Free Solar Panel Yojana 2023: मोफत सौर पॅनेल योजना 2023, असा करा ऑनलाईन अर्ज

Free Solar Panel Yojana 2023: प्रधानमंत्री मोफत सौर पॅनल योजना 2023 काय आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा पात्रता काय असायला हवी कोणती कागदपत्रे लागतील यासाठीचे अधिकृत वेबसाईट कोणती आहे व काही माहिती हवी असल्यास हेल्पलाइन नंबर कुठला याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून 2020 मध्ये प्रधानमंत्री सौर पॅनल योजना सुरू करण्यात आली होती या उपक्रमामुळे सौर ऊर्जेला प्राधान्य देणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा झाला आहे जर तुम्ही शेतकरी असाल आणि सौरऊर्जेचा अवलंब करण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही प्रधानमंत्री सौर पॅनल योजनेद्वारे आपल्या शेतात सौर पॅनल बसवण्यासाठी सरकारच्या अनुदान कार्यक्रमाचा मोठा लाभ घेऊ शकता या लेखाद्वारे आम्ही पीएम सोलार पॅनल योजना काय आहे याबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देणार आहोत.

पीएम मोफत सौर पॅनेल योजना काय आहे?

मित्रांनो देशातील सौर ऊर्जेच्या वापराला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी आणि आपल्या देशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडून प्रधानमंत्री सौर पॅनल योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेत सौर पॅनलच्या संपूर्ण किमतीवर जवळपास 60 टक्क्यांपर्यंत सबसिडी देण्यात येते. या योजनेअंतर्गत भारतातील 20 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होईल.

यासोबतच वीज कंपन्या या शेतकऱ्यांकडून सौर ऊर्जा खरेदी करतील यातून त्यांना आर्थिक भरपाई मिळेल त्यासोबतच या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जेची विक्री करून शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढवण्यास साठी संधी प्राप्त होईल.

पीएम सोलर पॅनेल योजनेचे फायदे?

 • या योजनेअंतर्गत सरकारकडून 60 टक्के सबसिडी देण्यात येते जी केंद्र सरकारकडून 30 टक्के आणि राज्य सरकारकडून 30 टक्के 59 टक्के सबसिडी देण्यात येते.
 • या योजनेचा लाभ आपल्या देशातील लाखो शेतकऱ्यांना घेता येणार आहे
 • सौर पॅनल योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा नवीन पर्याय उपलब्ध होणार आहे
 • सोलर प्लांट बसवल्यामुळे शेतकऱ्यांना वीज कमतरतेच्या अभावी पिकांना वेळेवर सिंचन करता येईल ज्यामुळे पीक उत्पादनास फायदा होईल.

पीएम सोलर पॅनल योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे?

 • आधार कार्ड
 • पॅन कार्ड
 • रेशन कार्ड
 • बँक पासबुक झेरॉक्स
 • पासपोर्ट साईज फोटो
 • जमिनीशी संबंधित कागदपत्रे (सातबारा, आठ चा उतारा)
 • मोबाईल नंबर

पीएम सोलर पॅनल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री सौर पॅनल योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम या https://solarrooftop.gov.in/अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल त्यानंतर आपल्याला लॉगिन आणि रजिस्टर करण्याचा पर्याय आपल्या समोर दिसेल त्यावरती आपल्याला सर्वप्रथम रजिस्ट्रेशन करून घ्यावे लागेल आणि पीएम सोलार पॅनल योजनेसाठी पर्याय दिसेल त्यावर ती क्लिक करून व्यवस्थित रित्या सगळी माहिती भरून घ्यावी व वरती दिलेल्या सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करावी त्यानंतर आपल्याला या योजनेसाठी अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करून आपल्याला संपर्क करतील.

निष्कर्ष

मित्रांनो या लेखाच्या माध्यमातून आम्ही आपणाला प्रधानमंत्री सौर पॅनल योजनेबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आपल्याला कोणती कागदपत्रे लागतील व या योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती दिली आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर तुम्ही प्रधानमंत्री सौर पॅनल योजनेच्या टोल फ्री नंबर 011-2436-0707 वरती फोन करून माहिती विचारू शकता.

 

Leave a Comment