Check Pm Kisan Beneficiary Status : नमस्कार मित्रांनो ऑल-इन-वन मराठीचा या पोस्ट द्वारे आपण शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मानधन देणारी एक महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच शेतकऱ्यांना पाठीमागील Pm Kisan Yojana तेरावा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला नव्हता.
अशा परिस्थितीत आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की आपला तेरावा 14 वा हप्ता देखील आपल्या बँक खात्यामध्ये जमा होईल का? चौदाव्या हप्त्यासाठी आपण लाभार्थी म्हणून पात्र आहोत का? आपली केवायसी पूर्ण झाली आहे का? आपली लाभार्थी स्थिती काय आहे? अशा अनेक प्रश्नांबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत?
मित्रांनो आता लवकरच (Pm Kisan Sanman Nidhi Yojana) पुढील हप्त्याचं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरण केलं जाणार आहे या योजनेच्या संदर्भात शासनाच्या माध्यमातून या योजनेचा चौदावा हप्ता पात्र झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच वितरित केला जाणार आहे. या हप्त्याचे वितरण करत असताना शेतकऱ्याला आपली इ केवायसी करणे, भौतिक तपासणी करणे, आपल्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अशा प्रकारच्या काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत अशा जबाबदाऱ्या पार पाडलेल्या शेतकऱ्यांना व पात्र झालेल्या शेतकऱ्यांना पुढील 14 व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही आपल्या प्रश्नांची निवारण करण्यासाठी पीएम किसान योजनेच्या अधिकृत pmkisan.gov.in पोर्टल वरती जाऊन आपण ऑनलाइन पद्धतीने ही माहिती पाहू शकता पी एम किसान च्या पोर्टल वरती आल्यानंतर मुख्य पृष्ठावर उजव्या कोपऱ्यात आपल्याला न्यू फार्मर रजिस्ट्रेशन, इ-केवायसी आणि बेनिफिशियरी स्टेटस असे पर्याय आपल्याला पाहायला मिळतील या पर्यायामार्फत आपण जर नवीन शेतकरी असाल आणि आत्तापर्यंत आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेतला नसेल तर आपण येथे रजिस्ट्रेशन करू शकता त्यासोबतच आपल्या खात्याची इकेवायसी झाली नसेल तर ती ई केवायसी आपण करू शकता किंवा ई केवायसी स्थिती काय आहे ती जाणून घेऊ शकता त्यासोबतच लाभार्थ्याची स्थिती पण आपण या ठिकाणी जाऊन पाहू शकता.
पीएम किसान लाभार्थी स्थिती तपासा