आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे | How to get a personal loan from ICICI Bank

How To Get a Personal Loan From ICICI Bank In Marathi

मित्रांनो आपण सर्व जण पाहत आहोत सध्याच्या काळात महागाई किती वाढली आहे या महागाईच्या काळात आपण आपल्या पगारामध्ये आपल्या फॅमिलीच्या दैनंदिन गरजा भागवू शकतो त्या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यामध्ये काही करायचं असेल तर आपल्याला पैशांची गरज भासते त्यावेळी प्रत्येक व्यक्ती हा कर्ज घेण्याचा विचार करतो.पण वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी आपल्याला पुरेशी माहिती नसते त्या कारणास्तव आपण त्या गोष्टीपासून वंचित राहतो म्हणून आज ऑल-इन-वन मराठीच्या या लेखामध्ये आपण आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घेता येईल याबद्दल आपल्याला माहिती देणार आहोत

कर्ज घेण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत असतात जसे की आपल्याला कर्ज मिळेल का कर्ज घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात कर्ज घेण्यासाठी पात्रता काय असावी लागते कर्ज घेतल्यावर त्याला व्याजदर काय लागतील असे अनेक प्रश्नांची उत्तरे आपण या लेखांमध्ये देणार आहोत या लेखात आपण आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घ्यावे या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

ICICI बँकेकडून किती कर्ज मिळू शकते? How Much Loan Can I Get From ICICI Bank?

मित्रांनो जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला आयसीआयसीआय बँकेकडून कमीत कमी 50000 आणि जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.

ICICI बँकेकडून किती कालावधीसाठी कर्ज मिळू शकते? How Long Can I Get a Loan From ICICI Bank?

मित्रांनो आय सी आय सी आय बँकेच्या कर्जाची याची परतफेड करण्यासाठी तुम्हाला कमीत कमी बारा महिने आणि जास्तीत जास्त साठ महिने इतका कालावधी मिळतो.

ICICI बँकेच्या वैयक्तिक कर्जावर किती व्याज आकारले जाते? How Much Interest Is Charged On a Personal Loan From ICICI Bank

मित्रांनो आयसीआयसीआय बँकेकडून मिळालेल्या वैयक्तिक कर्जावर तुम्हाला वार्षिक 9.99 % व्याज आकारले जाते पण तुम्ही जर व्याजाचे हप्ते नियमितपणे भरला नाही तर तुम्हाला वार्षिक 24 % पर्यंत व्याज आकारले जाईल.

ICICI बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहे? What Are The Documents Required To Get a Personal Loan From ICICI Bank?

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • ड्रायव्हिंग लायसन
 • मतदान ओळखपत्र
 • पासपोर्ट
 • लाईट बिल
 • रेशन कार्ड
 • पगार पत्रक
 • बँक पासबुक झेरॉक्स

एवढी सगळी कागदपत्रे तुम्हाला लागणार नाहीत पण ज्यावेळी तुम्ही कर्जासाठी अर्ज करणार आहात त्यावेळी ही सगळी कागदपत्रे तुमच्या सोबत असणे आवश्यक आहे.

ICICI बँक वैयक्तिक कर्ज पात्रता? ICICI Bank Personal Loan Eligibility

 • आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी तुमचा सिबिल स्कोर 750 पेक्षा जास्त असावा.
 • खाजगी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्ष ते 65 वर्ष असावे लागते.
 • सरकारी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीचे वय 21 वर्षे 58 वर्षे असावे लागते
 • तुम्हाला कमीत कमी तीस हजार पगार असणे आवश्यक आहे.
 • तुमचे वार्षिक उत्पन्न 15 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे.

ICICI बँकेच्या वैयक्तिक कर्जाचे फायदे? Benefits of ICICI Bank Personal Loan

 • आयसीआयसीआय बँकेमार्फत तुम्हाला 20 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते.
 • तुम्हाला कोणत्याही साक्षीदाराची आवश्यकता नाही
 • आयसीआयसीआय बँकेची सुविधाही खूप जलद आहे त्यामुळे तुमचे कर्ज लवकर मंजूर केले जाते
 • कमीत कमी कागदपत्रांमध्ये तुमचे लोन मंजूर केले जाते.
 • तुम्हाला परवडेल असे व्याजदर आहेत
 • परत फेड करण्यासाठी खूप सारे पर्याय उपलब्ध आहे

ICICI बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा? How To Apply For a Personal Loan From ICICI Bank

मित्रांनो आयसीआयसीआय बँकेच्या वैयक्तिक कर्जासाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता त्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन

ऑफलाईन

सर्व कागदपत्रे घेऊन तुमच्या जवळच्या आयसीआयसीआय बँकेच्या शाखेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

ऑनलाईन 

 • सर्वप्रथम तुम्ही गुगल वर आयसीआयसीआय बँक सर्च करा तुम्हाला आयसीआयसीआय बँकेची ऑफिशिअल वेबसाईट दिसेल.
 • तुम्हाला आयसीआयसीआय बँकेच्या वेबसाईट वरती सर्वप्रथम लॉग इन करावे लागेल
 • तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडावा लागेल
 • तुम्हाला सर्व वैयक्तिक माहिती भरून घ्यावी लागेल
 • त्यानंतर कर्जासाठी अर्ज भरावा लागेल
 • त्यानंतर तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर आयसीआयसीआय  बँकेकडून कर्जाची रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवली जाईल
मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या लेखामध्ये आपण आयसीआयसीआय बँकेकडून वैयक्तिक कर्ज कसे घेता येईल याबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून कळवू शकता आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रांना तुम्ही पाठवू शकता जेणेकरून त्यांना पण या माहितीचा फायदा होईल.

Leave a Comment