नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीच्या या पोस्टद्वारे आपण Gudi Padwa 2023 बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत या पोस्टच्या माध्यमातून आपण गुढीपाडवा 2023 शुभ मुहूर्त कधी आहे गुढीपाडव्याची पूजा करण्यासाठी साहित्य कोणकोणते लागेल आणि गुढीपाडव्या पाठीमागचा इतिहास काय आहे अशा अनेक गोष्टी या पोस्टच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत.
Gudi Padwa 2023
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत असल्यास गुढीपाडवा म्हणजेच नववर्षाचा पहिला दिवस गुढीपाडवा हा सण सर्वत्र साजरा केला जातो प्रामुख्याने हा सण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने प्रत्येक घराघरांमध्ये साजरा करण्यात येतो हे आपल्या सर्वांना माहीत असेलच या सणा दिवशी घराच्या दाराला तोरणे बांधून प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभा करण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते की या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास करून आयोध्या नगरीत परत आले होते या सणा दिवशी सृष्टीतील सर्व देवी देवतांना पूजनाचा हा दिवस असतो गुढीपाडव्या दिवशी महाराष्ट्रातील प्रत्येक घराच्या दारासमोर गुढी उभा केले जाते याला विजयाचे प्रतीक मानले जाते.
गुढीपाडव्याला नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो त्यामुळे खूप सारे लोक गुढीपाडव्या दिवशी अनेक वस्तूंची खरेदी करतात जसे की सोने चांदी आणि काही लोक गुढीपाडव्याला शुभ दिवस मानतात त्यामुळे नवीन व्यवसायाची सुरुवात गुढीपाडव्या दिवशी केली जाते या दिवशी अनेक शुभ कामे केली जातात.
गुढीपाडवा 2023 शुभ मुहूर्त
सण | गुढीपाडवा सण |
तारीख | 22 मार्च 2023 |
वार | बुधवार |
शुभ मुहूर्त | सकाळी 06:29 ते सकाळी 07:39 मिनिटांपर्यंत |
गुढी उभा करण्यासाठी साहित्य
- वेळूची काठी
- कडुलिंबाचा पाला
- आंब्याचा पाला
- दोन तांब्याचे कलश
- काठापदराची साडी
- ब्लाऊज पीस
- साखरेचा हार
- खोबऱ्याचा हार
- लाल कलरचा धागा
- चौरंग किंवा पाठ
- स्वच्छ कपडा
- फुलांचा हार
गुढी पूजनासाठी लागणारे साहित्य
- कलश
- हळदी
- कुंकू
- तांदूळ
- पाणी
- पंचामृत
- साखर
- पिवळे चंदन
- अक्षदा
- थोडीशी फुले
- आरती
- कापूर
- अगरबत्ती किंवा धूप
- लक्ष्मी मातेचा नाणे
- सुपारी
- पान
गुढी कशी उभी करावी?
गुढी उभा करण्यासाठी सर्वप्रथम वेळूची काठी स्वच्छ धुऊन घ्यावी व त्यानंतर जी साडी आपण गुढीला नेसवणार आहात त्या साडीच्या व्यवस्थित निऱ्या करून घ्याव्यात त्यानंतर ब्लाऊज पीसच्या पण अशाच प्रकारे निऱ्या करून घ्याव्यात व त्यानंतर निऱ्या घातलेली साडी निऱ्या व्यवस्थित धरून वेळूच्या काठीला दोऱ्याच्या साह्याने किंवा धाग्याने व्यवस्थित बांधून घ्याव्यात व त्यानंतर लिंबाच्या झाडाचा फाटा आपण आणला असेल तो या धाग्यामध्ये व्यवस्थित बांधून घ्यावा त्यानंतर आंब्याच्या पानाचा फाटा पण व्यवस्थित बांधून घ्यावा त्यानंतर साखरेचा हार पण त्या ठिकाणी बांधून घ्यावा त्यासोबतच फुलाची माळ पण त्या ठिकाणी व्यवस्थित बांधून घ्यावी सगळे व्यवस्थित बांधून झाल्यानंतर त्यावरती जो तांब्याचा कलश असेल तो व्यवस्थित पालथा झाकून घ्यावा लक्षात असू द्या कलश घालण्यापूर्वी कलश्यावरती कुंकाचे पाच ठिपके काढावे व स्वास्तिक काढून तो तांब्या पालथा त्या गुढीवरती घालावा व त्यानंतर ज्या जागेवरती तुम्ही गुढी उभा करणार आहात ती जागा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी त्यावरती चौरंग किंवा पाठ ठेवावा आणि त्यावरती एक कपडा अंथरून घ्यावा आणि त्यावरती तुम्ही गुढी उभा करू शकता.
गुढीची पूजा कशी करावी?
मित्रांनो वरती आपण गुडी कशी उभा करावी याबद्दल माहिती घेतली आता आपण पाहूयात गुडीची पूजा कशी करावी सर्वप्रथम ज्या ठिकाणी आपण गुढी उभा केली आहे त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवावा त्या चौरंगाच्या बाजूने छान प्रकारे रांगोळी काढून घ्यावी रांगोळी काढून झाल्यानंतर हळदी कुंकू आणि चंदन गुढीला लावून घ्यावे.
पाटावरती थोडेसे तांदूळ टाकून कलश ठेवावा त्या कशाला पाच हळदी कुंकाचे ठिपके लावावे व एक नारळ त्या नारळावरती स्वास्तिक काढून तो नारळ त्या कलशा वरती ठेवावा व त्यानंतर गुढीला फुले अर्पण करावे आणि खायचे पान चौरंगावर गुढी समोर ठेवावे व त्यावरती सुपारी ठेवून त्या सुपारी वरती थोडेसे पाणी व पंचामृत टाकावे आणि नंतर त्या सुपारीला हळदी कुंकू पिवळे चंदन लावून घ्यावे त्यानंतर त्यावरती तांदळाचा अक्षदा टाकावा त्यावरती फुलांचा अक्षदा टाकावा.
व तसेच पानाच्या आणि सुपारी च्या बाजूला जर तुमच्याकडे लक्ष्मीचे नाणे असेल तर ते ठेवून त्यावरती पण थोडेसे पाणी व पंचामृत टाकून घ्यावे व त्यावरती हळदीकुंकू आणि चंदन लावून घ्यावे त्यावरती तांदळाचा अक्षदा आणि फुलांचा अक्षदा अर्पण करावा हे झाल्यानंतर अगरबत्ती ओवाळून घ्यावी व धूप लावावा आणि सर्व परिवारा समित गुढीची आरती करून घ्यावी व ब्रह्म ध्वजय नमःः हा मंत्र म्हणून गुडीला नमस्कार करावा गुढीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा किंवा डाळ गुळ खोबरे आणि त्यामध्ये कडुनिंबाची पाने टाकून नैवेद्य दाखवावा नैवेद्य सर्व परिवाराला प्रसाद म्हणून खाण्यास द्यावा अशाप्रकारे तुम्ही गुढीची पूजा करू शकता.
गुढी कशी उतरावी?
मित्रांनो गुढीपाडव्या दिवशी आपण सकाळी गुढी उभी करतो आणि सायंकाळी त्या गुढीला आपण विधीपूर्वक पूजा करून उतरवतो गुडी उतरवण्यासाठी सर्वप्रथम आरतीचे ताट करून घ्यावे गुढीला हळदी कुंकू आणि चंदन लावून घ्यावे व त्यानंतर व त्यानंतर गुढीला उदबत्तीने ओवाळून घ्यावे व आरती करून घ्यावी व त्यानंतर गुढीला साखरेचा नैवेद्य दाखवावा व गुढीला नमस्कार करून नारळ गुडी समोर फोडून घ्यावा व तो नारळाचा प्रसाद सर्व परिवारातील सदस्यांना द्यावा व गुढी आपण उतरवून घ्यावी.
गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचे काय करावे?
गुढी उभा करण्यासाठी वापरलेली लिंबाची पाने किंवा आंब्याची पाने फुलाचा हार आपण तो पाण्यामध्ये विसर्जित करून घ्यावा आणि गुढी उभा करते वेळेस जो साखरेचा हार आपण गुढीला अडकवला होता तो आपण परिवारासोबत खाऊ शकता असे मानले जाते की साखरेचा हार उन्हाळ्यामध्ये खाल्ल्याने अंगातील उष्णता कमी होते गुढी उभा करते वेळेस जो कलश आपण गुढीवरती पालथा घातला होता तो कलश तुम्ही घरामध्ये स्वच्छ धुऊन पूजेसाठी वापरू शकता व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी उभा करते वेळेस जी साडी आणि ब्लाऊज पीस आपण गुढीला नेसवले होते ते घरातील कोणीही सुवासिन स्त्रीने घातले तर चालते आशा करतो की गुढीसाठी वापरलेल्या साहित्याचे काय करावे याबद्दल आपल्याला माहिती मिळाली असेल.
FAQ
Q1. गुढीपाडवा का साजरा केला जातो
या दिवशी ब्रह्मदेवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली होती आणि याच दिवशी प्रभू रामचंद्र 14 वर्षांचा वनवास करून आयोध्या नगरीत परत आले होते या दिवशी सृष्टीतील सर्व देवी देवतांना पूजनाचा हा दिवस असतो गुढीपाडव्याला विजयाचे प्रतीक मानले जाते म्हणून या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो.
Q2. गुढीपाडवा किती तारखेला आहे?
गुढीपाडवा २३ मार्च 2023 म्हणजेच बुधवारी आहे.
Q3. गुढीपाडव्याला गुढी का उभा करतात?
गुढीपाडव्या दिवशी ब्रह्मदेवाने ही सृष्टी निर्माण केली होती असे मानले जाते आणि गुढीपाडव्याला नववर्षाचा पहिला दिवस मानला जातो म्हणून प्रत्येक घरासमोर महाराष्ट्रामध्ये गुढी उभा केली जाते व गुढीला विजयाचे प्रतीक मानले जाते.