद्दल जाणून घेणार आहोत
स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस वैयक्तिक कर्ज फायदे? State Bank of India Express Personal Loan Benefits?
- या लोण मार्फत तुम्हाला २० लाखापर्यंत लोण मिळू शकते.
- इतर बँके पेक्षा व्याज दर कमी आहेत.
- प्रोसेसिंग फी पण कमी लागते.
- कमीत कमी डोकमेंट्स मध्ये लोण मिळते
- एक्सट्रा चार्जेस लागत नाहीत
- जामीनदारची आवशकता नाही (जसे कि आपल्याला कोणती महागाची वस्तू ठेवायची आवशकता नाही किंवा जमिनीचे कागदपत्र किंवा घराचे कागदपत्रं अथवा एखाद्या व्यक्ती ला जमीनदार म्हणून आणावे लागत नाही.
स्टेट बँक ऑफ इंडिया एक्सप्रेस कर्ज पात्रता? State Bank of India Express loan Eligibility?
- लोण घेण्यासाठी कमीत कमी वय १८ असावे लागते.
- पर्सनल लोण साठी तुमचा सी बिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे
- हे लोण फक्त जॉब करणाऱ्या व्यक्तींना मिळते आणि त्यांचे सॅलरी अकाउंट एस बी आय बँकेतच असावे लागते तेंव्हाच तुम्हाला लोण मिळू शकते.
- जे लोक जॉब करतात त्यांची पगार कमीत कमी १५००० असणे आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून किती कर्ज मिळू शकते ? How Much Loan Can Be Obtained From State Bank of India?
मित्रानो ते तुमच्या सॅलरी वर निर्भर करते पण कमीत कमी २५००० रुपये आणि जास्तीत जास्त २० लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? What Are The Documents Required For a Loan From State Bank of India?
- बँक पासबुक (स्टेट बँक ऑफ इंडिया)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पत्ता पुरावा
- पगार पत्रक (Salary Sleep)
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून किती काळासाठी कर्ज मिळवू शकता ? How Long Can You Get a Loan From State Bank of India?
तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून कर्ज भरण्यासाठी कमीत कमी 6 महिने व जास्तीत जास्त ६ वर्ष (७२ महिने) इतका कालावधी मिळतो. ते तुमच्या वर निर्भर करते तुम्हाला कसे सोपे पडेल.
स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून कर्ज कसे घ्यावे? How To Get a Loan From State Bank of India?
मित्रानो या कर्जासाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता जसे कि ऑफलाईन पद्धतीने तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन अर्ज करू शकता किंवा ऑनलाइन पद्धतीने स्टेट बँक ऑफ इंडिया च्या ऑफिसिअल वेबसाइट वर जाऊन अर्ज करू शकता. अथवा YONO SBI अँप्लिकेशन मार्फत पण कर्जासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
मित्रानो अशा करतो कि या पोस्ट मध्ये दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आणि ती तुमच्या लोण संदर्भातील प्रश्न सोडवण्यास मदत करेल जसे कि स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेत कर्जासाठी कसा अर्ज करावा त्याची पात्रता, कागदपत्रं याबाबद्दल माहिती या पोस्ट मध्ये आपणास दिली आहे हि माहिती तुम्ही तुमच्या फॅमिली मेम्बर्स ना किंवा नातेवाईकांना शेअर करू शकता त्यांना पण याचा उपयोगी होईल नाव नवीन माहितीसाठी आपल्या ऑल इन वन मराठी वेबसाईट ला भेट देत राहा धन्यवाद