Crop Loss Relief: नमस्कार शेतकरी मित्रांनो जून ते ऑक्टोबर 2022 मध्ये सततच्या पावसामुळे नुकसान ग्रस्त झालेल्या व बाधित झालेल्या 14 जिल्ह्यातील 26 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या माध्यमातून पंधराशे कोटी रुपयांची रक्कम मंजूर करण्यात आली आहे व त्याचे वितरण करण्याचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला असून लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये याचे वितरण करण्यात येणार आहे या रकमेचा वितरण करताना कोणती कार्यप्रणाली वापरली जाणार आहे शेतकऱ्यांना कशाप्रकारे पैसे मिळतील या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या लेखाद्वारे पाहणार आहोत.
मित्रांनो 2022 मध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी गोगलगायी मुळे झालेले नुकसान सततचा पाऊस अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होतं अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होतं यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई हे राज्य सरकारकडून दोन टप्प्यात वितरित करण्यात आली आहे पण सततच्या पावसाच्या अनुदान शेतकऱ्यांना अद्याप दिले गेले नव्हते याचप्रमाणे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि गारपीट याच्यामध्ये पण शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते राज्य शासनाच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले होते तसेच आता सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केले जाणार आहे.
24 जानेवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यामध्ये नुकसान भरपाई वाटपाची कार्यपद्धती कार्यपद्धती पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे. पूर्वी शासनाकडून निधी मंजूर केला जात असे तिथून हा निधी आयुक्तांकडे जात होता आयुक्तांकडून विभागीय आयुक्तांकडे जात होता विभागीय आयुक्ताच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याकडे यायचा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तहसील यायचा व तहसीलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होता मात्र 2022 मध्ये हे वितरण करत असताना चार महिने उलटून गेले तरी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे वितरित झाले नव्हते त्यामुळे 24 जानेवारी 2023 ला शासन निर्णय काढण्यात आला व आता हे अनुदान महाआयटी माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
नुकसान भरपाई ई-केवायसी कशा पद्धतीने करावी पहा