Emergency Alert Severe: असा मेसेज आपल्या मोबाईलवर आला होता का, जाणून घ्या त्या मागचे कारण

Emergency Alert Severe: नमस्कार मित्रांनो राज्यात आणि देशात लाखो अँड्रॉइड मोबाईल वापर करते आहेत आज लाखो अँड्रॉइड मोबाईल वरती भारत सरकारकडून दूर संचार विभागाच्या मार्फत एक अलर्ट मेसेज पाठवला गेला होता नेमका त्या मेसेजचा अर्थ काय आहे त्याचा मोबाईल ला धोका तर नाही याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

Emergency Alert On Android Notification: मित्रांनो दिनांक 20 जुलै 2023 रोजी अचानक सकाळी देशातील व राज्यातील अनेक अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईल वरती एमर्जेंसी अलर्ट सर्वे नावाचा मेसेज वाजला त्यामुळे देशातील व राज्यातील अनेक नागरिक चिंतेत पडले त्याचे मुख्य कारण म्हणजे मोबाईल मध्ये व्हायरस तर आला नाही किंवा आपल्या मोबाईलला काही प्रॉब्लेम तर झाला नाही किंवा आपला मोबाईल हेक्टर झाला नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न हे नागरिकांच्या मनामध्ये निर्माण होत होते.

हा मेसेज येण्या मागचं नेमकं कारण काय?

मित्रांनो हा मेसेज भारत सरकारच्या दूरसंचार विभागामार्फत हे नोटिफिकेशन देशातील लाखो अँड्रॉइड मोबाईल वापरकर्त्यांच्या मोबाईल वरती पाठवण्यात आले त्या मागचे मुख्य कारण म्हणजे भारत सरकारकडून आपातकालीन काळात आपल्याला महत्त्वाचा संदेश मिळावा यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाकडून ही चाचणी करण्यात आली होती.

यासाठी भारत सरकारकडून देशातील नागरिकांना याबद्दलची कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना दिली गेली नव्हती त्यामुळे या मेसेज आल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते परंतु मित्रांनो अशा मेसेजची चाचणी करणे हे गरजेचे होते कारण आपल्या देशामध्ये आपातकालीन परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी देशातील नागरिकांना जागरूक करण्यासाठी आणि सावधान करण्यासाठी राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अशी पावलं नागरिकांसाठी उचलण्यात येत आहेत त्यामुळे या मेसेजला घाबरण्याची गरज नाही हे आपल्या फायद्यासाठी केंद्र सरकारकडून उचलला गेलेला एक महत्त्वाचा पाऊल होता.

हा मेसेज आपल्याला परत येणार का?

आपातकालीन काळामध्ये देशातील नागरिकांना सतर्क करण्यासाठी वीस जुलै 2023 रोजी करण्यात आलेली चाचणी ही यशस्वीरित्या पार पडली इथून पुढे देशांमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा होणार असेल तर त्यापूर्वी देशातील नागरिकांना सतर्क करण्यात येईल इथून पुढे जर आशय मेसेज असे मेसेज आपल्या मोबाईल वरती आले तर समजून जावे की काहीतरी घटना आपल्या देशात किंवा राज्यात घडणार आहे त्याबद्दल आपल्याला केंद्र सरकारकडून नोटिफिकेशन मिळाले आहे त्यामुळे आपल्याला सावधानता बाळगता येईल.

इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करावी?

मित्रांनो तुम्हाला पण इमर्जन्सी अलर्ट सेटिंग सुरू करायची असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमच्या अँड्रॉइड फोनच्या सेटिंग मध्ये तुम्हाला जावं लागेल आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर तिथे तुम्हाला सेफ्टी अँड इमर्जन्सी हा पर्याय दिसेल या पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये वायरलेस इमर्जन्सी आलं हा पर्याय दिसेल या पर्यायाला तुम्हाला सुरू करावे लागेल जर तुमच्या मोबाईल मध्ये हा पर्याय बंद दिसत असेल तर त्याला अलाऊ करा म्हणजे इथून पुढे देशात आपातकालीन परिस्थिती आली तर त्याबद्दलची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल

Leave a Comment