Havaman Update

Havaman Update 28 Jun and 29 Jun

मित्रांनो पुढील चार ते पाच दिवसांमध्ये राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे यामध्ये नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा या जिल्ह्यामध्ये 27 व 28 तारखेला मेघगर्जना तसेच विजेच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तसेच पालघर ठाणे रत्नागिरी रायगड पुणे सिंधुदुर्ग सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

तसेच 28 तारखेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढणार आहे व 28 आणि 29 तारखेला पुणे आणि सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागातर्फे सांगण्यात आले आहे या सोबतच धुळे आणि नंदुरबार जिल्हा इथे पण मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे तसेच जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर व सांगली जिल्ह्याचा काही भाग इथे हलक्या व मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

जालना नांदेड वर्धा बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर वाशिम जिल्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे इथे पण चांगला पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे 28 व 29 तारखे नंतर नाशिक आणि पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे इथे जोरदार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.