Chandrayaan 3 Launch Date: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणाची तारीख 14 जुलै 2023 ही निश्चित केली आहे. भारतातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून दुपारी IST 2:35 मिनिटांनी या मोहिमेचे प्रक्षेपण केले जाणार आहे हे प्रक्षेपण आपण थेट दूरदर्शन चैनल आणि ऑनलाइन पाहू शकणार आहोत ऑनलाइन पाहण्यासाठी आपल्याला ISRO अधिकृत वेबसाईट वरती जाऊन हे प्रक्षेपण आपल्याला पाहता येणार आहे.
चंद्रयान-2 मिशन 2019 मध्ये चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात अयशस्वी ठरले होते त्यामुळे ISRO टीम व संपूर्ण देश निराश झाला होता त्यावेळी इस्रोचे तत्कालीन प्रमुख के सीवन हे सुद्धा निराश झाले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची सांत्वना केली व देशाला सुद्धा संबोधित केले होते ISRO ने त्यावेळी जी कामगिरी केली होती ती आजपर्यंत भारतातील नागरिकांच्या स्मरणार्थ जिवंत आहे अनेकांची हृदये तोडल्यानंतर सुमारे चार वर्षानंतर, सॉफ्ट लँडिंगसह चंद्र मोहिमेची पूर्तता करणाऱ्या राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये भारत देशाचा समावेश करण्याच्या प्रयत्नात इस्रोचे चांद्रयान शुक्रवारी तिसर्या मोहिमेत चंद्राच्या दिशेने झेपावणार आहे.
चांद्रयान 3 लाँच बद्दल काही प्रमुख तपशील खाली दिले आहेत
लाँच तारीख | 14 जुलै 2023 |
प्रक्षेपण वेळ | 2:35 PM IST |
प्रक्षेपण स्थळ | सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा |
मिशन कालावधी | एक चंद्र दिवस, पृथ्वीवरील 14 दिवस |
रॉकेट नेम | फॅट बॉय’ LVM3-M4 |
चंद्रयान ३ मिशन हे चंद्रयान २ चा फॉलोअप मिशन आहे जे 2019 मध्ये लॉन्च करण्यात आले होते आता चंद्रयान ३ चे लक्ष चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लॅन्डर आणि रोवर सॉफ्ट लँड करणे हा आहे यासोबत लँडर कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर आणि मॅग्नेटोमीटरसह अनेक वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज असलेला रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर ५०० मीटर पर्यंत प्रवास करू शकेल इतकी क्षमता या रोवरमध्ये असणार आहे.
चांद्रयान 3 मुख्य मॉड्यूल्स कोणते आहेत?
लँडर: लँडर हे चांद्रयान 3 मोहिमेचे हृदय असणार आहे जे चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळ यानाच्या सॉफ्ट-लँडिंगसाठी खूप महत्त्वाचा रोल असणार आहे. लँडर कॅमेरा, स्पेक्ट्रोमीटर आणि मॅग्नेटोमीटरसह अनेक वैज्ञानिक उपकरणांनी हे लँडर सुसज्ज आहे.
रोव्हर: रोव्हर हा एक मोबाइल प्लॅटफॉर्म आहे जो लँडरमधून तैनात केला जाईल हा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर 500 मीटरपर्यंत प्रवास करू शकेल इतकी क्षमता या रोव्हर मध्ये असणार आहे.
प्रोपल्शन मॉड्यूल: लँडर आणि रोव्हर चंद्रावर नेण्यासाठी प्रोपल्शन मॉड्यूल जबाबदार असणार आहे प्रोपल्शन मॉड्यूलचा वापर चंद्राभोवतीच्या कक्षेत अंतराळ यानाची देखरेख करण्यासाठी करण्यात येणार आहे.
चंद्रयान तीन मोहीम भारतीय अंतराळ कार्यक्रमासाठी एक महत्त्वाचा टप्पा असणार आहे यासाठी ISRO मधील वैज्ञानिक सक्षम आहेत परंतु वैज्ञानिकांसाठी हा एक आव्हानात्मक मिशन असणार आहे व हे मिशन भारतासाठी ऐतिहासिक घटना असणार आहे हे निश्चित.