Free Flour Mill Yojana: महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी, अर्ज कसा करायचा पहा

Free Flour Mill Yojana: ज्याला पिठाची गिरणी योजना असेही म्हणतात, ही महाराष्ट्रातील एक सरकारी योजना आहे ही योजना 2023 मध्ये सुरू करण्यात आली होती जी महिलांना मोफत पिठाच्या गिरण्या पुरवते आणि ती सध्या सुरू आहे या योजनेअंतर्गत महिलांना पिठाच्या गिरण्या 100% अनुदानावर दिल्या जातात म्हणजे पिठाच्या गिरणीसाठी महिलांना पैसे द्यावे लागत नाहीत.

मित्रांनो ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाकडून फक्त महिलांसाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील गरजू आणि गरीब प्रवर्गातील महिला घेऊ शकतील या योजनेचा मुख्य उद्देश खेड्यातील महिलांना ज्या योजनेच्या माध्यमातून चांगला रोजगार उपलब्ध करून देणे हा आहे या योजनेच्या माध्यमातून महिला घरी बसून चांगले उत्पन्न घेऊ शकतील.

ज्या महिलांचे आर्थिक स्थिती ही बिकट असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ देऊन त्यांचे आर्थिक परिस्थिती सक्षम बनवण्यात साठी एक पाऊल राज्य शासनाकडून उचलण्यात आलेले आहे या योजनेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये पिठाची गिरणी सुरू करून त्यामधून चांगले उत्पन्न निर्माण करून अशा महिलांची आर्थिक परिस्थिती सक्षम बनवण्यासाठी मदत होईल.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष काय आहेत?

  • ही योजना फक्त महिलांसाठी आहे
  • लाभ घेणारी महिला ही महाराष्ट्राची रहिवासी असावी
  • दारिद्र रेषेखाली असणाऱ्या महिला यासाठी पात्र आहे
  • या योजनेचा लाभ घेणाऱ्या साठी इच्छुक असणाऱ्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखापेक्षा जास्त नसावे.
  • 18 ते 60 वर्ष वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

या योजनेचा अर्ज करण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करता येईल तो अर्ज व्यवस्थित भरून घेऊन तो जिल्हाधिकारी कार्यालय,तालुका पंचायत कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय संबंधित अधिकाऱ्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे अर्ज सादर केल्यानंतर अधिकाऱ्याकडून अर्जाचे पुनरावलोकन केले जाईल आणि पात्र महिलांची निवड केली जाईल व निवडलेल्या महिलांना या पिठाच्या गिरण्या वाटप केल्या जातील.

आवश्यक कागदपत्रे?

  • अर्जदाराच्या आधार कार्डाची प्रत
  • अर्जदाराच्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची प्रत
  • अर्जदाराच्या निवास प्रमाणपत्राची एक प्रत
  • अर्जदाराच्या बँक खात्याच्या तपशीलाची एक प्रत

महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा मोफत पीठ गिरणी योजना हा एक उत्तम उपक्रम आहे. पिठाच्या गिरण्या महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून देतील आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करतील.

 

Leave a Comment