Daily Rainfall Data Maharashtra :खुशखबर! कोणत्या जिल्ह्यात किती मिलिमीटर पाऊस पडला आता पाहता येणार ऑनलाइन

Daily Rainfall Data Maharashtra: नमस्कार मित्रांनो आजपर्यंत आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याबद्दलची माहिती फक्त आणि फक्त न्युज पेपर आणि न्यूज चैनल च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत होते पण आता राज्य सरकारकडून यासाठीचा एक नवीन पोर्टल हे सर्व सामान्य जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आले आहे या पोर्टलच्या माध्यमातून आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याची नोंद या पोर्टलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.

आपल्या सर्वांना माहीत आहे आपण ज्या शहरात राहतो ज्या गावांमध्ये राहतो त्या गावांमध्ये पाऊस पडला हे आपल्याला माहीत असते आपण इतरांना सांगतो की खूप जोरात पाऊस पडला पण नेमका आपल्या गावामध्ये आपल्या शहरांमध्ये किती मिलिमीटर पाऊस पडला याबद्दलची माहिती आपल्याला नसते आपल्या गावामध्ये नेमका पाऊस किती पडला यावरून आपण आपल्या गावामध्ये पेरणी करू शकतो का पेरणी उपयुक्त पाऊस पडला आहे का याबद्दलची सर्व माहिती आता आपण ऑनलाइन पद्धतीने पाहू शकणार आहोत.

यासाठी राज्य सरकारने एक नवीन पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या मदतीने आपण दिवसानुसार आपल्या गावात आपल्या देशात आपल्या शहरात आपल्या जिल्ह्यात आजूबाजूच्या गावात किती मिलिमीटर पाऊस पडला याबद्दलचा तपशील व्यवस्थित रित्या पाहू शकणार आहोत जिल्ह्यानुसार गावानुसार याबद्दलची यादी आपल्याला या पोर्टलच्या माध्यमातून पाहायला मिळेल.

किती पाऊस झाला कसे पाहणार पहा

Leave a Comment