गणेश चतुर्थी, पूजा, विधी | Ganesh Chaturthi 2022

मित्रांनो गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय उत्सव आहे गणेशोत्सव हिंदू धर्मीयांचा खूप आवडता सण आहे आपल्याला माहित असेलच Ganesh Chaturthi 2022 गणपतीचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीस होते गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त 2022 30 ऑगस्ट 2022 दुपारी 03:33 वाजल्यापासून 31 ऑगस्ट 2022 दुपारी 03:22 वाजेपर्यंत दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा उत्सव साजरा करण्यात येतो गणपती हा हिंदू धर्मातील बुद्धीचा अधिष्ठाता विघ्नांचा नियंत्रक मानला जाणारा देव आहे भारतात गणेशाची पूजा प्रचलित आहेत विशेषतः महाराष्ट्र राज्यात गणेशाची मोठ्या प्रमाणात पूजा व उत्सव होतात.

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने बाळ गंगाधर टिळकांनी या गणपती उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या लोकजागृती करून घेण्यासाठी या उत्सवाला प्रारंभी पणे अवलंब करण्यात आला

गणेशाची बारा नावे कोणती? The 12 names of Lord Ganesha In Mharathi

मित्रांनो गणेशाला 12 नावाने संबोधले जाते त्याची यादी खालील प्रमाणे दिली आहे

  • वक्रतुंड
  • एकदंत
  • कृष्णपिंगाक्ष
  • गज वस्त्र
  • लंबोदर
  • विकट
  • विघ्न राजेंद्र
  • धुम्रवर्ण
  • भालचंद्र
  • विनायक
  • गणपती
  • गजानन

गणेशाची जन्म कथा? Birth story of Lord Ganesha in Marathi?

एकदा असंच पार्वती मातेस स्नान करण्यासाठी जायचे होते बाहेर कोणीच राहण्याकरता नसल्याने ते मातीची मूर्ती करून ती जिवंत केली व पहारेकरी नेमून कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नको असे सांगून पार्वतीमाता स्नानास निघून गेली काही वेळाने भगवान शंकर तिथे आले व आत जावू लागले पहारेकऱ्याने त्यांना रोखले भगवान शंकर संतप्त होऊन त्यांनी पहारेकर्‍यांची शिर उडवले पार्वतीमाता स्नान करून परत आल्यावर पहारेकऱ्याला मारलेले पाहून अतिशय संतापली तेव्हा शंकरांनी आपल्या गण नावाच्या शिष्याला बाहेर जाऊन जो कोणी भेटेल त्या प्राण्याचे डोके कापून घेऊन ये असा आदेश दिला गण बाहेर पडल्यानंतर त्याला एक हत्ती दिसला त्याचे मस्तक कापून तो घेऊन आला.

भगवान शंकरांनी ते मस्तक पुतळयाला लावले व जिवंत केले हा पार्वतीमातेचे मानस पुत्र म्हणजेच हत्ती अगं मुख असलेला गजानन भगवान शंकराच्या गणाचा ईश म्हणजे परमेश्वर म्हणून गणेश हे नाव ठेवण्यात आले हा दिवस चतुर्थी चा होता त्यामुळे चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणून महत्व आहे या दिवशी भक्तगण श्रीगणेशाची पूजा प्रार्थना व तसेच उपवास करून भक्ती करतात.

गणेशाची स्थापना कधीपासून झाली? Since when was Ganpati founded?

स्वातंत्र्यपूर्व काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लोक एकत्र येत नव्हते लोकमान्य टिळकांना वाटेल की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लोकांनी एकत्र यावे यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आणि त्यातून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

गणेशाची स्थापन करण्याची योग्य दिशा कोणती? Where and how to place Lord Ganesha in your home?

मित्रांनो गणपती स्थापन करतेवेळी सुरुवातीला आपल्याला गणपतीची मूर्ती स्थापन करण्याची दिशा निवडणे खूप गरजेचे असते जर आपण गणपती घरांमध्ये स्थापन करत असाल तर तो पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला ईशान्य कोपऱ्यात स्थापन करावा.

गणेशाची पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य? Ganesh Chaturthi Puja Samagri?

  • कापूर
  • श्रीफळ
  • फुले हार
  • दूर्वा
  • अगरबत्ती
  • धूप
  • अत्तर
  • जानवे
  • पाने पाच
  • सुपारी
  • वस्त्रमाळ
  • मोदक
  • पाच फळे
  • चंदन
  • हळद
  • कुंकू
  • शेंदूर
  • गुलाल
  • गरम पाणी
  • अक्षदा
  • पंचामृत
  • पूजेचे ताट
  • तुपाचे दिवे
  • आरती
  • चौरंग किंवा पाठ

गणेश पूजा विधी कसा करावा? How to perform Ganpati Chaturthi Pooja?

मित्रांनो Ganesh Chaturthi 2022 गणपतीची पूजा करतेवेळी सर्वप्रथम तुम्ही पांढरे वस्त्र परिधान करून घ्यावे व त्यानंतर ज्या ठिकाणी तुम्ही गणपतीची मूर्ती स्थापन करणार आहात त्या ठिकाणी चौरंग किंवा पाट ठेवावा व त्यानंतर त्यावर ती लाल रंगाचा कपडा ठेवावा व त्या कपड्यावर ती थोडीशी तांदूळ ठेवावे व नंतर गणपतीची मूर्ती स्थापन करून घ्यावी व त्यानंतर दूर्वा पाण्यात बुडवून गणपतीच्या मूर्ती वरती शिंपडून घ्याव्या त्यानंतर गणपतीच्या मूर्तीसमोर पाच पाने आणि 2 सुपार्‍या ठेवाव्यात व गणपतीच्या श्री मुर्ती ला वस्त्रमाळ व फुलांची माळ घालावी त्यानंतर गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळदी, कुंकू, गुलाल, लावून घ्यावा त्यानंतर गणपतींच्या श्री मूर्तीसमोर अगरबत्ती धूप लावा नंतर पूजेच्या ताटात तुपाच्या वाती ची आरती व कापूर लावून गणपतीची मनोभावे आरती करून घ्यावी व गणपती नैवेद्य म्हणून मोदक ठेवावे कारण मोदक हे गणपतींचे आवडते अन्न आहे. पूजा करते वेळेस ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करावा.

गणेश विसर्जन पूजा कशी करावी? How to perform Ganpati Visarjan Puja?

घरोघरी गणपतीचे पूजन केले जाते काही ठिकाणी २ दिवस काही ठिकाणी ५ दिवस तर काही ठिकाणी ७ दिवस गणपती पूजन केले जाते घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते त्यानुसारच गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते या दिवशी विधीवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्यप्राप्ती होते घरात सुख शांती आणि समृद्धी येते असे म्हटले जाते.

गणपती विसर्जन पूजा करण्यासाठी कमीत कमी वीस मिनिटं लागतात विसर्जन पूजा सुरू करण्यापूर्वी त्यांचे साहित्य पूजास्थानी आणून ठेवावे पूजा करण्यापूर्वी आंघोळ करून नवीन किंवा धुतलेले कपडे परिधान करावेत नंतर कपाळाला गंध लावून घ्यावे आसनावर बसून पूर्व दिशेला तोंड करून पूजा करावी गणपतीला आवडणारे मोदक लाडू मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा नवीन वस्त्र अर्पण करावीत एका कापडात सुपारी दूर्वा मिठाई आणि काही पैसे घ्यावेत या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्ती जवळ ठेवाव्यात गणपतीची मनोभावे आरती करावी आणि जय जय कार करावा गणेशोत्सव काळात आपल्याकडून झालेल्या चुकांबद्दल गणपती बाप्पा कडे क्षमायाचना करावी पूजासाहित्य अन्य वस्तूही विसर्जित कराव्यात मनात ओम गं गणपतये नमहा म्हणत गणपतीचे ध्यान करावे या प्रकारे गणपतीची प्रार्थना झाल्यावर मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात सिंहासनावरून थोडी हलवावी मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचार याप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी गणपती विसर्जन तुम्ही घरी सुद्धा करू शकतात तसंच गणपती नदीत टाकण्यापेक्षा त्यावर पाणी शिंपडले तरी ते विसर्जित होते.

गणेशाची आरती? Aarti of Ganpati In Marathi

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ||

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ||

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ||

कंठी झळके माळ मुक्ताफळांची ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ||

चंदनाची उटी कुमकुम केशरा ||

हिरेजडित मुकुट शोभतो बरा ||

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ||

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ||

दास रामाचा वाट पाहे सदना ||

संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना ||

जय देव जय देव जय मंगलमूर्ती ||

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया

Leave a Comment