देशातील महिलांना रोजगार देण्यासाठी केंद्र सरकार कडून Free Silai Machine Yojana 2023 सुरू केली आहे. या योजनेंतर्गत केंद्र सरकार देशातील गरीब आणि कष्टकरी महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणार आहे. या ‘प्रधानमंत्री मोफत शिलाई मशिन योजना 2023’ द्वारे महिलांना घरबसल्या शिलाई मशीन मिळवून स्वतःचा रोजगार सुरू करता येईल जेणेकरून त्यांना चांगले उत्पन्न मिळू शकेल या योजनेचा लाभ देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि नोकरदार महिलांना मिळणार आहे तसेच या योजनेमार्फत महाराष्ट्रातील 50,000 हून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन दिल्या जाणार आहेत.
या योजनेच्या माध्यमातून नोकरदार महिला अत्यंत गरीब स्त्रिया अशा सर्व महिलांसाठी सरकारने मोफत शिलाई मशीन योजना बनवली आहे, महिला मोफत शिलाई मशीन मिळवून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतील या योजनेंतर्गत देशातील इच्छुक महिला ज्यांना मोफत शिलाई मशीन मिळवायचे आहे त्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल या मोफत शिलाई मशीन योजनेंतर्गत फक्त 20 ते 40 वयोगटातील महिलाच अर्ज करू शकतात.
मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश
मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहेच कोरोना महामारी नंतर आपल्या देशात बेरोजगारी कित्येक पटीने वाढली आहे यामुळे बहुतांश लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामध्ये ज्या स्त्रिया आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत ज्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा पैसा नाही किंवा व्यवसाय करण्यासाठी त्यांच्याकडे भांडवली ही नाही अशा महिलांसाठी ही योजना राबवण्यात येत आहे याचा मुख्य उद्देश महिला स्वावलंबी आणि सक्षम होतील आर्थिकदृष्ट्या वंचित महिला आणि मजुरांना मदत होईल महिलांची स्थिती सुधारेल आणि ते त्यांचे आयुष्य व्यवस्थित जगू शकतील.
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी पात्रता
ज्या महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्यांना महाराष्ट्र सरकारने ठरवलेल्या पात्रतेचे निकष पूर्ण करावे लागतील जे खालील प्रमाणे दिले आहेत व्यवस्थित रित्या पाहून घ्या.
- या योजनेसाठी गरीब महिला व नोकरदार महिला पात्र असतील
- महिला भारताची नागरिक असणे गरजेचे आहे
- 20 ते 40 वर्ष वयोगटातील महिला किंवा मुली यासाठी अर्ज करू शकतात
- ज्या नोकरदार महिला या योजनेसाठी अर्ज करणार असतील त्यांच्या पतीला बारा हजारापेक्षा जास्त पगार नसावी
- या योजनेसाठी विधवा महिला व अपंग महिला अर्ज करू शकतील
- या योजनेसाठी ग्रामीण भागातील व शहरी भागातील महिला अर्ज करू शकतात
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी लागणारी कागदपत्रे?
- वयाचा पुरावा
- आधार कार्ड
- मतदान ओळखपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- अपंग असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र
- विधवा असल्यास त्याचे प्रमाणपत्र
- आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
मोफत शिलाई मशीन योजना 2023 अशा पद्धतीने करा अर्ज
मित्रांनो मोफत शिलाई मशीन योजनेसाठी सध्यातरी कोणतेही ही वैयक्तिक पोर्टल सुरू केले गेले नाही तर ज्या महिलांना या योजनेसाठी अर्ज करायचा असेल त्याबद्दलची माहिती खालील प्रमाणे दिली आहे.
- अर्ज करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
- यानंतर मोफत शिलाई मशीन योजनेच्या लिंकवर जा.
- जर ऑनलाईन सुविधा उपलब्ध नसेल तर या योजनेसाठी एप्लीकेशन फॉर्म डाऊनलोड करा
- एप्लीकेशन फॉर्म व्यवस्थित रित्या भरून घ्यावा जर समजत नसेल तर कोणाकडून भरून घ्यावा
- एप्लीकेशन फॉर्म ला सर्व कागदपत्रे जोडून संबंधित कार्यालयात जाऊन तो अर्ज जमा करावा
- अशा पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता